आज सकाळपर्यंत राज्यात ८६.५० इंच पाऊस । २४ तासांत सांगेत सर्वाधिक ८.५ इंच । साखळी ७, केपे ६, फोंडा, काणकोण, ओल्ड गोवा प्रत्येकी ४ इंच पावसाची नोंद । पावसास पूरक ढग कर्नाटक, महाराष्ट्राच्या दिशेने सरकले । गोवा हवामान खात्याची माहिती । खांडेपार नदीला पूर; शेजारील गावांमध्ये शिरले पाणी । राज्यातील अनेक भागात पूरस्थिती; घरांमध्ये पाणी घुसल्यामुळे नुकसान । फोंडा, डिचोली, सत्तरी तालुक्यातील गावांमध्ये अडकून पडलेल्या लोकांना सुरक्षित ठिकाणी ‌आणण्याचे प्रशासनाचे प्रयत्न । सत्तरी तालुक्यातील पैकुळ येथील म्हादई नदीवरील पूल कोसळला । चोर्लाघाटात काही ठिकाणी दरडी कोसळल्या । साखळीतील वाळवंटी नदीने धोक्याची पातळी ओलांडली । सत्तरीत म्हादई, शापोरा, सांगेतील उगे, तळपण, गांजेत म्हादई नदीला पूर

Goan Varta Live | प्रतिनिधी

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.
error: Content is protected !!