TATA IPL 2023 | जिओ सिनेमाने केलं अक्ख मार्केट काबिज; स्टार नेटवर्कच्या व्यूअरशिप नंतर, आता जाहिरातींवर देखील मारला डल्ला !

ऋषभ | प्रतिनिधी

• टीव्हीवरील पहिल्या सामन्यात जाहिरातदार 52 वरून 31 पर्यंत कमी झाले
• एकूण टीव्ही प्रायोजक देखील 16 वरून 12 वर आले आहेत
• डिजिटल ला मिळाली 125 पेक्षा जास्त एक्सक्लुसिव्ह जाहिरातदारांची साथ
आयपीएलमध्ये एक नवीन ट्रेंड उदयास आला आहे. जाहिरातदार टीव्ही सोडून डिजिटलकडे वळत आहेत. बीएआरसी इंडियाच्या टीव्ही रेटिंगमध्ये, जिथे गेल्या वर्षी पहिल्या सामन्यात सुमारे 52 जाहिरातदारांनी टीव्हीवर जाहिराती दिल्या होत्या तिथे या वर्षी फक्त 31 जाहिरातदार दिसले. म्हणजेच 40 टक्के जाहिरातदारांनी टीव्ही प्रसारणाकडे पाठ फिरवली आहे.

गेल्या आयपीएल हंगामात टीव्ही जाहिरातदारांची संख्या 100 च्या आसपास होती. यावेळी टीव्ही 100 जाहिरातदारांच्या आकड्याला स्पर्श करू शकेल, हे फार कठीण वाटते. टीव्हीवरील प्रायोजकांची संख्याही कमी झाली आहे, गेल्या वर्षी 16 वरून यावर्षी 12 वर आली आहे. या 12 पैकी एक प्रायोजक तर तिसऱ्या सामन्यापासून प्रायोजक असणार आहे.

रिलायन्सशी संबंधित कंपन्या जाहिरातदारांच्या यादीतून पूर्णपणे गायब आहेत. कारण आहे रिलायन्स ग्रुपची कंपनी वायाकॉम-18, ज्याला आयपीएलचे डिजिटल प्रसारण अधिकार मिळाले आहेत. सोडलेल्या इतर मोठ्या टीव्ही जाहिरातदारांमध्ये बायजुस, क्रेड, मुथुट, नेटमेड्स, स्वीगी, फ्लिपकार्ट, फोनपे, मिशो, सॅमसंग, वनप्लस, वेदांतू, स्पोटीफाय आणि ह्यावल्स यांचा समावेश आहे. स्टार स्पोर्ट्स नेटवर्क भारतात टीव्हीवर आयपीएल सामन्यांचे थेट प्रक्षेपण करत आहे.