टीम इंडियामागे दुखापतीचं ग्रहण
पहिल्या सामन्याआधी संघात महत्वपूर्ण बदल

Goan Varta Live | प्रतिनिधी
ब्युरो : लॉकडाउनपश्चात आपला पहिला आंतरराष्ट्रीय सामना खेळण्यासाठी सज्ज झालेल्या टीम इंडियाच्या पाठीमागचं दुखापतीचं ग्रहण काहीकेल्या कमी होताना दिसत नाहीये. सिडनीच्या मैदानावर पहिल्या वन-डे सामन्याआधी भारतीय संघात महत्वपूर्ण बदल करण्यात आलेत. संघाचा युवा गोलंदाज नवदीप सैनीला दुखापत झाल्यामुळे बीसीसीआयनं खबरदारीचा उपाय म्हणून टी.नटराजनला संघात स्थान दिलंय.
गुरुवारी रात्री बीसीसीआयने यासंदर्भात प्रसिद्धीपत्रक जाहीर करत माहिती दिलीये.
नवदीप सैनीोला पाठीचं दुखणं बळावल्यामुळे खबरदारीचा उपाय म्हणून हा निर्णय घेण्यात आलाय.
हेही वाचा
दिएगो माराडोना यांचं ह्रदयविकाराच्या झटक्यानं निधन
ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.