वादळी चर्चेला सुरुवात
Goan Varta Live | प्रतिनिधी
वीजमंत्री निलेश काब्राल आणि अपक्ष आमदार रोहन खंवटेंमध्ये जुंपली, अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवशी सत्ताधारी विरोधकांमध्ये वादळी चर्चा
दुसऱ्या दिवशी प्रश्न पटलावर न आणल्यानं अपक्ष आमदार रोहन खंवटे यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. त्यावर त्यांनी मुख्यमंत्र्यांसोबतही युक्तिवाद केलाय. त्यानंतर संतापलेले वीजमंत्री नीलेश काब्राल उभे राहिले आणि यावेळी दोघांमध्येही प्रचंड बाचाबाची झाली.