T20 World Cup | भारतीय संघाला विश्वचषकाआधी दुसरा मोठा ‘धक्का’…

संघातील प्रमुख जलद गोलंदाज दुखापतीमुळे संघातून बाहेर

रजत सावंत | प्रतिनिधी

ब्युरो रिपोर्ट : आगामी टी२० विश्वचषकाच्या दृष्टीने भारतीय संघ तयारी करत आहे. मात्र, त्याआधीच भारतीय संघाला हादरा देणारी एक माहिती समोर येत आहे. संघातील प्रमुख जलद गोलंदाज दुखापतीमुळे संघातून बाहेर झाला आहे. याबाबत बीसीसीआयने ट्विट करत माहिती दिली.
हेही वाचाःAccident : इन्सुलीत कदंबा बसची एसटीला धडक बसून अपघात…

ऑस्ट्रेलियात रंगणार विश्वचषकाचा थरार

आगामी महिन्यात १६ तारखेपासून ऑस्ट्रेलियाच्या धरतीवर टी२० विश्वचषकाचा थरार रंगणार आहे. बुमराहने २५ सप्टेंबर रोजी ऑस्ट्रेलियाविरुद्ध अखेरची टी२० सामना खेळला होता. त्या सामन्यात बुमराहने ४ षटकात ५० धावा दिल्या होत्या. टी२० मधील ही त्याची सर्वात वाईट कामगिरी होती.
हेही वाचाःरशियातील शाळेत गोळीबार; १३ जणांचा जागीच मृत्यू…

संघाला बसला हा दुसरा मोठा धक्का

संघातील प्रमुख जलद गोलंदाज जसप्रीत बुमराह दुखापतीमुळे संघातून बाहेर झाल्याने भारतीय संघाला बसलेला हा दुसरा मोठा धक्का आहे. याआधी अष्टपैलू रविंद्र जडेजा देखील दुखापतीमुळे संघाबाहेर झाला होता. याबाबत बीसीसीआयने ट्विट करत माहिती दिली.
हेही वाचाःCrime | अधिकाऱ्याच्या डोक्याला बंदूक लावून घेतला रस्ता बांधून…

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.
error: Content is protected !!