Video | भर मैदानातच श्रीलंकेचे क्रिकेट कोच आणि कॅप्टनमध्ये बाचाबाची

दुसऱ्या वनडेतील पराभवानंतर गरमागरमी

सिध्देश सावंत | प्रतिनिधी

ब्युरो : श्रीलंकेविरुद्धचा दुसरा वनडे सामना भारताने जिंकला. खरंतर या सामन्यात श्रीलंकेचं वर्चस्व होतं. पण अखेरच्या टप्प्यात भुवनेश्वर कुमार आणि दीपक चहरने कमाल फलंदाजी करत भारताला विजय मिळवून दिला. ३ विकेट्स राखून थरारक विजय मिळवल्यानंतर श्रीलंकेचा क्रिकेट संघ चांगलाच निराश झाला. ही निराशा भर मैदानातही पाहायला मिळाली.

श्रीलंकेच्या क्रिकेट संघाचे कोच आणि कॅप्टन यांच्यात झालेल्या बाचाबाची कॅमेऱ्यातही कैद झाली. श्रीलंकेचे कोच मिकी ऑर्थर (Mickey Arthur) परभवानंतर चांगलेच नाराज आले. भारताच्या प्रत्येक विकेटनंतर कोच मिकी ऑर्थर हुरळून जात होते. मात्र भारताच्या विजयानंतर त्यांचा चेहराच उतरला. पराभवामुळे लालबुंद झालेले कोच ऑर्थर हे भर मैदानातच श्रीलंकेचा कर्णधार दासुन शनाकाशी (Dasun Shanaka) भिडले.

या दोघांच्या बाचाबाचीचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झालाय. या व्हिडीओमध्ये मिकी ऑर्थर आणि दासुन शनाका हे एकमेकांशी हुज्जत घालताना दिसत आहेत. ऑर्थर हे कर्णधार शनाकाला काहीतरी जाब विचारत आहे असं दिसत आहे. मात्र शनाका त्यांना समजावत आहे. मात्र तणतण करत ऑर्थर हे मैदानाबाहेर गेले.

हेही वाचा : Video | अप्रतिम कॅच पाहून आनंद महिंद्राही म्हणाले, ही तर सुपरवुमन

दुसरीकडे या व्हिडीओवर श्रीलंकेच्या माजी खेळाडूनंही नाराजी व्यक्त केली आहे. या व्हिडीओनंतर श्रीलंकेचा माजी दिग्गज खेळाडू रसेल आर्नोल्डने ट्वीट करुन नाराजी दर्शवलीये. कोच आणि कर्णधारामधील अशाप्रकारचा संवाद हा मैदानात नाही तर ड्रेसिंग रुममध्ये व्हायला हवा, असं आर्नोल्ड म्हणालाय.

श्रीलंकेविरुद्धच्या दुसऱ्या वनडेत भारताने श्रीलंकेवर 3 विकेट्सने मात केली. दीपक चाहरने 82 चेंडूत 69 धावांची मॅच विनिंग खेळी साकारली. तर सूर्यकुमार यादवनेदेखील (53) अर्धशतकी खेळी करत आपलं योगदान दिलं. सूर्यकुमार यादव आणि दीपक चाहरच्या संयमी खेळीच्या जोरावर भारताने श्रीलंकेने दिलेलं 275 धावांचं आव्हान 3 विकेट्स आणि 5 चेंडू राखत पूर्ण केलं. या विजयासह भारताने तीन एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेत 2-0 ने विजयी आघाडी घेतली.

हेही वाचा : ख्रिस्तीयानो रोनाल्डोची ‘कीक’ ‘कोकाकोला’च्या वर्मी..!

पाहा व्हिडीओ –

हेही वाचा : पुन्हा ‘मौका मौका’; टी20 विश्वचषकात भारत-पाकिस्तान लढत

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.
error: Content is protected !!