हा पराभव जिव्हारी लागणारा! तिसऱ्या कसोटी सामन्यात इंग्लंडचा एकतर्फी विजय

टीम इंडियाच्या फलंदाजांची सुमार कामगिरी

Goan Varta Live | प्रतिनिधी

ब्युरो : दुसऱ्या कसोटी सामन्यात रोमांचक विजय मिळवल्यानंतर भारतीय संघाकडून तिसऱ्या कसोटीत जबरदस्त खेळीची अपेक्षा होती. पण भारतीय फलंदाजांनी केलेल्या सुमार कामगिरीमुळे तिसऱ्या कसोटीच्या चौथ्या दिवशीच भारताला पराभवाचा सामना करावा लागलाय. पहिल्या डावात 76 धावांवर ऑलआऊट झालेल्या भारतीय संघाचा दुसऱ्या डावातही फारसा टिकाव लागू शकला नाही.

फलंदाजांची हाराकिरी

तिसऱ्या कसोटीच भारतीय संघाला मानहानीकारक पराभव पत्करावा लागला. तिसऱ्या दिवशी थोडी बरी फलंदाजी केल्यामुळे भारतीय संघ या सामन्यात तग धरेल, असं वाटत होतं. पण तसं होऊ शकलं नाही. तिसऱ्या कसोटी सामन्याच्या चौथ्या दिवशी भारतीय फलंदाजांनी हाराकिरी केल्याचं पाहायला मिळाले आणि त्याचा फटका संघाला बसला.

हेही वाचा – India vs England : सिराजची खुन्नस, कोहलीची आक्रमकता

इंग्लंडचं कमबॅक

पुजारा आणि कोहली या जोडीने चौथ्या दिवशी साफ निराशा केली. त्याचबरोबर अजिंक्य रहाणे आणि रिषभ पंतही लवकर बाद झाल्यामुळे भारताला हा सामना एक डाव आणि ७६ धावांनी गमवावा लागला. या पराभवासह इंग्लंडने मालिकेत कमबॅक करत मालिकेत बरोबरी केली.

हेही वाचा – Tokyo Paralympics: भाविना पटेल गोल्ड मेडलपासून अवघं एक पाऊल दूर

जिव्हारी लागणारा पराभव

ऑली रॉबिन्सनने भेदक गोलंदाजी करत भारतील फलंदाजांची दाणादाण उडवली. पुजारापाठोपाठ रहाणे आणि पंतही स्वस्तात माघारी परतले. कोहली बाद झाल्यानंतर भारताचा पराभव आणखी ठळक झाला. दरम्यान, एका डावासह झालेल्या या पराभवामुळे भारतीय संघावर आता टीकाही होऊ लागली आहे. खरंतर टॉस जिंकून फलंदाजीचा निर्णय घेतलेल्या विराट कोहलीच्या निर्णयावरुनही वेगवेगळ्या प्रतिक्रिया उमटताना पाहायला मिळतंय. एकूणच हा पराभव टीम इंडियाला जिव्हारी लागला असणार, हे नक्की!

पाहा व्हिडीओ –

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.
error: Content is protected !!