बाद फेरी गाठण्यासाठी दिल्ली कॅपिटल्स उत्सुक

दिल्लचा आज कोलकाता विरूद्ध सामना

Goan Varta Live | प्रतिनिधी

युवा आणि अनुभवी खेळाडूंचा योग्य ताळमेळ साधणाऱ्या दिल्ली कॅपिटल्सला इंडियन प्रीमियर लीगच्या बाद फेरीतील स्थान पक्के करण्याची सुवर्णसंधीये. जायबंदी आंद्रे रसेलच्या समावेशाबाबत साशंकता असल्याने दडपणाखाली खेळणाऱ्या कोलकाता नाइट रायडर्सशी त्यांची शनिवारी आज गाठ पडणारे.

दिल्लीला गेल्या लढतीत किंग्ज इलेव्हन पंजाबने पराभूत केले. दिल्लीचा सलामीवीर शिखर धवन तुफान फॉर्मात असून गेल्या दोन सामन्यांत त्याने नाबाद शतके झळकावताना दिसलाय. परंतु त्याला दुसऱ्या बाजूने साथ देण्याची आवश्यकता असून कर्णधार अय्यरसह ऋषभ पंत, पृथ्वी शॉ आणि अजिंक्य रहाणे यांनी कामगिरी उंचावण्याची गरजये.

दुसरीकडे इऑन मॉर्गनच्या कोलकाताला बेंगळूरुविरुद्ध दारुण पराभव पत्करावा लागला. शुभमन गिल, नितीश राणा यांचे अपयश कोलकातासाठी चिंतेचा विषय ठरत असून अनुभवी दिनेश कार्तिकलाही छाप पाडता आलेली नाहीये.

हेही वाचा

‘मुंबई इंडियन्स’चा CSKला ‘दुहेरी’ दणका;

https://www.goanvartalive.com/sports/mumbai-indians-won-match-with-csk/

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.
error: Content is protected !!