#SPORTS : टॉप टेन बातम्या…

सचिन खुटवळकर | प्रतिनिधी
कोहली-डिव्हीलियर्सचा विक्रम
शारजाह : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुच्या एबी डिव्हीलियर्स आणि विराट कोहली यांनी आयपीएल स्पर्धेत नव्या विक्रमाची नोंद केली. कोलकाता नाईट रायडर्सविरुद्धच्या सामन्यात या जोडीने शतकी भागीदारी केली. शतकी भागीदारी करण्याची या जोडीची ही दहावी वेळ. अशी कामगिरी आयपीएलमध्ये आतापर्यंत कोणीही केलेली नाही.
रॉबिन सिंगनं केलं कृणालचं कौतुक
अबुधाबी : मुंबई इंडियन्सनं रविवारच्या सामन्यात दिल्लीवर मात केली. 162 धावांचा पाठलाग करताना मुंबईने शानदार विजय मिळवला. संघाचे फलंदाजी प्रशिक्षक रॉबिन सिंग यांनी याबद्दल खेळाडूंची स्तुती केली. कृणाल पांड्यानं मोक्याच्या क्षणी मिळवून दिलेल्या बळींमुळे सामन्यात रंगत आली आणि मुंबईला त्याचा फायदा झाला, अशा शब्दांत रॉबिन सिंगनं त्याच्यावर स्तुतिसुमनं उधळली.
डीव्हिलियर्सचा षटकार थेट रस्त्यावर
शारजाह : आरसीबीचा धडाकेबाज फलंदाज या ए बी डिव्हीलियर्सनं मारलेला षटकार थेट मैदानाबाहेर रस्त्यावर जाऊन पडला. कोलकाताविरुद्धच्या सामन्यात कमलेश नागरकोटीच्या चेंडूवर डीव्हिलियर्सनं उत्तुंग असा षटकार लगावला. तो षटकार थेट मैदानाबाहेर रस्त्यावर गेला. यापूर्वी चेन्नईच्या एम एस धोनीनं असाच षटकार लगावला होता.
ओव्हरथ्रोवरून पांड्या बंधूंमध्ये जुंपली
अबुधाबी : रविवारी दिल्लीविरुद्ध सामन्यात मुंबईच्या संघाने विजय मिळवला. दिल्लीचा शिखर धवन आणि श्रेयस अय्यर फलंदाजी करत असताना, हार्दिक पांड्यानं कृणाल पांड्याच्या दिशेने एक थ्रो केला. मात्र हा थ्रो पकडण्यात मुंबईचे फिल्डर अपयशी ठरले आणि ओव्हरथ्रोमुळे दिल्लीला अतिरीक्त धाव मिळाली. यानंतर कृणालचा संताप अनावर झाला आणि त्यानं हार्दिकला खडसावलं. हार्दिकनही त्याला प्रत्युत्तर दिलं.
दिल्ली कॅपिटल्सला हवाय बदली खेळाडू
यूएई : दिल्ली कॅपिटल्स संघाचा वेगवान गोलंदाज इशांत शर्मा याच्या पाठीला दुखापत झाली आहे. ही दुखापत गंभीर असल्याच निष्पन्न झाल. इशांतला उर्वरित स्पर्धेला मुकाव लागणार आहे. त्यामुळं संघाला बदली खेळाडू घेण्याची परवानगी द्यावी, अशी विनंती दिल्ली कॅपिटल्सनं केलीय.
धोनीच्या चेन्नईची वणवण संपणार?
दुबई : महेंद्रसिंह धोनीच्या चेन्नई सुपर किंग्जला यंदाच्या आयपीएलमध्ये लौकिकाला साजेशी कामगिरी करता आलेली नाही. त्यामुळ सनरायजर्स हैदराबादविरुद्ध होणार्या लढतीकडे चाहत्यांचे लक्ष लागले आहे. चेन्नईचा संघ तूर्तास सात सामन्यांतून अवघ्या चार गुणांसह सातव्या स्थानी आहे.
धोनीच्या टीकाकारांना किरमानींची चपराक
शारजाह : आयपीएलमध्ये आतापर्यंत चेन्नई सुपर किंग्ज आणि महेंद्र सिंह धोनी यांची कामगिरी खराब झाली आहे. यावरून भरपूर टीका होताना दिसते. यावर भारताचे माजी विकेटकीपर सैयद किरमानी यांनी टीकाकारांना चोख उत्तर दिले. जे लोक आज धोनीवर टीका करत आहेत त्यांच्या विचारांवर मला दया येते, असे किरमानी म्हणाले.
केकेआरच्या चुकांमुळे आरसीबीला धावांचा बोनस
दुबई : कोलकाता नाईट रायडर्सच्या खेळाडूंचं गचाळ क्षेत्ररक्षण रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूच्या पथ्थ्यावर पडलं. केकेआरच्या तीन खेळाडूंनी मोठ्या चुका केल्या. केकेआरच्या दोन खेळाडूंनी चेंडू अडवण्यात आळस केला आणि त्यामुळे आरसीबीच्या संघाला मोठ्या धावांचा बोनस मिळाल्याचे पाहायला मिळाल.
रीषभ पंत दुखापतग्रस्त
यूएई : दिल्ली कॅपिटल्स संघाला रविवारी मोठ्या कालावधीनंतर पराभवाचा सामना करावा लागला. मुंबई इंडियन्सने 5 गडी राखून दिल्लीवर मात केली. यष्टीरक्षक रीषभ पंतच्या स्नायूंना दुखापत झाली असल्यामुळ संघात त्याची जागा ऑस्ट्रेलियाच्या अलेक्स कॅरीने घेतली. ऋषभला झालेली दुखापत ही गंभीर स्वरुपाची असून तो किमान एक आठवडाभर स्पर्धेत खेळू शकणार नसल्याचं दिल्लीचा कर्णधार श्रेयस अय्यरने सांगितलं आहे.
तेवातियाचं खलील अहमदसोबत भांडण
शारजाह : राहुल तेवातिया आणि रियान पराग यांच्या दमदार फलंदाजीच्या जोरावर राज्यस्थान रॉयल्सनं रोमांचक सामन्यात हैदराबाद संघाचा पाच गड्यांनी पराभव केला. मात्र अखरेच्या षटकांत हैदराबादचा गोलंदाज खलील अहमद आणि राजस्थानचा फलंदाज राहुल तेवातिया यांच्यात बाचाबाची झाली. विजयानंतर तेवातियाचा पारा अधिक चढला. खलील आणि त्याच्यामध्ये शाब्दिक बाचाबाची सुरु झाली. हैदराबाद संघाचा कर्णधार डेव्हिड वॉर्नरने मध्यस्थी करत हा वाद शांत केला.