परफेक्ट यॉर्करनं पाठवलंय शिखरला तंबूत

पहा हा विडीयो

Goan Varta Live | प्रतिनिधी

ब्पुरो:पहिल्या टी-२० सामन्यात ऑस्ट्रेलियाचा कर्णधार अॅरोन फिंचनं नाणेफेक जिंकून भारताला फलंदाजीसाठी आंमत्रित केलंय. ऑस्ट्रेलियाच्या गोलंदाजांनी कर्णधाराचा निर्णय सार्थ ठरवत भारताच्या दोन फलंदाजांना स्वस्तात बाद केलाय. वेगवान गोलंदाज मिचेल स्टार्कने परफेक्ट यॉर्कर फेकत शिखर धवनचा त्रिफळा उडवलाय. शिखर धवन अवघी एक धाव काढून बाद झालाय.

मोठा फटका मारण्याच्या नादात शिखर धवनने स्टार्कला आपली विकेट बहाल केलीये. पुढे येऊन खेळण्याच्या प्रयत्नात धवनचा स्टम्प उडाला. पावरप्लेच्या षटकांमध्ये स्टार्कनं भेदक मारा केला. तिसऱ्या षटकांत भारताच्या ११ धावा असताना शिखर बाद झाला.

दुसऱ्या क्रमांकावर आलेल्या विराट कोहलीलाही आपल्या लौकिकास साजेशी खेळी करण्यात अपयशी ठरलाय. विराट कोहली पुन्हा एकदा लेग स्पिनर गोलंदाजानं बाद केलं. विराट कोहलीला फक्त ११ धावा करता आल्या. के. राहुलनं एका बाजून किल्ला लढवत आहे. स्टार्कनं दोन षटकांत ११ धावा देत शिखर धवनची महत्वाची विकेट घेतली. आयपीएलमध्ये शिखर धवनने लागोपाठ दोन शतकं झळकावली होती.

भारतीय संघाने पहिल्या टी-२० सामन्यासाठी संजू सॅमसन, वॉशिंग्टन सुंदर या आयपीएल गाजवणाऱ्या खेळाडूंना स्थान दिलंय. याचसोबत अखेरची वन-डे गाजवणारा टी. नटराजनही आंतरराष्ट्रीय टी-२० क्रिकेटमध्ये पदार्पण करतो आहे. त्यामुळे पहिल्या टी-२० सामन्यात भारतीय संघाची कामगिरी कशी होतेय याकडे सर्वांचं लक्ष असणारे

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.
error: Content is protected !!