‘टी20 वर्ल्ड कप’पूर्वी जागतिक क्रिकेटमधील स्टार खेळाडूची निवृत्ती

सोशल मीडियाद्वारे दिली माहिती

Goan Varta Live | प्रतिनिधी

मुंबई: आगामी टी 20 क्रिकेट विश्वचषकाला महिनाभराचा कालावधी शिल्लक राहिला असताना जागतिक क्रिकेटमधील एका मोठ्या नावाने क्रिकेटमधून निवृत्ती घेण्याचा निर्णय घेतला आहे. हा खेळाडू म्हणजे झिम्बाब्वेचा स्टार क्रिकेटपटू ब्रेंडन टेलर. टेलरने 2004 पासून ते आतापर्यंत म्हणजे तब्बल 17 वर्षांनंतर आंतरराष्ट्रीय क्रिकेटला अलविदा केलं आहे. झिम्बाब्वेचा 34 वर्षीय माजी कर्णधार टेलर सोमवारी (13 सप्टेंबर) आयर्लंडविरुद्धच्या सामन्यानंतर निवृत्ती घेणार असल्याचं त्याने सोशल मीडियाद्वारे सांगितलं.

‘मी कायम या उत्तम कारकिर्दीबद्दल सर्वांचा ऋणी राहिन’

टेलरने त्याच्या पोस्टला दिलेल्या कॅप्शनमध्ये ‘मी कायम या उत्तम कारकिर्दीबद्दल सर्वांचा ऋणी राहिन’ असं लिहिलं आहे. त्याने या पोस्टमध्ये स्वत:चा एक मैदानातील फोटो शेअर केला आहे. सोबतच एक भावूक पोस्टही लिहिली आहे. ज्यात मी अतिशय जड मनाने हा निर्णय़ घेत असल्याचं म्हटलं आहे. तसंच 17 वर्षाच्या कारकिर्दीचाही त्याने थोडक्यात उल्लेख करतही पोस्ट लिहिली आहे.

टेलरची क्रिकेट कारकिर्द

2004 साली आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पहिला सामना खेळणाऱ्या टेलरने झिम्बाब्वे संघाला अनेक महत्त्वाचे विजय मिळवून दिले. त्याने कारकिर्दीत 204 सामन्यांमध्ये 6,677  एकदिवसीय धावा केल्या असून यामध्ये तब्बल 11 एकदिवसीय शतकं आणि 39 अर्धशतकं आहेत. तर कसोटी क्रिकेटचा विचार करता त्याने 34 कसोटी सामन्यांमध्ये 2 हजार 320 धावा केल्या आहेत. ज्यामध्ये 6 शतकांसह 12 अर्धशतकांचा समावेश आहे. टेलरने आतापर्यंत भारताविरुद्ध उत्तम फलंदाजी केली असून एका डावात 135 धावाही ठोकल्य आहेत.

https://twitter.com/BrendanTaylor86/status/1437132403760320521/photo/1
ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.
error: Content is protected !!