मनोहर आंतरराष्ट्रीय विमानतळावर सुरू झाले “इंडिगो”चे सर्वात मोठे स्टेशन !

ऋषभ | प्रतिनिधी
राष्ट्रीय : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते 11 डिसेंबर 2022 रोजी उत्तर गोव्यातील मोपा येथे गोव्याच्या दुसऱ्या आंतरराष्ट्रीय विमानतळाचे उद्घाटन झाले आणि आता 05 जानेवारी 2023 पासून विमानतळाचे कामकाज सुरू होईल. इंडिगो एयरलाईन्स वाढती मागणी पूर्ण करण्यासाठी ही नवीन उड्डाणे सादर करत आहे आणि या मुळे थेट कनेक्टिव्हिटी सुधारेल. सध्याचे गोवा दाभोळी विमानतळ सक्रिय राहील, आणि इंडिगो तेथे सुद्धा आपले विद्यमान कार्य चालू ठेवेल.
देशाला शक्य तितक्या चांगल्या प्रकारे कनेक्टिव्हिटी प्रदान करण्याची इंडिगोची महत्त्वाकांक्षा
या प्रसंगी बोलताना, इंडिगोचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. पीटर एल्बर्स म्हणाले, “उत्तर गोव्यातील मोपा येथील मनोहर आंतरराष्ट्रीय विमानतळावरून नवीन थेट कनेक्शनसह आमचे आतापर्यंतचे सर्वात मोठे स्टेशन लॉन्च करण्याची घोषणा करताना आम्हाला खूप आनंद होत आहे. इंडिगोमध्ये एवढ्या मोठ्या प्रमाणावर फ्लिट लॉंच होणे आमच्यासाठी महत्त्वाचे आहे”
असे असेल पहिल्या दोन दिवसांचे वेळापत्रक ! आंतरराष्ट्रीय विमानतळाचे मनोहर दृश्य
उत्तर गोव्यात काही सर्वात लोकप्रिय पर्यटन आकर्षणे आहेत आणि येथे सामान्यतः राज्यातील इतर कोणत्याही प्रदेशापेक्षा जास्त रहदारी मिळते. निसर्गरम्य समुद्रकिनाऱ्यांपासून ते चित्तथरारक किल्ले आणि मोहक कॅसिनो आणि नाईट क्लबपर्यंत, गोवा हे भारतातील पर्यटन केंद्रांपैकी एक आहे. बॅसिलिका ऑफ बॉम जीझस, अग्वाद फोर्ट, इमॅक्युलेट कन्सेप्शन चर्च, चापोरा फोर्ट, शिकेरी बीच, अंजुना बीच, कलंगुट बीच, हरवळे धबधबा, मोरजिम, क्लब टिटोस, क्लब क्युबाना, कांदोळी बीच, गोवा सफारी अॅडव्हेंचर, कॅफे मॅम्बोस यांसारखी पर्यटन स्थळे आहेत. ही अशी सुप्रसिद्ध आकर्षणे आहेत ज्यांना देशातील आणि बाहेरील पर्यटक मोठ्या प्रमाणावर भेट देतात.