#MuncipalityResult पालिकेचा रणसंग्राम - 2021 #Goa #Municipality #Politics | LIVE UPDATES

पक्ष एकूण जागा
मडगाव 25
भाजप पुरस्कृत05
काँग्रेस पुरस्कृत14
इतर01
मुरगांव25
भाजप पुरस्कृत16
काँग्रेस पुरस्कृत02
इतर03
म्हापसा20
भाजप पुरस्कृत09
काँग्रेस पुरस्कृत09
इतर02
केपे 13
भाजप पुरस्कृत09
काँग्रेस पुरस्कृत04
इतर00
सांगे10
भाजप पुरस्कृत07
काँग्रेस पुरस्कृत00
इतर03
 • 15 दिवसांपूर्वी

  मडगाव पालिकेत गोवा फॉरवर्ड, काँग्रेस पॅनलची सत्ता

  मडगाव नगरपालिका

  फातोर्डा फॉरवर्ड पॅनेल ( गोवा फॉरवर्ड 9)
  जोन्स फ्रान्सिस आग्नेलो (1)विजयी
  क्रास्टो निकोल (2) विजयी
  परेरा लिंडन फ्रेडी (3) विजयी
  पुजा नाईक (4) विजयी
  श्वेता लोटलीकर (5) विजयी
  रविंद्र नाईक (9) विजयी
  व्हिक्टोरिना फर्नांडिस (10) विजयी
  राजू नाईक (11) विजयी
  निमेसिओ फालेरो (23) विजयी
  मॉडेल मडगाव (कॉँग्रेस 8)
  सगुण नाईक (12) विजयी
  दिपाली सावळ (16) विजयी
  सिताराम गडेकर (17) विजयी
  घनश्याम प्रभूशिरोडकर (18) विजयी
  लता पेडणेकर (19) विजयी
  सँड्रा फर्नांडिस (20) विजयी
  दामोदर शिरोडकर (21) विजयी
  दामोदर वरक (22) विजयी
  व्हायब्रंट मडगाव (भाजप 7)
  सदानंद नाईक (6) विजयी
  मिलाग्रीना गोम्स (7) विजयी
  कामिलो बार्रेटो (8) विजयी
  सुशांता कुडतरकर (13) विजयी
  रोनिता आजगावकर (14) विजयी
  पार्वती पराडकर (24)
  बबिता नाईक (25) विजयी
  अपक्ष
  महेश आमोणकर (15) विजयी

 • 15 दिवसांपूर्वी

  ELECTION RESULTS |मुरगाव नगरपालिकेत भाजपची सत्ता : वाचा, कोणत्या पॅनलचा कोणता उमेदवार जिंकला…

  मुरगाव नगरपालिका

  वॉर्ड नं. १ मंजुषा पिळणकर (भाजप)
  वॉर्ड नं. २ दयानंद नाईक (भाजप)
  वॉर्ड नं. ३ कुणाली मांद्रेकर (भाजप)
  वॉर्ड नं. ४ दामू कासकर (भाजप)
  वॉर्ड नं. ५ दामोदर नाईक (भाजप)
  वॉर्ड नं. ६ प्रजय मयेकर (भाजप)
  वॉर्ड नं. ७ रामचंद्र कामत (भाजप)
  वॉर्ड नं. ८ श्रद्धा आमोणकर (आमोणकर पॅनेल)
  वॉर्ड नं. ९ योगिता पार्सेकर (आमोणकर पॅनेल)
  वॉर्ड नं. १० के.डी. स्वामी
  वॉर्ड नं. ११ नारायण मुकुंद बोरकर (भाजप)
  वॉर्ड नं. १२ दिपक नाईक (भाजप)
  वॉर्ड नं. १३ शमी कृष्णा साळकर (साळकर पॅनेल-भाजपला पाठिंबा)
  वॉर्ड नं. १४ माथायस मोन्तेरो
  वॉर्ड नं. १५ प्रिया नंददीप राऊत (अपक्ष)
  वॉर्ड नं. १६ गिरीश बोरकर (साळकर पॅनेल-भाजपला पाठिंबा)
  वॉर्ड नं. १७ फ्रेड्रीक हेनरीक (भाजप)
  वॉर्ड नं. १८ अमेय चोपडेकर (भाजप)
  वॉर्ड नं. १९ देविता आरोलकर (भाजप)
  वॉर्ड नं. २० यतीन कामुर्लेकर (भाजप)
  वॉर्ड नं. २१ श्रद्धा महाले (भाजप)
  वॉर्ड नं. २२ सुदेश भोसले (भाजप)
  वॉर्ड नं. २३ विनोद किनळेकर (भाजप)
  वॉर्ड नं. २४ कॅटरिना झेवियर (भाजप)
  वॉर्ड नं. २५ लिओ रॉड्रिग्स (अपक्ष)

 • 15 दिवसांपूर्वी

  म्हापसा नगरपालिकेत अपक्ष ठरणार किंगमेकर, भाजप-काँग्रेसला समसमान जागा! 2 अपक्ष विजयी

  म्हापसा : भाजप आमदार जोशुआंसमोर आता मोठं आव्हान उभं राहणार आहेत. विधानसभेची सेमी फायनल म्हणून ज्या नगरपालिकेच्या निवडणुकीकडे पाहिलं जात होतं, त्या निवडणुकीत काँग्रेसनं आपली सर्व ताकद पणाला लावली होती. या निवडणुकीत सर्व विरोधक एकत्र आले होते आणि त्यांनी भाजपला कडवी झुंज दिली. आता भाजप आणि विरोधक यांना प्रत्येकी ९ जागा मिळवण्यात यश आलंय. तर दोन ठिकाणी अपक्ष उमेदवार निवडून आले आहेत. त्यापैकी आनंद भाईडकर हे काँग्रेस समर्थक आहेत. तर प्रकाश भिवशेट यांचा पूर्वी भाजपशी संबंध होता. त्यामुळे हे दोघेही जरी भाजप आणि काँग्रेसकडे गेले तरीही पुन्हा दोन्ही पक्षांची मते समसमानच होणार असल्याचं जाणकार सांगतात. त्यामुळे म्हापसा नगरपालिकेवर कोण सत्ता गाजवतं, हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

  म्हापशाचे माजी आमदार आणि माजी उपमुख्यमंत्री फ्रान्सिस डिसोझा यांच्या निधनानंतर या मतदारसंघाची उमेदवारी त्यांचे पुत्र जोसुआ डिसोझा यांना देण्यात आली होती. म्हापशासाठी झालेल्या पोटनिवडणुकीत जोशुआ यांनी बाजी मारली खरी, परंतु त्यावेळी भाजपला सहानुभूतीच्या लाटेचा फायदा झाला होता. आता मात्र आगामी विधानसभा निवडणुकीत भाजपला योग्य प्रबळ उमेदवार शोधण्याची गरज या एकूणच नगरपालिका निवडणुकीतून स्पष्ट झाली आहे. म्हापशात सर्व भाजप विरोधक एकत्र आले, तर भाजपसाठी निवडणूक जड जाणार, हे देखील या निकालातून अधोरेखित झाले आहे. आता भाजपचं नेतृत्तव अपक्ष विजयी उमेदवारांनी कशा पद्धतीनं आपल्या बाजूनं वळवतं आणि नगरपालिकेवर आपली सत्ती कशी स्थापन करतं, यावरच भाजपच्या नेतृत्त्वाचं कौशल्य सिद्ध होणार आहे.

  दरम्यान, बार्देश मधील प्रमोद सावंत सरकारमधील एक वरीष्ठ गोवन वार्ता लाईव्हशी बोलताना म्हणाले की,

  म्हापाशात खरंतर २० पैकी १९ ठिकाणी विजयी झेंडा फडकणं अपेक्षित होतं. मात्र असं अनपेक्षित का घडलं, याचं आत्मचिंतन पक्षानं करावं. तसंच या मतदारसंघाची जबाबदारी दिलेले प्रभारी कुठे चुकले? याचा शोध घ्यावा.

  म्हापसा नगरपालिकेचा वॉर्डनिहाय निकाल

  वॉर्ड नं. १ आनंद भाईडकर (अपक्ष)
  वॉर्ड नं. २ चंद्रशेखर बेनकर (भाजप)
  वॉर्ड नं. ३ बारबारा कारास्को (भाजप)
  वॉर्ड नं. ४ सुशांत हरमलकर (भाजप)
  वॉर्ड नं. ५ शशांक नार्वेकर (काँग्रेस)
  वॉर्ड नं. ६ नूतन बिचोलकर (काँग्रेस)
  वॉर्ड नं. ७ तारक आरोलकर (काँग्रेस)
  वॉर्ड नं. ८ विकास आरोलकर (काँग्रेस)
  वॉर्ड नं. ९ केल ब्रागांजा (भाजप)
  वॉर्ड नं. १० प्रिया मिशाळ (भाजप)
  वॉर्ड नं. ११ किशोरी कोरगावकर (भाजप)
  वॉर्ड नं. १२ आशिर्वाद खोर्जुवेकर (भाजप)
  वॉर्ड नं. १३ कमल डिसूझा (काँग्रेस)
  वॉर्ड नं. १४ साईनाथ राऊळ (भाजप)
  वॉर्ड नं. १५ स्वप्निल शिरोडकर (भाजप)
  वॉर्ड नं. १६ विराज फडके (काँग्रेस)
  वॉर्ड नं. १७ शुभांगी वायंगणकर (काँग्रेस)
  वॉर्ड नं. १८ अवनी कोरगावकर (काँग्रेस)
  वॉर्ड नं. १९ सुधीर कांदोळकर (काँग्रेस)
  वॉर्ड नं. २० प्रकाश भिवशेट (अपक्ष)

  नगराध्यक्ष पदाच्या अपक्षांना ऑफर?

  दरम्यान, आता अपक्ष किंगमेकर ठरणार आहेत. त्यामुळे अपक्षांना नगराध्यक्ष पदाची ऑफर दिली जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे अशी ऑफर जर अपक्ष उमेदवारांना मिळाली, तर ते काय निर्णय घेतात, हे पाहणंही महत्त्वाचं ठरणारच. शिवाय नेमकी नगराध्यक्षपदाची लॉटरी कुणाला लागते, याकडे म्हापशेकरांचं लक्ष लागलंय. महत्त्वाचं म्हणजे प्रकाश भिवशेट यांना विश्वासात घेऊन कोणत्या पक्षाला पाठिंबा द्यायचा याचा निर्णय घेणार असल्याचं आनंत भाईडकर यांनी म्हटलंय.

 • 15 दिवसांपूर्वी

  केपे नगरपालिका | केपेचा किंग कोण? बाबू कवळेकरांशिवाय आहेच कोण!

  वॉर्ड नंबर १ चेतन हळदणकर
  वॉर्ड नंबर २ गणपत मोडक
  वॉर्ड नंबर ३ सुचिता शिरवाईकर
  वॉर्ड नं. ४ प्रसाद फळदेसाई
  वॉर्ड नं. ५ फिलू डिकॉस्टा
  वॉर्ड नंबर ६ दिपाली नाईक
  वॉर्ड नंबर ७ दयेश नाईक
  वॉर्ड नंबर ८ अमोल काणेकर
  वॉर्ड-९-जेकीना डायस
  वॉर्ड-१०-नंदीता प्रभूदेसाई
  वॉर्ड नं. ११ ऑर्लिंन्डा लासेर्डा
  वॉर्ड-12- लॉर्डिस फर्नांडिस
  वॉर्ड नं. १३ विलियम्स फर्नांडिस

 • 15 दिवसांपूर्वी

  सांगे नगरपालिका | कमळ फुललं, पाहा भाजपनं किती जागा जिंकल्या?

  भाजपची बाजी, 7 जागांसह भाजपची सत्ता

  वॉर्ड नं.१ रुमाल्डो फर्नांडीस (प्रसाद गांवकर)
  वॉर्ड नं.२ मॅसीहा डी कॉस्टा (सावित्री कवळेकर समर्थक)
  वॉर्ड नं.३ सांतीक्षा गडकर (भाजप)
  वॉर्ड नं. ४ सय्यद इक्बाल (भाजप)
  वॉर्ड नं.५ प्रीती नाईक (भाजप)
  वॉर्ड नं. ६ फौजिया शेख (प्रसाद)
  वॉर्ड. नं. ७ क्विरोझ क्रूझ (भाजप)
  वॉर्ड नं. ८ संगमेश्वर नाईक (अपक्ष) (माजी आमदार वासू नाईकांचे सुपुत्र)
  वॉर्ड. नं. ९ श्वेता तारी (भाजप)
  वॉर्ड नं. १० अर्चना गावंकर (भाजप)

 • 15 दिवसांपूर्वी

  10 वाजेपर्यंतचे निकाल | नगरपालिका निवडणूक

  मडगाव

  जोन्स फ्रान्सीस आग्नेलो (१) विजयी
  क्रास्टो निकोल (२) विजयी
  परेरा लिंडन फ्रेडी (३) विजयी
  पुजा नाईक (४) विजयी

  म्हापसा

  सुधीर कांदोळकर (१९) आघाडीवर
  कमल डिसोझा (१३) आघाडीवर
  केल ब्रागांझा (९) आघाडीवर
  तारक आरोलकर (७) आघाडीवर

  सांगे

  रुमाल्डो फर्नांडीस (१) विजयी
  मॅसीहा डी कॉस्टा (२) विजयी
  सांतीक्षा गडकर (३) विजयी
  प्रीती नाईक (५) विजयी
  सय्यद इक्बाल (४) विजयी

  मुरगाव

  मनुजा पिळणकर (१) विजयी
  दयानंद नाईक (२) विजयी
  कुणाली मांद्रेकर (३) विजयी
  दामू कासकर (४) विजयी
  दामोदर नाईक (५) विजयी
  प्रजय मयेकर (६) विजयी

  केपे

  सुचीता सुबोध शिरवईकर (३) विजयी
  अमोल काणेकर (८) विजयी
  प्रसाद फळदेसाई (४) विजयी
  फिलू डिकॉस्टा (५) विजयी
  दिपाली नाईक (६) विजयी
  दयेश नाईक विजयी

 • 15 दिवसांपूर्वी

  महत्त्वाचे निकाल

  अजस हमिद खान यांचा कारापूर सर्वण पंचायत पोटनिवडणुकीत विजय, संतिक्षा संतोष गडकर यांचा सांगे वॉर्ड नंबर ३ मधून विजय

 • 15 दिवसांपूर्वी

  केपेत ‘बाबू’च किंग?

  केपेत बाबू कवळेकरांचे ८ उमेदवार आघाडीवर, केपेत भाजप पुरस्कृत उमेदवार आघाडीवर असल्याची माहिती, केपेत बाबू कवळेकरांनी पुन्हा एकदा ताकद दाखवली

 • 15 दिवसांपूर्वी

  सांगेतून पहिला निकाल हाती

  सांगे वॉर्ड नंबर १ मधील निकाल हाती, पालिका निवडणुकांचा पहिला निकाल हाती, फर्नांडिस रुमाल्डो यांचा सांगेच्या पहिल्या वॉर्डमध्ये विजय

 • 15 दिवसांपूर्वी

  मडगावमध्ये गोवा फॉरवर्ड आघाडीवर

  मडगावातील वॉर्ड नंबर १ ते ४ मध्ये गोवा फॉरवर्ड पुरस्कृत उमेदवार आघाडीवर

 • 15 दिवसांपूर्वी

  LIVE | Municipality Result 2021 | पालिकेचा रणसंग्राम – #Margaon #Murmugaon #Sangem #Qupem #Mapusa

 • 15 दिवसांपूर्वी

  मतमोजणीला सुरुवात

  ५ पालिकांच्या मतमोजणीला सुरुवात झाली असून या निवडणुकीसाठी 402 उमेदवारपैकी 31 उमदेवाऱयावर खटले सुरू असल्याची महिती उमेदवारांनी सादर केली आहे. यातील कितीजणांचं भविष्य उजवणार याकडे सर्वांचे लक्ष लागलं आहे.

 • 16 दिवसांपूर्वी

  प्रशासकीय यंत्रणेच्या मदतीने मतदान प्रक्रियेत केला घोळ

  म्हापसाः येथील नगरपालिका निवडणूकीवेळी प्रशासकीय यंत्रणेचा भाजप सरकारने गैरवापर करीत मतपेट्या सील करताना छेडछाड केली. तसंच शेवटच्या क्षणी नाईट कर्फ्यू व 144 कलम लागू करून सरकारी यंत्रणेच्या मदतीने मतदारांना आकर्षित केल्याचा गंभीर आरोप बोडगेश्वर विकास आघाडीचे निमंत्रक संजय बर्डे यांनी केला आहे. रविवारी सकाळी येथे आयोजित पत्रकार परिषदेत बर्डे बोलत होते. यावेळी संजू तिवरेकर व महेश बर्डे उपस्थित होते.

  हेही वाचाः म्हापशात विजयी मिरवणूक काढण्यास मज्जाव

  मतपेट्यांमध्ये डुप्लिकेट मतदान स्लिप टाकल्या

  मतदानाच्या दिवशी शेवटचा एक तास शिल्लक असताना खोर्ली भागातील मतदान केंद्रात पीपीई किट घालून काही मतदार आले होते. पोलिंग एजन्टना केंद्रातून बाहेर काढलं गेलं. त्यावेळी मतपेट्यांमध्ये डुप्लिकेट मतदान स्लिप टाकल्याचा दावा बर्डे यांनी केला. शिवाय पेडे येथे स्ट्राँग रुमबाहेर काही कागदपत्रे आढळली. मतपेट्या सील करताना उमेदवारांकडून घेतलेल्या सह्या या कागदपत्रांवर होत्या. त्यामुळे या एकंदरीत मतदान प्रक्रियेवर बर्डे यांनी संशय उपस्थित केला.

  हेही वाचाः लस घेण्यापूर्वी रक्तदान, प्लाझ्मादान करा

  म्हापसा पालिका निवडणूक ही भाजपसाठी प्रतिष्ठेची

  म्हापसा पालिका निवडणूक ही भाजपसाठी प्रतिष्ठेची बनली होती. मतदानानंतर मतमोजणीला दोन दिवस अंतर ठेवण्याची गरज नव्हती. पण भाजप सरकारला घोळ घालून सेंटिग करायची होती. त्यासाठीच हा खटाटोप करण्यात आला. शिवाय प्रभाग 14 मधील मतपेटी सोबत घोळ घालण्यात आला आहे. मतदानानंतर काही ठिकाणी पोलिंग एजंट किंवा उमेदवारांच्या सह्या न घेताच मतपेट्या सील करण्याचा प्रकार घडला. यावरूनच सत्ताधार्‍यांच्या हेतूवर संशय व्यक्त होतो, असं बर्डे म्हणाले.

 • 1 महिन्यांपूर्वी

  दिवसभरातील महत्त्वाचं | तुम्ही हे Miss तर नाही ना केलं? एकदा बघाच

  गोव्यातील जनता भाजपसोबत, पत्रकार परिषदेत काय म्हणाले भाजपचे नेते? वाचा सविस्तर

  कोण मनोज परब, मला नाही माहीत!, असं का म्हणाले विश्वजीत राणे

  पतीपत्नी जोडीनं निवडणुकीला उभे राहिले, जोडीनं पडले, ‘या’ पालिकेतला इंटरेस्टिंग निकाल

  नणंद भावयज लढतीत पेडण्यात कुणी मारली बाजी? नात्यांमधील राजकीय चढाओढीत कोण वरचढ?

  ElectionResult | पालिका अनेक, पण निकालांची लिंक एक! वाचा सर्व पालिका आणि पोटनिवडणुकांचे निकाल

  CCP | पणजीत बाबुशच बादशाह.. असा साजरा केला विजय

  VIDEO | POLITICS | मुख्यमंत्र्यांची पालिका निवडणुकांवर पहिली प्रतिक्रिया

  पणजी महापालिकेत – येऊन येऊन येणार कोण? बाबुश मॉन्सेरात शिवाय आहेच कोण!

  साखळी पोटनिवडणुकीत मुख्यमंत्री प्रमोद सावंतांना मोठा धक्का

 • 1 महिन्यांपूर्वी

  ‘गोव्यातील जनता भाजपसोबतच’

  पणजी : राज्यात विरोधकांसह काही एनजीओंच्या मानसिकतेची माणसं सत्ताधारी भाजप सरकारच्या बदनामीसाठी अहोरात्र काम करताहेत. एवढं करूनही जनता मात्र या सगळ्यांना धुडाकावून लावत असल्याचेच यापूर्वी झेडपी आणि आता नगरपालिका निवडणूकांतून स्पष्ट झालंय. राज्यात विधानसभा निवडणूका एका वर्षांवर आल्या असताना नगरपालिका निवडणूकांत लोकांनी भाजप समर्थक नगरसेवकांना निवडून आणून सरकारवरील विश्वासावरच शिक्कामोर्तब केलंय,असा दावा भाजप प्रदेशाध्यक्ष सदानंद शेट तानावडे यांनी केलाय.

  राज्यातील नावेली झेडपी आणि इतर पंचायत पोटनिवडणूक तसेच पणजी महानगरपालिकेसह अन्य ६ नगरपालिकांच्या निवडणूकीत भाजपने घवघवीत यश मिळवलंय. एक कुंकळ्ळी नगरपालिका वगळता अन्यत्र सर्वंच ठिकाणी भाजप समर्थक पॅनलचा दणदणीत विजय झालाय. या विजयोत्सवानिमित्त आयोजित पत्रकार परिषदेत भाजप प्रदेशाध्यक्ष सदानंद शेट तानावडे यांनी हा दावा केलाय. मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी गोमंतकीय जनतेचे आभार व्यक्त करून जनतेने दाखवलेल्या विश्वासाला आपले सरकार पात्र ठरल्याची ही पावती असल्याचं म्हटलंय. विरोधकांनी कितीही खटाटोप केला तरी जनता सुज्ञ आहे आणि अशा अपप्रचाराला गोंयकार जनता भीक घालणारी नाही,असा टोलाही त्यांनी लगावला.

  हेही पाहा – पालिका विजयानंतर भाजपची संपूर्ण पत्रकार परिषद अनकट

  साखळीतील पराभव नगण्य

  मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्या साखळी मतदारसंघातील नगरपालिकेच्या एका प्रभागाच्या पोटनिवडणूकीत विरोधी गटाचे धर्मेश सगलानी यांचा समर्थक उमेदवार निवडून आलाय. या प्रभागात भाजपला कधीच विजय मिळाला नव्हता. यावेळी भाजपने तिकडे तगडा सामना दिला, असे मुख्यमंत्री डॉ.सावंत म्हणाले. जिथे जिथे भाजपचा पराभव झालाय तेथील एकंदर कारणे आणि सुधारणा याबाबत पक्ष विचार करेल,असेही मुख्यमंत्री म्हणाले. भाजप संघटनेची ताकद आणि कार्यकर्त्यांचा प्रामाणिक वावर ही भाजपची जमेची बाजू आहे आणि त्या बळावरच या निवडणूकीत पक्षाने यश संपादन केल्याचं मुख्यमंत्री डॉ. सावंत म्हणाले.

  मुख्यमंत्र्यांच्या नेतृत्वावर शिक्कामोर्तब

  भाजपने आगामी विधानसभा निवडणूका मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्या नेतृत्वाखाली लढविण्याची घोषणा यापूर्वीच जाहीर केलीय. या अनुषंगाने मागील झेडपी आणि आता नगरपालिका निवडणूकांत जनतेने पक्षावर ठेवलेला विश्वास हा मुख्यमंत्री डॉ. सावंत यांच्या नेतृत्वावर केलेला शिक्कामोर्तबच ठरलाय,असं प्रदेशाध्यक्ष सदानंद शेट तानावडे यांनी म्हटलंय. बंडखोरांबाबत बोलताना ते म्हणाले की जनतेने बंडखोरांना त्यांची जागा दाखवून दिलीय. बंडखोरांनी थेट विरोधी पक्षांना दिलेल्या पाठींब्याची गंभीर दखल पक्षाने घेतलीय. आगामी काळात यावर बैठक घेऊन कारवाईची प्रक्रिया सुरू केली जाईल,असेही ते म्हणाले. तूर्त या आंनदोत्सवात बंडखोरांवर बोलून विनाकारण त्यांना महत्व देण्याची गरजच नाही,असा टोलाही त्यांनी लगावला.

 • 1 महिन्यांपूर्वी

  पतीपत्नी जोडीनं निवडणुकीला उभे राहिले, जोडीनं पडले, ‘या’ पालिकेतला इंटरेस्टिंग निकाल

  काणकोण : काणकोण पालिकेच्या निवडणुकीत जुन्या चेहऱ्यांना मतदारांनी यावेळी पसंत केले नसून त्यात माजी उपनगराध्यक्ष किशोर शेट, दयानंद पागी, गुरु कोमरपंत, माजी नगराध्यक्ष रत्नाकर धुरी, दिवाकर पागी यांना हार पत्करावी लागली तर किशोर शेटच्या जागी पांडुरंग उर्फ़ धीरज नाईक गावकर, दयानंद पागीच्या जागी सायमन रेबेलो, गुरु कोमरपंतच्या जागी शुभम कोमरपंत, रत्नाकर धुरीच्या जागी गंदेश मडगावकर, तर दिवाकर पागी याच्या जागी लक्ष्मण उर्फ़ बाकल पागी या नवख्या उमेदवाराना मतदारानी पसंती दिली. मोठ्या प्रमाणात पैशाचा वापर झाल्याने आणि काही राजकीय हितशत्रूनी षडयंत्र रचल्यामुळे पराभव पत्करावा लागला, अशी प्रतिक्रिया पराभूत उमेदवारांनी व्यक्त केली.

  २५ वर्षानंतर शह

  १९८७ पासून नगरपालिका निवडणूक स्वतः लढविणारे आणि आपल्या समर्थकाला विजयी करून आणण्याबरोबरच आपल्या मुलीलाही निवडून आणून काणकोण नगरपालिका मंडळावर प्रत्येकवेळी आपली वेगळी छाप ठेवलेले माजी नगराध्यक्ष रत्नाकर धुरी यांना नवख्या गंदेश मडगावकर या तरुणाकडून राजबाग वार्डातून १०६ मतानी हार पत्करावी लागली.

  त्याचप्रमाणे पाळोळे वार्डात दबदबा असलेले व गेली ४ टर्म निवडून आलेले माजी नगराध्यक्ष दिवाकर पागी यांनाही लक्ष्मण उर्फ़ बाकलू पागी याच्याकडून ५६ मतांनी हार पत्करावी लागली. दिवाकर पागी हे काणकोण भाजपामंडळाचे सरचिटणीस आहेत. माजी उपनगराध्यक्ष दयानंद पागी याला सायमन रेबेलोकडून पाळोळे वार्डात २८५ मतानी हार पत्करावी लागली.

  पती पत्नी गारद!

  मास्तिमळ वॉर्डातून माजी उपनगराध्यक्ष किशोर शेट याना त्याचे गेल्या टर्मचे प्रतिस्पर्धी पांडुरंग उर्फ़ धीरज नाईक गावकर कडून ३५६ मतानी हार पत्करावी लागली. तर किशोर शेट याची पत्नी जयश्री किशोर शेट ही सुद्धा सुप्रिया शेखर देसाई याच्याकडून २५ मतानी देळे वॉर्डमधून पराभूत झाली.

  पालिकेत ५ माजी उपनगराध्यक्ष, माजी नगराध्यक्ष पराभूत

  नगर्से वॉर्डमधून माजी उपनगराध्यक्ष हेमंत नाईक गावकर मात्र पुन्हा पालिकेत पोहचले असून त्यानी माजी नगराध्यक्ष रंगनाथ नाईक गावकर याचा ५५ मतानी पराभव केला. पणसुले वॉर्डात भाजपाचे माजी उपाध्यक्ष विशाल देसाई, महादेव देसाई यानी पुढे आणलेला नवखा उमेदवार नादीन फर्नाडिस यानी विल्सन फर्नाडिस या उमेदवाराचा ७७ मतांनी पराभव केला आहे. पाटणे वॉर्डमधून माजी उपनगराध्यक्ष मारुती उर्फ़ गुरु कोमरपंत याचा काणकोणचे आमदार इज़िदोर फर्नाडिस याचा खदा समर्थक शुभम सुधाकर कोमरपंत यानी मारुती कोमरपंत याचा २४२ मतानी पराभव केला.

  सर्वांच्या नजरा लागून राहिलेल्या सावंतवाडा, भगतवाडा प्रभागात माजी नगराध्यक्षा नीतू समीर देसाई या आपला गड राखण्यास समर्थ ठरल्या. त्यांनी नवख्या उमेदवार सनिजा देसाई याचा ५५ मतांनी पराभव केला. किंदळे वार्डातून रमाकांत नाईक गावकर यानी समर्थन दिलेल्या नवख्या उमेदवार अमिता चंद्रहास पागी यानी नवख्या उमेदवार रोशन सुशांत पागी याचा ५५ मतांनी पराभव केला.

  १) काणकोण पालिकेत नवा चेहरा म्हणून निवडून आलेले गंधेश मडगावकर, लक्ष्मण उर्फ़ बाकल पागी तसेच माजी नगराध्यक्ष सायमन रेबेलो, हेमंत नाईक गावकर, आमदार इज़िदोर फर्नाडिस व नंदिप भगत.

  २) पणसुले वॉर्डमधून निवडून आलेले नादीन फर्नाडिस यांच्यासमवेत विशाल देसाई, महादेव देसाई आणि इतर.

  ३) पाटणे वॉर्डमधून निवडून आलेले शुभम कोमरपंत.

  ४) पाळोळे देवाबागमधून निवडून आलेल्या सारा शंबा देसाई.

  ५) सावंतवाडा वॉर्डमधून निवडून आलेल्या माजी नगराध्यक्षा नीतू समीर देसाई.

  ६) चावडी वॉर्डमधून निवडून आलेले गाडीवरुन मिरवणुकीत सहभागी झालेले रमाकांत नाईक गावकर.

  ७) आपल्या समर्थकासमवेत माजी नगराध्यक्ष रमा नाईक गावकर.

 • 1 महिन्यांपूर्वी

  ‘कोण मनोज परब, मला नाही माहीत’

  वाळपई : पालिका निवडणुकांचा निकाल लागला. भाजपनं एक पालिका सोडली तर सगळीकडेच मुसंडी मारली. वाळपई पालिकेत पुन्हा एकदा राणेंची ताकद दिसून आली. यात महत्त्वाचं म्हणजे विश्वजीत राणेंनी पालिकेती राणे समर्थकांच्या विजयानंतर मतदारांचे आभार मानले. प्रलंबित कामं आणि दिलेली आश्वसनं पूर्ण करणार असल्याचं म्हटलं. तसंच निवडून आलेल्या उमेदवारांचं अभिनंदन करत कौतुकही केलं.

  ‘मला नाही माहीत’

  पत्रकारांशी संवाद साधत असतानाच विश्वजीत राणे यांनी कोरोना, राजकारण, पालिका निवडणुकांचे निकाल यावर भाष्य केलं. दरम्यान, याचवेळी गोवनवार्ता लाईव्हच्या प्रतिनिधींनी सध्या वाळपईत सुरु असलेल्या रिव्हॉल्यूशनरी गोवन्सच्या दारोदारी जाऊन केल्या जाणाऱ्या प्रचारावर प्रश्न विचारला. त्यावेळी विश्वजीत राणेंनी दिलेल्या उत्तरानं सगळ्यांच्याच भुवया उंचावल्यात. मनोज परब कोण आहे? मला माहीत नाही, असं म्हणत त्यांनी पलटवार केला.

  प्रचार करण्यापेक्षा काम केलेल्यांनाचा लोकं निवडणुकीच निवडणून देतात, असा टोलाही यावेळी आरोग्यमंत्री विश्वजीत राणेंनी लगावलाय. सध्या आरजीचं दारोदारी जाऊन कॅम्पेनिंग करण्याचं काम सुरु आहे. राज्यातील तरुणाईचा वाढता पाठिंबा पाहता आरजीबाबत आरोग्यमंत्री विश्वजीत राणेंना सवाल करण्यात आला होता. त्यावर त्यांनी दिलेल्या उत्तरावर चर्चांना उधाण आलंय.

 • 1 महिन्यांपूर्वी

  Video | CCP | पणजीत बाबुशच बादशाह.. असा साजरा केला विजय

 • 1 महिन्यांपूर्वी

  नणंद भावयज लढतीत पेडण्यात कुणी मारली बाजी? नात्यांमधील राजकीय चढाओढीत कोण वरचढ?

  पेडणे : पेडणे पालिकेचा निकाल लागला. या पालिकेत भाजपनं दणदणीत विजय मिळवला. पण पालिका निवडणुकीआधीपासून चुरशीची लढत पाहायला मिळेल अशी चर्चा रंगली ती सख्खी नाती राजकीय रिंगणात उतरल्यामुळे. या नात्यांमध्ये कुणी कुणावर मात केली, याकडे संपूर्ण पेडणे तालुक्याचं लक्ष लागलं होतं. मामा भाची, नणंद भावजय, अशा लढतींनी पेडण्याची निवडणूक आणखीनच रंगतदार केली होती.

  कुणाची बाजी?

  पेडणे पालिकेवर पूर्ण बहुमत भाजपाने मिळवलं. १० पैकी सहा उमेदवार विजयी झाले. निवडून आलेल्या दहाही नगरसेवकाकडून अपेक्षा वाढलेल्या आहेत. जे पराभूत झाले त्यांची कारणे पराभूत उमेदवारानांही माहीत आहे. मात्र या निवडणुकीतून प्रस्तापितांना धडा मिळालाय. दिग्गजांचा पराभव आणि बसलेले धक्के त्यातून पराभूत उमेदवारांना धडा घ्यावा लागेल. तसंच भाजपनेच भाजपचा पराभव केल्याचीही चर्चा पेडण्यात रंगली आहे. मामा भाची सून विजयी तर भाची पराभूत, भावजयेकडून नणंद पराभूत, भावजय दीर पराभूत असा प्रकार या निवडणुकीत पहायला मिळाला.

  हेही वाचा – पालिका अनेक, पण निकालाची लिंक एक! वाचा सगळे निकाल इथे

  कुणी धडा शिकवला?

  प्रकाश कांबळी व श्वेता कांबळी हे दीर भावजय या निवडणुकीत पराभूत झाले. तर विष्णू साळगावकर आणि नेहा आसोलकर मामा भाची पैकी मामा विजयी ठरलाय. शिवाय भाची सून राखी कशाळकर विजयी ठरल्याय. मात्र भाची नेहा आसोलकर पराभूत झाल्या. विशाखा गडेकर आणि शीतल कलंगुटकर या भावजय नणंद. राजकीय लढाईत उतरलेल्या या नात्यांमध्ये विशाखा गडेकर यांनी आपल्या नणंदेचा पराभव केलाय.

  हेही वाचा – साखळीत मुख्यमंत्र्यांना हारवणारा निकाल आला

 • 1 महिन्यांपूर्वी

  #ElectionResult | पालिका अनेक, पण निकालांची लिंक एक! वाचा सर्व पालिका आणि पोटनिवडणुकांचे निकाल

  पणजी महापालिकेत – येऊन येऊन येणार कोण? बाबुश मॉन्सेरात शिवाय आहेच कोण!

  पणजी महापालिकेत – येऊन येऊन येणार कोण? बाबुश मॉन्सेरात शिवाय आहेच कोण!

  भाजप पुरस्कृत – २५

  -वॉर्ड नं. 02 युवराज फुर्नांडिस,
  -वॉर्ड नं. 03 रोहित मॉन्सेरात
  -वॉर्ड नं. 04 कॅरोलिना पो
  -वॉर्ड नं. 05 शुभदा शिरगांवकर
  -वॉर्ड नं. 10 प्रसाद आमोणकर
  -वॉर्ड नं. 11 करण पारेख
  -वॉर्ड नं. 12 वर्षा शेटये
  -वॉर्ड नं. 13 प्रमेय माईणकर
  -वॉर्ड नं. 14 उदय मडकईकर
  -वॉर्ड नं. 15 शायनी चोपडेकर
  -वॉर्ड नं. 16 अस्मिता केरकर
  -वॉर्ड नं. 17 फ्रान्सिस जॉर्स
  -वॉर्ड नं. 18 आदिती चोपडेकर
  -वॉर्ड नं. 19 नरसिंह उर्फ निलेश मोरजकर
  -वॉर्ड नं. 20 शुभम चोडणकर
  -वॉर्ड नं. 21 मनीषा मणेरकर
  -वॉर्ड नं. 22 दिक्षा माईणकर
  -वॉर्ड नं. २४ प्रांजल नाईक
  -वॉर्ड नं. 25 संजिव नाईक
  -वॉर्ड नं. 26 वसंत आगशीकर
  -वॉर्ड नं. 27 लॉरेन डायस
  -वॉर्ड नं. 28 विठ्ठल चोपडेकर
  -वॉर्ड नं. 29 सिल्व्हेस्टर फर्नांडिस
  -वॉर्ड नं. 30 सॅन्ड्रा डिकुन्हा

  आमी पणजीकर -०४

  -वॉर्ड नं. १ नेल्सन काब्राल
  -वॉर्ड नं. 06 सुरेंद्र फुर्तादो,
  -वॉर्ड नं. 07 बेन्टो सिल्वेस्टर
  -वॉर्ड नं. 08 जोएल आंद्रात
  -वॉर्ड नं. 09 रुथ फुर्तादो

  अपक्ष – ०१

  -वॉर्ड नं. २३ संतोष सुर्लीकर


  वाळपई पालिका – राणेंची ताकद पुन्हा दिसली

  विश्वजीत राणे समर्थकांचं निर्विवाद वर्चस्व

  -वॉर्ड १ अनिल काटकर
  -वॉर्ड २ रामदास शिरोडकर
  -वॉर्ड ३ विनोद हळदणकर – अपक्ष
  -वॉर्ड ४ प्रसन्न गावस
  -वॉर्ड ५ इद्रूस शेख
  -वॉर्ड ६ शराफत खान
  -वॉर्ड ७ सरफराज सय्यद
  -वॉर्ड ८ निर्मला साखळकर
  -वॉर्ड ९ बी. सय्यद
  -वॉर्ड १० शहाजीन शेख


  पेडणे पालिका – भाजपचं वर्चस्व

  -वॉर्ड नंबर ०१ – मनोज हरमलकर – अपक्ष
  -वॉर्ड नंबर ०२ – अश्विनी पालयेकर – अपक्ष
  -वॉर्ड नंबर ०३ – राखी कशाळकर – भाजप पुरस्कृत
  -वॉर्ड नंबर ०४ – उषा नागवेकर – भाजप पुरस्कृत
  -वॉर्ड नंबर ०५ – विशाखा गडेकर – अपक्ष
  -वॉर्ड नंबर ०६ – तृप्ती सावळदेसाई – भाजप पुरस्कृत
  -वॉर्ड नंबर ०७ – शिवराज तुकोजी – अपक्ष
  -वॉर्ड नंबर ०८ – महादेव शेणवीदेसाई – भाजप पुरस्कृत
  -वॉर्ड नंबर ०९ – सिद्धेश पेडणेकर – भाजप पुरस्कृत
  -वॉर्ड नंबर १० – विष्णू साळगावकर – भाजप पुरस्कृत

  कुंकळळी – भाजपला धक्का

  भाजपचे फक्त ४ तर इतर काँग्रेस समर्थक विजयी

  -वॉर्ड नंबर 01 गौरी शेटकर
  -वॉर्ड नंबर 02 डिसुझा रेमंड
  -वॉर्ड नंबर 03 जमीरा पीरीस
  -वॉर्ड नंबर 04 रुपा गांवकर
  -वॉर्ड नंबर 05 लक्ष्मण नाईक – नगराध्यक्ष
  -वॉर्ड नंबर 06 जॉन जायस
  -वॉर्ड नंबर 07 सीसीलिया रॉड्रिग्स
  -वॉर्ड नंबर 08 पॉलिटा कार्नेरो
  -वॉर्ड नंबर 09 उद्देश नाईक-देसाई
  -वॉर्ड नंबर 10 राहुल देसाई
  -वॉर्ड नंबर 11 विशाल देसाई
  -वॉर्ड नंबर 12 लॅन्ड्री मॅस्करेनस
  -वॉर्ड नंबर 13 झेवियर्स वाझ – उपनगराध्यक्ष
  -वॉर्ड नंबर 14 विरेंद्र देसाई


  काणकोण नगरपालिका – कुठे कोण जिंकलं? वाचा सविस्तर यादी

  -वॉर्ड नंबर ०२ हेमंत नाईक गांवकर – भाजप पुरस्कृत
  -वॉर्ड नंबर ०२ रमाकांत नाईक गांवकर – भाजप पुरस्कृत
  -वॉर्ड नंबर ०३ सुप्रिया देसाई – भाजप पुरस्कृत
  -वॉर्ड नंबर ०४ पांडुरंग नाईक गांवकर – भाजप पुरस्कृत
  -वॉर्ड नंबर ०५ अमिता पागी – भाजप पुरस्कृत
  -वॉर्ड नंबर ०६ नादिन फर्नांडिस – भाजप पुरस्कृत
  -वॉर्ड नंबर ०७ गंदेश मडगांवकर – भाजप पुरस्कृत
  -वॉर्ड नंबर ०८ शुभम कोमरपंत – भाजप पुरस्कृत
  -वॉर्ड नंबर ०९ नितू देसाई – भाजप पुरस्कृत
  -वॉर्ड नंबर १० मारीयो (सायमन) रिबेलो – भाजप पुरस्कृत
  -वॉर्ड नंबर ११ सारा नाईक देसाई – भाजप पुरस्कृत
  -वॉर्ड नंबर १२ लक्ष्मण पागी – भाजप पुरस्कृत

  कुडचडे-काकोडा

  11 भाजप पुरस्कृत उमेदावारांचा विजय, स्वाभिमान पॅनेलचा एक तर एक अपक्ष उमेदवार विजयी

  -वॉर्ड नंबर 01 प्रमोद नाईक
  -वॉर्ड नंबर 02 दामोदर भेंडे
  -वॉर्ड नंबर 03 क्लेमेन्टीना फर्नांडिस
  -वॉर्ड नंबर 04 प्रदिप नाईक
  -वॉर्ड नंबर 05 जास्मिन ब्रागांझा
  -वॉर्ड नंबर 06 टॉनी कुतिनो
  -वॉर्ड नंबर 07 सुशांत नाईक
  -वॉर्ड नंबर 08 येलोंडा परेरा
  -वॉर्ड नंबर 09 रिमा एलिस
  -वॉर्ड नंबर 10 कार्मालिना मोराईस – आप पुरस्कृत
  -वॉर्ड नंबर 11 मंगलदास घाडी
  -वॉर्ड नंबर 12 अपर्णा प्रभूदेसाई
  -वॉर्ड नंबर 13 बाळकृष्ण शणै-होडारकर
  -वॉर्ड नंबर 14 रुचा वस्त

  डिचोली पालिकेत कमळ फुललं

  -विजयकुमार नाटेकर – भाजप पुरस्कृत वॉर्ड नं १
  -दिपा शिरगांवकर- भाजप पुरस्कृत वॉर्ड नं २
  -सुखदा तेली- भाजप पुरस्कृत वॉर्ड नंबर ३
  -दिपा पळ – भाजप पुरस्कृत वॉर्ड नं ४
  -निलेश टोपले – अपक्ष वॉर्ड नं ५
  रंजना वाईंगणकर – सावळ पॅनेल वॉर्ड नं ६
  अनिकेत चणेकर – भाजप पुरस्कृत वॉर्ड नं ७
  अर्पणा फोगेरी – सावळ पॅनेल वॉर्ड नं ८
  रियाझ बेग – भाजप पुरस्कृत वॉर्ड नं ९
  पांडुरंग कोरगावकर – व्हिजन वॉर्ड नं १०
  -राजाराम गांवकर – भाजप पुरस्कृत वॉर्ड नं ११
  -तनुजा गांवकर – भाजप पुरस्कृत वॉर्ड नं १२
  -पुंडलिक फलारी – भाजप पुरस्कृत वॉर्ड नं १३
  -सुदन गोवेकर – भाजप पुरस्कृत वॉर्ड नं १४


  ग्रामपंचायत पोटनिवडणूक

  -वेलिंग-प्रियोळमध्ये रणजीत प्रभूदेसाई विजयी
  -वेल्हा काणका निकॉल मार्टीन्स विजयी
  -पिसुर्लेत हिरबाराव राणेसरदेसाई विजयी
  -बस्तोड्यात सोनिया साळगावकर यांचा विजयी
  -ओशेलमध्ये प्रवीण कोचरेकर यांचा विजय
  -मेरशीत सुशांत गोवेकर आणि स्वप्नील आमोणकरचा विजय
  -सेंट लॉरेन्समध्ये दीपक गावस यांचा विजय
  -दिव्या वायंगणकर यांचा हरमलमध्ये विजय
  -कोरगावाता महादेव पालयेकर यांचा विजय
  -मोरजीत सुप्रीया पोके यांचा विजय
  -कारापूल-सर्वणमध्ये गोकुळदास सावंत यांचा विजय
  -संजय वायंगणकर यांचा मूळगावमधून विजय
  -भिरोंड्यातून निकीता नार्वेकर बिनविरोध
  -मावशीतून विठू वरक आणि कुंजल गावस विजयी
  -चिखली स्टेफिना लुकास बिनविरोध
  -असोल्णामध्ये आग्नेलो आफेन्सो विजयी
  -नावेलीतून आल्दरीज कुएओ विजयी
  -बाळ्ळी आडणेमध्ये प्रज्ञा फळदेसाई विजयी
  -भाटीमध्ये राजेंद्र नाईक यांचा विजय
  -रिवणमधून प्रकाश गांवकर बिनविरोध

  नावेली झेडपी पोटनिवडणूक –

  अपक्ष उमेदवार ऍडवीन कार्दुझो उर्फ सिप्रु यांचा नावेली झेडपीत विजय

  हेही वाचा – होमग्राऊंडवर मुख्यमंत्री फेल! साखळी पोटनिवडणुकीत मुख्यमंत्र्यांना धक्का

 • 1 महिन्यांपूर्वी

  निकाल स्पष्ट, भाजपचीच सरशी

  पालिका निवडणुका आणि पोटनिवडणुकांचे निकाल स्पष्ट
  एक नगरपालिका सोडून सगळीकडे भाजपची मुसंडी
  सीसीपीमध्ये पुन्हा घुमला बाबुश मॉन्सेरात यांचा आवाज
  एकमेव कुंकळी नगरपालिकेत काँग्रेसचा दबदबा
  होमग्राऊंडवर मुख्यमंत्री अपयशी, साखळीत धक्का
  साखळी पोटनिवडणुकी सगलानी गटाची बाजी
  18 ग्रामपंचायत पोटनिवडणुकांमध्ये भाजपची सरशी
  पणजी महापौरपदाची माळ मॉन्सेरात सुपुत्राच्या गळ्यात?
  नावेली झेडपीमध्ये अपक्ष उमेदवार सिप्रुंचा विजय
  निकाल येताच कुंकळीचे नगराध्यक्ष, उपनगराध्यक्षही ठरले

 • 1 महिन्यांपूर्वी

  VIDEO | Politics | नावेली ZP विजयी उमेदवारांची पहिली प्रतिक्रिया

 • 1 महिन्यांपूर्वी

  VIDEO | POLITICS | मुख्यमंत्र्यांची पालिका निवडणुकांवर पहिली प्रतिक्रिया

 • 1 महिन्यांपूर्वी

  VIDEO | Politics | काणकोणचे विजयी उमेदवार सायमन रिबेलो

 • 1 महिन्यांपूर्वी

  VIDEO | Politics | डिचोलीतील विजयी उमेदवारांचा जल्लोष

 • 1 महिन्यांपूर्वी

  Exclusive | होमग्राऊंडवर फेल झाल्यानंतर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया, पालिका निवडणुकांवर काय म्हणाले? ऐका

  हेही वाचा – साखळी पालिकेवर मुख्यमंत्र्यांचा जराही होल्ड नसल्याचं निकालातून उघड

 • 1 महिन्यांपूर्वी

  कुडचडे-काकोडा, वॉर्ड नंबर ११ सोडला तर सगळे निकाल हाती, वाचा कुठे कोण जिंकलं?

  वॉर्ड नंबर 01 प्रमोद नाईक
  वॉर्ड नंबर 02 दामोदर भेंडे
  वॉर्ड नंबर 03 क्लेमेन्टीना फर्नांडिस
  वॉर्ड नंबर 04 प्रदिप नाईक
  वॉर्ड नंबर 05 जास्मिन ब्रागांझा
  वॉर्ड नंबर 06 टॉनी कुतिनो
  वॉर्ड नंबर 07 सुशांत नाईक
  वॉर्ड नंबर 08 येलोंडा परेरा
  वॉर्ड नंबर 09 रिमा एलिस
  वॉर्ड नंबर 10 कार्मालिना मोराईस
  वॉर्ड नंबर 11
  वॉर्ड नंबर 12 अपर्णा प्रभूदेसाई
  वॉर्ड नंबर 13 बाळकृष्ण शणै-होडारकर
  वॉर्ड नंबर 14 रुचा वस्त

 • 1 महिन्यांपूर्वी

  काणकोण नगरपालिका – कुठे कोण जिंकलं? वाचा सविस्तर यादी

  काणकोण नगरपालिका – कुठे कोण जिंकलं? वाचा सविस्तर यादी

  वॉर्ड नंबर 01 हेमंत नाईक गांवकर
  वॉर्ड नंबर 02 रमाकांत नाईक गांवकर
  वॉर्ड नंबर ०३ सुप्रिया देसाई
  वॉर्ड नंबर ०४ पांडुरंग नाईक गांवकर
  वॉर्ड नंबर ०५ अमिता पागी
  वॉर्ड नंबर ०६ नादिन फर्नांडिस
  वॉर्ड नंबर ०७ गंदेश मडगांवकर
  वॉर्ड नंबर ०८ शुभम कोमरपंत
  वॉर्ड नंबर ०९ नितू देसाई
  वॉर्ड नंबर १० मारीयो (सायमन) रिबेलो
  वॉर्ड नंबर ११ सारा नाईक देसाई
  वॉर्ड नंबर १२ लक्ष्मण पागी

 • 1 महिन्यांपूर्वी

  कुंकळळी नगरपालिका – सर्व जागांचे निकाल हाती! वाचा कुठे कोण जिंकलं?

  भाजपला कुंकळ्ळीत हादरा बसला आहे. कुंकळ्ळीत भाजपचा आमदार असला तरी त्याचा पालिकेवर होल्ड नसल्याची चर्चा रंगली आहे. कारण काँग्रेस समर्थक उमेदवारांनी कुंकळी नगरपालिकेत विजयी झेंडा फडकावलाय. कुंकळीत भाजप पुरस्कृत ४ उमेदवार निवडून आलेत. तर इतर काँग्रेस समर्थकांंचा विजय झालाय.

  वॉर्ड नंबर 01 गौरी शेटकर
  वॉर्ड नंबर 02 डिसुझा रेमंड
  वॉर्ड नंबर 03 जमीरा पीरीस
  वॉर्ड नंबर 04 रुपा गांवकर
  वॉर्ड नंबर 05 लक्ष्मण नाईक
  वॉर्ड नंबर 06 जॉन जायस
  वॉर्ड नंबर 07 सीसीलिया रॉड्रिग्स
  वॉर्ड नंबर 08 पॉलिटा कार्नेरो
  वॉर्ड नंबर 09 उद्देश नाईक-देसाई
  वॉर्ड नंबर 10 राहुल देसाई
  वॉर्ड नंबर 11 विशाल देसाई
  वॉर्ड नंबर 12 लॅन्ड्री मॅस्करेनस
  वॉर्ड नंबर 13 झेवियस वाझ
  वॉर्ड नंबर 14 विरेंद्र देसाई

 • 1 महिन्यांपूर्वी

  पणजी महापालिकेत – येऊन येऊन येणार कोण? बाबुश मॉन्सेरात शिवाय आहेच कोण!

  भाजप पुरस्कृत – २५

  वॉर्ड नं. 02 युवराज फुर्नांडिस,
  वॉर्ड नं. 03 रोहित मॉन्सेरात
  वॉर्ड नं. 04 कॅरोलिना पो
  वॉर्ड नं. 05 शुभदा शिरगांवकर
  वॉर्ड नं. 10 प्रसाद आमोणकर
  वॉर्ड नं. 11 करण पारेख
  वॉर्ड नं. 12 वर्षा शेटये
  वॉर्ड नं. 13 प्रमेय माईणकर
  वॉर्ड नं. 14 उदय मडकईकर
  वॉर्ड नं. 15 शायनी चोपडेकर
  वॉर्ड नं. 16 अस्मिता केरकर
  वॉर्ड नं. 17 फ्रान्सिस जॉर्स
  वॉर्ड नं. 18 आदिती चोपडेकर
  वॉर्ड नं. 19 नरसिंह उर्फ निलेश मोरजकर
  वॉर्ड नं. 20 शुभम चोडणकर
  वॉर्ड नं. 21 मनीषा मणेरकर
  वॉर्ड नं. 22 दिक्षा माईणकर
  वॉर्ड नं. २४ प्रांजल नाईक
  वॉर्ड नं. 25 संजिव नाईक
  वॉर्ड नं. 26 वसंत आगशीकर
  वॉर्ड नं. 27 लॉरेन डायस
  वॉर्ड नं. 28 विठ्ठल चोपडेकर
  वॉर्ड नं. 29 सिल्व्हेस्टर फर्नांडिस
  वॉर्ड नं. 30 सॅन्ड्रा डिकुन्हा

  आमी पणजी -०४

  वॉर्ड नं. १ नेल्सन काब्राल
  वॉर्ड नं. 06 सुरेंद्र फुर्तादो,
  वॉर्ड नं. 07 बेन्टो सिल्वेस्टर
  वॉर्ड नं. 08 जोएल आंद्रात
  वॉर्ड नं. 09 रुथ फुर्तादो

  अपक्ष – ०१

  वॉर्ड नं. २३ संतोष सुर्लीकर

 • 1 महिन्यांपूर्वी

  साखळी पोटनिवडणुकीत मुख्यमंत्री प्रमोद सावंतांना मोठा धक्का

  साखळी : साखळी हा खरंतर मुख्यमंत्री डॉक्टर प्रमोद सावंत यांचा मतदारसंघ. मात्र आपल्याच मतदारसंघात मुख्यमंत्र्यांना पोटनिवडणुकीच्या निकालानं हादरा दिलाय. साखळी नगरपालिका पोटनिवडणुकीमध्ये सगलानी गटाचे उमेदवार विजयी झाले आहेत. अवघ्या १८ मतांनी त्यांचा विजय झाला आहे. या विजयानं भाजपची साखळी नाचक्की झाली असल्याची चर्चा रंगली आहे. त्यामुळे हा पराभव मुख्यमंत्र्यांचा जिव्हारी लागणार असल्याचं जाणकार सांगतात

  आगामी विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर साखळीतील धक्कादायक निर्णयानं राजकीय वातावरण ढवळून निघालं आहे. पालिका निवडणुकांमध्ये एकीकडे भाजपनं पणजी पालिका राखली. डिचोली, पेडण्यासह वाळपईतही आपली ताकद आणि वर्चस्व राखण्यात भाजपच्या ज्येष्ठ नेत्यांना आणि मंत्र्यांना यश आलंय. मात्र दुसरीकडे मुख्यमंत्र्यांच्या स्वतःच्याच मतदारसंघाच झालेल्या पोटनिवडणुकीतील पराभवानं राजकीय चर्चांना उधाण आलं आहे.

  आता मुख्यमंत्री काय करणार?

  संपूर्ण साखळी मतदार संघावरती मुख्यमंत्री डॉक्टर प्रमोद सावंत यांचं वर्चस्व असलं तरी साखळी नगरपालिका मात्र त्यांना आपल्या बाजूनं आणण्यात अपयश आलंय. साखळी नगरपालिकेवरती सगलानी यांनी या पोटनिवडणुकीच्या निमित्तानं पुन्हा एकदा आपलं वर्चस्व प्रस्थापित करुन आगामी विधानसभा निवडणुकीमध्ये आपणच मुख्यमंत्री पदाचे दावेदार असल्याचं याआधीच वेळोवेळी सांगितलेलं आहे. मात्र साखळी पोटनिवडणुकीतील पराभवामुळे प्रमोद सावंत यांच्या मुख्यमंत्रिपदालाही धक्का लागणार की काय, अशीही कुजबूज सुरु झाली आहे. भाजपची अंतर्गत गटबाजी पणजी पालिकेत चव्हाट्यावर आली. आता विधानसभेसाठी भाजपमध्ये अंतर्गत कलह तर होणार नाही ना, अशी शंका साखळी पोटनिवडणुकीच्या निमित्तानं घेतली जाते आहे.

 • 1 महिन्यांपूर्वी

  डिचोली पालिकेत कमळ फुललं! वाचा कुठे कोण जिंकलं?

  विजयकुमार नाटेकर – भाजप पुरस्कृत वॉर्ड नं १
  दिपा शिरगांवकर- भाजप पुरस्कृत वॉर्ड नं २
  दिपा पळ – भाजप पुरस्कृत वॉर्ड नं ४
  निलेश टोपले – अपक्ष वॉर्ड नं ५
  रंजना वाईंगणकर – सावळ पॅनेल वॉर्ड नं ६
  अनिकेत चणेकर – भाजप पुरस्कृत वॉर्ड नं ७
  अर्पणा फोगेरी – सावळ पॅनेल वॉर्ड नं ८
  रियाझ बेग – भाजप पुरस्कृत वॉर्ड नं ९
  पांडुरंग कोरगावकर – व्हिजन वॉर्ड नं १०
  कुंदर फुलारी – भाजप पुरस्कृत वॉर्ड नं १३
  सुदर गोवेकर – भाजप पुरस्कृत वॉर्ड नं १४

 • 1 महिन्यांपूर्वी

  वाळपई पालिका – निकाल आला, राणेंची ताकद पुन्हा दिसली

  विश्वजीत राणे समर्थकांचं निर्विवाद वर्चस्व

  वॉर्ड १ अनिल काटकर
  वॉर्ड २ रामदास शिरोडकर
  वॉर्ड ३ विनोद हळदणकर
  वॉर्ड ४ प्रसन्न गावस
  वॉर्ड ५ इद्रूस शेख
  वॉर्ड ६ शराफत खान
  वॉर्ड ७ सरफराज सय्यद
  वॉर्ड ८ निर्मला साखळकर
  वॉर्ड ९ बी. सय्यद
  वॉर्ड १० शहाजीन शेख

 • 1 महिन्यांपूर्वी

 • 1 महिन्यांपूर्वी

  पेडणे पालिका – कोण कोण जिंकलं? वाचा सविस्तर यादी

  वॉर्ड नंबर ०१ – मनोज हरमलकर – अपक्ष
  वॉर्ड नंबर ०२ – अश्विनी पालयेकर – अपक्ष
  वॉर्ड नंबर ०३ – राखी कशाळकर – भाजप पुरस्कृत
  वॉर्ड नंबर ०४ – उषा नागवेकर – भाजप पुरस्कृत
  वॉर्ड नंबर ०५ – विशाखा गडेकर – अपक्ष
  वॉर्ड नंबर ०६ – तृप्ती सावळदेसाई – भाजप पुरस्कृत
  वॉर्ड नंबर ०७ – शिवराज तुकोजी – अपक्ष
  वॉर्ड नंबर ०८ – महादेव शेणवीदेसाई – भाजप पुरस्कृत
  वॉर्ड नंबर ०९ – सिद्धेश पेडणेकर – भाजप पुरस्कृत
  वॉर्ड नंबर १० – विष्णू साळगावकर – भाजप पुरस्कृत

 • 1 महिन्यांपूर्वी

 • 1 महिन्यांपूर्वी

 • 1 महिन्यांपूर्वी

  पाहा LIVE निकाल | पालिका निवडणुकांचे वेगवान अपडेट्स

 • 1 महिन्यांपूर्वी

  मतमोजणीला सुरुवात

  आज पालिका निवडणुकांचा निकाल
  राज्याला उत्सुकता निवडणुकांच्या निकालाची
  पणजी महापालिकेत कोण मारणार बाजी?
  उत्तर गोव्यातील पालिकांवर कुणाचा विजयी झेंडा?
  दक्षिण गोव्यात कोण उधळणार विजयी गुलाल?
  बंडखोर आमदारांच्या अपात्रतेवर आज सुनावणी
  सभापती राजेश पाटणेकर घेणार अंतिम सुनावणी
  अंतिम सुनावणीनंतर लगेच निर्णय येण्याची शक्यता
  राज्याच्या राजकारणातला आज मोठा दिवस
  सकाळी 8 वाजल्यापासून मतमोजणीला सुरुवात

 • 1 महिन्यांपूर्वी

  बंडखोर आमदारांच्या अपात्रतेवर आजच निकाल येणार?

  ब्युरो : राज्याच्या राजकारणातली मोठी बातमी आज येण्याची शक्यता आहे. कारण आज सभापती राजेश पाटणेकर बंडखोर आमदारांच्या अपात्रतेवर अंतिम सुनावणी घेणार आहेत. या सुनावणीनंतर निकाल येण्याचीही शक्यता वर्तवली जाते आहे. त्यामुळे आजच अपात्रतेचा निकाल लागणार का, याकडे संपूर्ण राज्याचं लक्ष लागलेलं असणार आहे.

  काँग्रेस आणि मगोतून भाजपात गेलेल्या आमदारांच्या अपात्रता याचिकेवर सभापती राजेश पाटणेकर आजअंतिम सुनावणी घेणार असल्याचं निश्चित झालं होतं. त्यासाठी काँग्रेस आणि मगोच्या नेत्यांना त्यांनी आपली बाजू मांडण्यासाठी बोलावल्याचंही खात्रीलायक वृत्त शनिवारीच हाती आलेलं. महत्त्वाचं म्हणजे आजच दिवशी बंडखोर आमदारांच्या पात्र-अपात्रतेवर निर्णय होतो का, हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे.

  काय आहे नेमकं प्रकरण?

  २०१७ च्या विधानसभा निवडणुकीत सर्वाधिक आमदार निवडून आलेल्या काँग्रेसला सत्तेपासून दूर ठेवत गोवा फॉरवर्ड आणि मगोची साथ घेऊन भाजपने राज्यात आघाडी सरकार स्थापन केलं. पण त्यानंतर २०१९ मध्ये झालेल्या पोटनिवडणुकांनंतर तत्कालीन विरोधी पक्षनेते बाबू कवळेकर यांच्यासह काँग्रेसच्या दहा आणि मगोच्या दोन आमदारांना पक्षात प्रवेश देऊन भाजपने गोवा फॉरवर्ड आणि मगोला सरकारातून बाहेर काढलं. फुटीर आमदारांनी आपापले पक्षच भाजपात विलीन केल्याचा दावा केल्यानंतर काँग्रेस प्रदेशाध्यक्ष गिरीश चोडणकर आणि मगोचे ज्येष्ठ आमदार सुदिन ढवळीकर यांनी फुटीर आमदारांना अपात्र करण्यासंदर्भातील याचिका सभापतींकडे दाखल केली. पण बराच काळ सभापतींनी त्यावर सुनावण्या न घेतल्याने चोडणकर आणि ढवळीकर सर्वोच्च न्यायालयात गेले होते.

  आज पालिकांचाही निकाल

  आजच पालिका निवडणुकांचाही निकाल लागणार आहे. त्यासाठी आज मतदान सुरु आहे. त्यामुळे पालिकांचा निकाल आणि अपात्रतेचा निकाल, एकाच दिवशी लागतो का, याची उत्सुकता राज्यातील जनतेला आता लागली आहे.

  हेही वाचा – पालिका निवडणुकांचे लाईव्ह अपडेट्स वाचण्यासाठी इथे क्लिक करा.

 • 1 महिन्यांपूर्वी

  नावेली झेडपीवर कुणाचा झेंडा फडकणार?

  नावेली झेडपीसाठी 57.52 टक्के मतदान, नावेली झेडपीचा निकाल आज लागणार, निकालात काँग्रेस बाजी मारणार की भाजप, याची उत्सुकता

 • 1 महिन्यांपूर्वी

  महापौर बनणार की नाही, हे वडील ठरवणार

  मी महापौर बनणार की नाही, हे वडील ठरवणार, विधानसभेचा सध्यातरी विचार नाही, पणजीचे आमदार बाबूश मॉन्सेरात यांचा मुलगा रोहित मोन्सेरात यांचं वक्तव्, तूर्तास महापालिकेसाठीच काम करण्याचा रोहित मॉन्सेरात यांचा निश्चय

 • 1 महिन्यांपूर्वी

  पणजीचा गड कोण राखणार?

  सर्व 30 जागा जिंकण्याचा पणजीचे आमदार बाबूश मॉन्सेरात यांना विश्वास, कुणाच्याही पाठिंब्याची आम्हाला गरज नाही, बाबुश मॉन्सेरात यांचं वक्तव, तर महापौरपद कुणाला द्यायचं याचा निर्णय पक्ष घेण्यार असल्याचाही माहिती

  व्हिडीओ पाहण्यासाठी इथे क्लिक करा.

 • 1 महिन्यांपूर्वी

  आज पालिकांचा निकाल, कुठे किती झालं होतं मतदान?

  पणजी महापालिकेसाठी एकूण ७०.१९% मतदान, पणजी महापालिकेत कोण बाजी मारणार याकडे संपूर्ण राज्याची नजर

  डिचोली पालिकेसाठी तब्बल ८७.९६% मतदान

  पेडणे पालिकेसाठी सर्वाधिक मतदान, तब्बल ९१.०२% मतदानाची पेडण्यात नोंद,

  वाळपईमध्ये ८५.५०% टक्के मतदानाची नोंद,

  काणकोण पालिकेत ८६.८८% मतदानाची नोंद

  कुडचडे – काकोड्यात ८०.२४% मतदान

  कुंकळ्ळीमध्ये ७६.३५% मतदानाची नोंद, 14 जागांसाठी एकूण 66 उमेदवार पालिका निवडणुकीच्या रिंगणात

 • 1 महिन्यांपूर्वी

  Photo Story | दिग्गजांची अग्निपरीक्षा, आता प्रतीक्षा परीक्षेच्या निकालाची

  पणजीत तर आपलीच!

  आमदार टोनी रावडी स्टाईलमध्ये

  पहिलाच अनुभव… लोकशाहीच्या सगळ्यात मोठ्या उत्सवाचा

  पहिला असो की शेवटचा.. मतदानाचा हक्क महत्त्वाचा

  दिव्यांगांही मागे नाहीत

  मतदानासाठी खडतर प्रवास

  कोरोनाच्या सावटाच थर्मल स्कॅनिंग

  मतप्रक्रियेचे सोपस्कार

  ओळखपत्र आणलंय ना?

  दाग अच्छे है…

  मतदानासाठी प्रतीक्षा

  ओळख तपासणी

  करके देखो.. अच्छा लगता है..

  मतदारांचं काम संपलं, आपलं सुरु झालं

  दिग्गजांची प्रतीष्ठा मतपेटीत कैद

  लाखमोलाची गोष्ट, मोठी जबाबदारी

  निवडणूक प्रक्रिया राबवणारे हिरो

  हुश्श… एक टास्की संपली एकदाची!

  थोडं थांबा, उद्या काय ते कळेल फायनल!

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.
error: Content is protected !!