जागतिक वैमानिक दिन विशेष आणि अल्बाट्रॉस युरी….

विद्यमान परिस्थितित जर कांग्रेस पुन्हा गगनझेप घेवू इच्छित असेल तर त्यांच्या कड़े युरी पेक्षा दूसरा असा कोणताही पर्याय नाही.

ऋषभ | प्रतिनिधी

आज जागतिक वैमानिक दिन. पण २६ एप्रिलच का? जागतिक वैमानिक दिन दर २६ एप्रिल रोजी साजरा केला जातो कारण आमच्या सुरक्षिततेसाठीच्या योगदानाचे स्मरण आहे. 1948 मध्ये, इंटरनॅशनल फेडरेशन ऑफ एअरलाइन पायलट असोसिएशन (IFALPA) ची स्थापना करण्यात आली. याच दिवशी एका तुर्की पायलटने आपल्या प्रवासाची वेळ आणि तारीख सुनिश्चित केली. आणि पुढे हाच दिवस जागतिक पातळीवर साजरा केला जाऊ लागला.

वचनबद्ध वृत्ती आणि कृती, एक मजबूत कार्य नैतिकता, उच्च पातळीची सचोटी आणि नेतृत्व करण्याची क्षमता, उच्चकोटीचा त्याग व आपल्या कामाप्रती समर्पित वृत्तीशिवाय कुणी पायलट बनत नाही. छोट्या छोट्या तपशीलाकडे लक्ष देणे, पुढाकार घेणे, सकारात्मक दृष्टीकोन, दबावाखाली चांगले काम करणे, शिकण्याची इच्छा असणे, समस्या सोडवणे आणि नेतृत्व करणे ह्या गोष्टी तुम्ही एक उत्कृष्ट पायलट असल्याचे घ्योतक आहे.

पायलट ! ज्याच्या खांद्यावर असते जवाबदारी. जवाबदारी समाज्याप्रती, त्याच्यावर विश्वास ठेऊन विमानात बसलेल्या त्या प्रवासी आणि त्या प्रवाशांच्या घरच्यांप्रती आणि स्वतःच्या लहान पणी पाहिलेल्या त्या खास स्वप्नाप्रती. स्वप्ने अशी जी तुम्हाला झोपू देत नाहीत. स्वप्ने अशी जी तुम्हाला मैलो मैल उडत राहण्यास प्रेरित करतात. अल्बाट्रॉस पक्षासारखी.

यांना ओळखलेत्त का? हो हे आहेत गोवा काँग्रेसचे नेता प्रतीपक्ष युरी ज्योकिम आलेमांव. पूर्वाश्रमीचे पायलट आणि सद्य परिस्थितीत काँग्रेसमध्ये काम करताना तोच पायलटचा रोल नवीन दृष्टीकोनातून वठवतांना आपण यांना अनेक वेळा पाहिले आहे. मग ते राज्याच्या विधानसभेत एक इंजिन खराब झालेल्या काँग्रेसच्या कधीही कोलमडून पडेल अशा विमानाचे धुरीण बनून त्यास स्थिरता देणे असो किंवा रस्त्यावरचे प्रश्न थेट विधानसभेत मांडणे असो. युरिंनी आपला अंतर्मनातील वैमानिक आणि त्याच्या त्या नभातून अविरत उड्डाण करण्याच्या इच्छा अजूनही तेवत ठेवल्या आहेत.

पण आता त्यांच्यावर एक मुख्य जवाबदारी आहे,
काँग्रेस. ज्याचे एक इंजिन कधीच मोडले आहे. पुढील वर्षी लोकसभेच्या निवडणुका होतायत. यावेळी स्पर्धा तीव्र असेल आणि दक्षिण गोव्यात जरी काँग्रेसची हक्काची मते असली तरी त्यांस गृहीत न धरता उचित रणनीतीचा अवलंब करून वेळीच पार्टीचे संघटन बळकट करण्याची गरज असेल. आणि फक्त वैमानिक एकटा काही करू शकणार नाही, जर विमानात खराबी असेल. त्यासाठी वेळीच दुरुस्त व्हावे लागेल. जर असे झाले तरच पुढील वर्षी होवू घातलेल्या लोकसभेच्या निवडणुकीत काँग्रेस लांब पल्ल्याचे उड्डाण घेऊ शकले. अन्यथा एव्हाना ते हेंगर मधे पार्क करून ठेवलेले आहेच.

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.
error: Content is protected !!