CSK; क्वालिफाय होण्यासाठी असं असेल गणित

आज रंगणार चेन्नई विरुद्ध मुंबईचा सामना

Goan Varta Live | प्रतिनिधी

शारजाह– इंडियन प्रीमियर लीगच्या (IPL) 13 व्या हंगामाला चेन्नई सुपर किंग्जने गतविजेत्या मुंबई इंडियन्सला हरवून जोशात प्रारंभ केलेला, परंतु त्यानंतर चेन्नईच्या कामगिरीचा आलेख खालावतच गेला. शुक्रवारी मुंबईविरुद्धच्या परतीच्या लढतीत झगडणारा चेन्नईचा संघ काही युवा खेळाडूंना आजमावण्याची दाट शक्यताये. साखळीतील उर्वरित चारही सामने जिंकून गुणांची बेरीज १४ करीत बाद फेरीसाठी चेन्नईला आशावादी राहता येईल. चेन्नईचे प्ले ऑफचे दरवाजे अद्याप पूर्णपणे बंद झालेले नाहीतं.

  • कसं असेल हे गणित पाहुयात…

आयपीएलमध्ये आतापर्यंत ४० सामाने झाले असून प्लेऑफच्या शर्यतीमध्ये जवळजवळ सर्वच संघ आहेत असं म्हटलं तरी चुकीचं ठरणार नाहीये. स्कोअर बोर्डवर पहिले तीन संघ वगळता शेवटच्या एका जागेसाठी पाच संघांमध्ये चुरस कायम असेल. दिल्ली कॅपिटल्स, रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु आणि मुंबई इंडियन्सचा संघ प्लेऑफमध्ये पोहचतील असं जवळजवळ पक्क झालय. मात्र प्लेऑफमध्ये जाणारा चौथा संघ कोण असेल याबद्दल अनेक तर्क मांडले जातायेत. आज होणाऱ्या मुंबई विरुद्ध चेन्नई सामन्याकडे सर्वांचेच लक्ष लागून राहिलंय. धोनीच्या नेतृत्वाखाली चेन्नईने आतापर्यंत सर्वच सिझनमध्ये प्लेऑफपर्यंत मजल मारलेली. मात्र यंदा धोनीचा संघ अडचणीत सापडल्याचे चित्र दिसतायेत. सध्या चेन्नईचा संघ पॉइण्ट टेबलमध्ये तळालाय. चेन्नईची धावसंध्या – 0.463 इतकी असली तरी चेन्नई अजूनही प्लेऑफ्समध्ये पोहचण्या ची शक्यताये.

चेन्नईला यासाठी आपले उरलेले सर्व सामने जिंकावे लागतील.
तसेच सध्या स्कोअर बोर्डवर अव्वल असणारे तीनही संघांनी आपले उर्वरित सर्व सामने जिंकल्यास त्याचा चेन्नईला फायदा होईल.
या पद्धतीने क्वालिफाय होण्यासाठी चेन्नईला या तिन्ही संघासोबत होणाऱ्या उर्वरित सामन्यांबद्दल फारसा विचार करण्याची गरज नाहीये.
कोलकाता नाईट रायडर्सचा संघ आपल्या उर्वरित चारपैकी केवळ एकच सामना जिंकला तर चेन्नई चौथ्या स्थानी पोहचेल.
तसेच सनरायझर्स हैदराबाद, किंग्स इलेव्हन पंजाब आणि राजस्थान रॉयल्सच्या त्यांच्या उर्वरित सामन्यांपैकी दोनहून अधिक सामन्यांमध्ये विजय मिळाला नाही तर चेन्नईचे प्ले ऑफचे तिकीट निश्चित होईल.
वरील सर्व गोष्टी घडल्यास चेन्नईच्या खात्यात एकूण १४ गुण होतील आणि ते धावसंख्येचा विचार न करता गुणांच्या आधारे प्लेऑफमध्ये पोहचतील.

  • सरासरी धावसंख्येच्या आधारावर?

आणखीन एका शक्यतेनुसार चेन्नईचा संघ सरासरी धावसंख्येच्या जोरावरही प्लेऑफमध्ये जाऊ शकतो. सर्वच संघांचे गुण 14असले तरी चेन्नईला संधीये.
या अशा परिस्थितीमध्ये सरासरी धावसंख्या सुधारण्यासाठी चेन्नईला आपले चारपैकी किमान दोन सामने मोठ्या फरकाने जिंकावे लागतील शिवाय उर्वरित सर्व सामानेही जिंकल्यास ते प्लेऑफमध्ये जाऊ शकतात.

  • मुंबईविरुद्धचा सामना हरल्यास?

मुंबईविरुद्धचा आजचा सामन्या हरल्यानंतरही चेन्नईचा संघ मालिकेबाहेर जाणार नाही.12गुणांच्या आधारे चेन्नई प्लेऑफसाठी क्वालिफाय होऊ शकते. अशाच पद्धतीने सनरायजर्सने मागील वर्षी प्लेऑफमध्ये आपले स्थान निश्चित केलंय. मात्र चेन्नईसाठी हा प्रवास जास्त खडतर असेल. आपल्या सामन्यांबरोबरच त्यांना इतर संघांच्या सामन्यांच्या निकालावर अवलंबून रहावं लागणाराये. त्यामुळे अशा परिस्थितीमध्ये आपले उरलेले सर्व सामने चांगल्या फरकाने जिंकून सरासरी धावसंख्या सुधारण्याला चेन्नई प्राधान्य द्यायला हवंय.

  • हेही वाचा

औरंगाबादच्या हॉकीपटू भावंडांचा बुडून मृत्यू https://www.goanvartalive.com/sports/aurangabad-hockey-siblings-lost-life/

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.
error: Content is protected !!