Video | ऐतिहासिक विजयानंतरचे अंगावर काटा आणणारे क्षण कॅमेऱ्यात कैद

शानदार... जबरदस्त... जिंदाबात...

सिध्देश सावंत | प्रतिनिधी

स्टार खेळाडू नसताना ऑस्ट्रेलियाला ऑस्ट्रेलियात हरवणं, हे वाटतं तितकं सोप्पं नाही. म्हणून हा विजय खास आहे. पाहा व्हिडीओ, विजयनंतरचा टीम इंडियाचा जल्लोष – सौजन्य बीसीसीआय

बूम बूम बुमराहचं विजयानंतर ट्वीट

कधीच विसरता येणार नाही, असा हा विजय आहे. संपूर्ण टीमनं अभिमानास्पद कामगिरी केली आहे. जय हिंद.

मास्टर ब्लास्टरनंही केलं कौतुक

देशातच नाही तर जगात प्रत्येकानं एक गोष्ट लक्षात ठेवा. ३६ किंवा त्यापेक्षा कमी रन जरी केले तरी तिथं जग संपत नाही. पुढे जाण्यासाठीच कधीकधी मागे खेचले जातो आपण. आणि जेव्हा तुम्ही जिंकता, तेव्हा तुम्ही कुणामुळे जिंकला आणि कशामुळे जिंकलात हे केव्हाही विसरुन जाऊ नका.

नवा कॅप्टन कूल अजिंक्य म्हणतो…

पंत चमकला

चौथ्या आणि अखेरच्या सामन्यात पंतनं जबरदस्त कामगिरी केली. या सामन्यात त्याने दोन्ही डावांत ऑस्ट्रेलियाविरुद्ध जबरदस्त फलंदाजी करत भारताला विजय मिळून दिला. ६८.५च्या सरासरीनं ऋषभ पंतनं २७४ धावा केल्यात. यात त्यानं दोन अर्धशतकं झळकावलीत. तर त्याच्या स्ट्राईक रेटही ६९पेक्षा जास्त होता.

वो साल दुसरा था.. ये साल दुसरा है…

डिसेंबर महिन्यातलीच गोष्ट आहे. भारताला अवघ्या ३६ धावांत ऑस्ट्रेलियानं गुंडाळलं होतं. त्यानंतर खचलेल्या टीमला आता मालिका जिंकणं तर दूर, पण किमान स्तरतरी राखता येईल का अशी शंका घेतली जात होती. त्या संघानं स्टार खेळाडू नसताना जबरदस्त कामगिरी केली. योगायोग म्हणजे बरोबर १९ डिसेंबरला टीम इंडियाला लाजीरवाणा पराभव स्वीकारावा लागला होता. तर बरोबर महिन्याभरानं म्हणजेच १९ जानेवारीला बरोबर भारतानं बदला घेत ऐतिहासिक विजयाची नोंद केली.

पाहा व्हिडीओ

…आणि पंतनं भारताच्या विजयावर शिक्कामोर्तब केलं

शुभमन गिलनं मारलेला तो सिक्स नाही पाहिला?

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.
error: Content is protected !!