विराटच्या अनुपस्थितीत रोहितला कसोटीत स्वतःला सिद्ध करण्याची चांगली संधी !

ऑस्ट्रेलियाचा दिग्गज गोलंदाज ग्लेन मॅकग्राचं मत

Goan Varta Live | प्रतिनिधी

ब्युरो- विराट कोहलीच्या नेतृत्वाखाली टीम इंडिया सध्या ऑस्ट्रेलिया दौऱ्यावरये. 27 नोव्हेंबरपासून सुरु होणाऱ्या या मालिकेत दोन्ही संघ 3 वन-डे,3 टी-20 आणि 4 कसोटी सामने खेळणारे. कर्णधार विराट कोहली पहिला कसोटी सामना खेळल्यानंतर पत्नी अनुष्काची बाळंतपणात काळजी घेण्यासाठी भारतात परत येणारे. विराटच्या अनुपस्थितीत रोहित शर्माला भारतीय संघात जागा मिळालीये. ऑस्ट्रेलियाचा माजी जलदगती गोलंदाज ग्लेन मॅकग्राच्या मते विराटच्या अनुपस्थितीत रोहितला स्वतःला सिद्ध करण्याची चांगली संधीये.

रोहित शर्मा हा चांगला खेळाडू आहे, पण कसोटी क्रिकेटमध्ये त्याला आतापर्यंत जे साध्य करायला हवं होतं ते करता आलं नाहीये. कदाचीत विराट घरी जाईल त्यावेळेला रोहितला संधी मिळेल. पण तुम्हीही कधीही एका खेळाडूवर अवलंबून राहता कमा नये. भारताकडे रहाणे, पुजारा, लोकेश राहुल असे अनेक चांगले फलंदाज आहेत. ज्यावेळी विराट भारतात परतेल त्यावेळी इतरांना पुढे येऊन स्वतःला सिद्ध करावं लागेल, रोहित शर्मा हे करु शकतो.”असे मत म्रॅकग्राने मांडलंय.

2019 साली लोकेश राहुल अपयशी होत असताना निवड समितीने रोहित शर्माला कसोटीत सलामीची संधी दिलेली. महत्वाची गोष्ट म्हणजे रोहितनेही आपल्याला मिळालेल्या संधीचा लाभ घेत द्विशतकी खेळी करत सलामीच्या जागेवर आपला हक्क सांगितलं. मात्र 2020 वर्षात रोहितला दुखापतींनी ग्रासलंये. आयपीएलदरम्यान झालेल्या दुखापतीमुळेच त्याला भारताच्या टी-20 आणि वन-डे संघातलं आपलं स्थान गमवावं लागलंय. त्यामुळे कसोटी संघात रोहितला संधी मिळते का आणि मिळाल्यास तो कशी कामगिरी करतो याकडे सर्वांचं लक्ष असणारे.

हेही वाचा

तोल जाऊन वृद्ध महिला विहिरीत पडली, पण थोडक्यात बचावली

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.