सायलन्ट चॅम्पियनमध्ये झीलतावाडी येथील कुळगतीपुरूष संघाची बाजी

Goan Varta Live | प्रतिनिधी
मोरपीर्ला: मोरपीर्ला येथील सायलन्ट स्पोर्ट्स क्लबने आयोजित केलेल्या 13 व्या व्हॉलिबॉल स्पर्धेतील सायलन्ट चॅम्पियन ट्रॉफी झीलतावाडी येथील कुळगतीपुरूष संघाने पटकावली. मोरपीर्ला येथील शाबा मैदानावर आयोजित केलेल्या या स्पर्धेच्या अंतिम सामन्यात असोल्डे येथील अष्टविनायक स्पोर्ट्स क्लबचा 15-13 व 15-11 असा पराभव केला. या स्पर्धेत एकुण 29 संघांनी भाग घेतलेला.
बक्षिस वितरण समारंभास प्रमुख पाहुणे म्हणून मैदानाचे मालक शाबा वेळीप,क्लबचे अध्यक्ष धीरज वेळीप, उपअध्यश फोंडू वेळीप, सचिव राजेंद्र वेळीप, खजिनदार पाईक गांवकर, स्पोर्ट्स सचिव आदित्य वेळीप, संजय गांवकर, संतोष वेळीप, संदिप वेळीप, उदेश वेळीप व इतर सदस्य उपस्थित होते.
उदघाटन सोहळ्यात प्रमुख पाहुणे म्हणून संरपंच प्रकाश वेळीप. माजी संरपंच खुशाली वेळीप, समाजसेवक समीर वेळीप, देवस्थान अध्यक्ष लक्ष्मण वेळीप, देवस्थान सदस्य शाबा वेळीप व क्लबचे सदस्य उपस्थित होते.
विजेत्या संघाला रोख 10013 व सायलन्ट चॅम्पियन ट्रॉफी देण्यात आली. उपविजेत्या संघाला रोख 7013 व चषक, उपांत्य फेरीत पराभव झालेल्या सप्तकोटेश्वर कर्वे व मोरपीर्ला सनराईजर स्पोर्ट्स क्लबला प्रत्येकी रोख 1513 देण्यात आले. स्पर्धेतील उत्कृष्ट स्मॅशर झीलतावाडी संघाचा अमरेश वेळीप तर लिफ्टर म्हणून अष्टविनायकचा रोहित वेळीप यांची निवड झाली.