दी ग्रेट ग्लोबल लीडर साक्षात बराक ओबामा वाचणार अनिल सरमळकर यांची दोन इंग्रजी नाटके !

व्हल्चर व्हिस्पर्स आणि  द फॉक्स  नाटके स्वतः  दी ग्रेट ओबामा वाचणार आहेत ! आणि या वृत्तामुळे अनिल सरमळकर हे नाव पुन्हा एकदा वैश्विक साहित्य नाट्य क्षितिजावर झळकले आहे.

ऋषभ | प्रतिनिधी

अनिल सरमळकर


मुंबई :अनिल सरमळकर या तरुण आघाडीच्या मराठी इंग्रजी कवी लेखक नाटककार नाट्य चित्रपट दिग्दर्शकाच्या लेखनाची उत्तरोत्तर जागतिक पातळीवर दखल घेतली जात असुन आता खुद्द जागतिक मानवतावादी नेते महासत्ता अमेरिकाचे भुतपूर्व राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा आपला अत्यंत अमूल्य वेळ देवुन अनिल सरमळकर लिखित व बहुचर्चित ‘ द फॉक्स ‘ व ‘व्हल्चर व्हिस्पर्स ‘ ही दोन्ही इंग्रजी नाटके वाचणार असुन या दोन्हीही नाटकांची सॉफ्ट कॉपी ओबामा प्रेसिडेन्सीयल लायब्ररीला पोहोचली आहेत.

“मी काही काळापूर्वी आदरणीय ओबामा सरांच्या प्रेसिडेंसीयल लायब्ररी मेलवर एक विनंती पत्र पाठविले होते आणि विनम्रपणे त्यांना विनंती केली होती की त्यांच्यापर्यंत मी माझी इंग्रजी नाटके पाठवू शकेन का ? एकूणच विश्व मानवी समाजाच्या संदर्भात एक भाष्य करणारी ही नाटके आदरणीय ओबामा यांच्या सारख्या वैश्विक नेतृत्त्वापर्यंत पोहचावे अशी माझी इच्छा व विनंती होती. दरम्यान काही काळाने मला बराक ओबामा लायब्ररी कडुन प्रतिसादात्मक मेल प्राप्त झाला की आपले लेखन पाठवावे खुद्द प्रेसिडेंट ते पाहण्यासाठी इच्छुक आहेत अर्थातच माझ्यासाठी हा क्षण अद्भूत होता आणि सार्थकतेची अनुभूती देणारा होता. ” अनिल सरमळकर

सर्वंकष सत्ता कसा मानवी समाजाचा भयंकर विनाश घडवुन आणते त्यांचे अपूर्व आणि अत्यंत धाडसी नव्या नाट्यबंधातुन दिसणारे हादरवुन टाकणारे नाट्य म्हणजे ‘ द फॉक्स ‘
भेदक प्रहसन करत ट्रॅजीकॉमेडीच्या अंगाने जाणारे आणि वैश्विक तत्वज्ञान आणि साहित्याचे संदर्भ असणारे आणि आधुनिक आणि उत्तर आधुनिकतेची खिल्ली उडविणारे आणि प्रस्थापित कला मुल्यांची उत्तर आधुनिकतेने उडविलेली खिल्ली आणि भाष्य म्हणजे ‘व्हल्चर व्हिस्पर्स ‘ हे नाटक आहे.

अत्यंत दुर्गम खेड्यात एका अत्यंत साध्या कुटुंबातुन आलेले अनिल सरमळकर यांचे शिक्षण मराठी माध्यमातून झाले आहे मात्र एफ वाय पासुन ते उच्च पदवीपर्यंत त्यांनी इंग्रजी साहित्य हा स्पेशल विषय घेतला व त्यातुनच ते इंग्रजीचे उच्च पदवीधर झाले असुन कॉलेज जिवनापासुनच त्यांनी मराठी बरोबरच इंग्रजी लेखनाला सुरुवात केली आहे.

दरम्यान भूतपूर्व अमेरिकन प्रेसिडेंट बराक ओबामा यांच्यापर्यंत अनिल सरमळकर यांचे लेखन पोहचल्याने त्याला एक आंतरराष्ट्रीय पातळीवर साहित्यिक आणि वैचारिक महत्व प्राप्त झाले आहे त्यामुळेच संपूर्ण साहित्य कला रंगभूमी बुद्धीमंत वर्तुळातुन अनिल सरमळकर यांचे अभिनंदन होत आहे.

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.
error: Content is protected !!