कोरोनानंतरचं दुसरं अधिवेशन

सिध्देश सावंत | प्रतिनिधी

आजपासून केवळ सात दिवसांचं अधिवेशन होतंय. या हिवाळी अधिवेशनाआधी एक दिवसाचं पावसाळी अधिवेशन झालं होतं. त्यानंतर मार्च किंवा एप्रिलमध्ये होणारे अर्थसंकल्पीय अधिवेशन दीर्घकालीन असेल. आजपासून सुरू होणाऱ्या अधिवेशनात विविध विषयांवर चर्चा करण्यात येईल. दरम्यान, राज्यातील करोना प्रसारामुळे २७ जुलै २०२० रोजी विधानसभेचे एकदिवसीय अधिवेशन घेण्यात आले होते. सुरुवातीला पावसाळी अधिवेशन दोन आठवड्यांचे घेण्याचं निश्चित झालं होते. पण त्याच काळात करोनाचा प्रसार मोठ्या प्रमाणात होत होता. त्यामुळे करोनाबाबतच्या मार्गदर्शक तत्त्वांचे पालन करून २७ जुलै या एकाच दिवशी अधिवेशन घेण्यात आलं.

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.