Video | पोलार्डची तुफान फटकेबाजी, 6 बॉलमध्ये 6 सिक्स ठोकले पाहा व्हिडीओ

धमाकेदार फलंदाजीचा जबरदस्त नजराणा

सचिन खुटवळकर | प्रतिनिधी

अँटिग्वा : विस्फोटक फलंदाज कायरन पोलार्डच्या तुफानी फटकेबाजीचा नजराणा क्रिकेटप्रेमींना काल पुन्हा एकदा पाहायला मिळाला. श्रीलंकेविरुद्ध झालेल्या पहिल्या टी-२० सामन्यात पोलार्डने जबरदस्त खेळ करताना सहा चेंडूत सहा षटकार ठोकले.

त्याबरोबरच त्याने आंतरराष्ट्रीय टी-२० क्रिकेटमध्ये अशी कामगिरी करणाऱ्या युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी केली. पोलार्डच्या या कामगिरीच्या जोरावर पहिल्या सामन्यात वेस्ट इंडिजने श्रीलंकेला ४१ चेंडू आणि चार विकेट्स राखत पराभूत केले.

या सामन्यात वेस्ट इंडिजने ४१ चेंडू आणि ४ विकेट राखून विजय मिळवला. पोलार्डने टॉस जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. लंकेला २० षटकात १३१ धावा करता आल्या.

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.
error: Content is protected !!