असं असेल Playoffs चं वेळापत्रक

पाहा कोणता संघ कोणाविरूद्ध उभा ठाकणार…

Goan Varta Live | प्रतिनिधी

दुबई :IPL 2020 च्या शेवटच्या साखळी सामन्यात हैदराबादने मुंबईला १० गडी राखून पराभव केला आणि ‘प्ले-ऑफ्स’मध्ये दिमाखात प्रवेश केलाय. या सामन्याअंती स्पर्धेला Top 4 संघ मिळालेय. मुंबईने साखळी सामन्याअंती १८ गुणांसह अव्वलस्थान कायम राखलंय. दिल्लीने १६ गुणांसह दुसरं स्थान पटकावलंय. बंगळुरूच्या संघाने प्ले-ऑफ्समध्ये स्थान पटकावलंय, पण हैदराबादची धावगती जास्त असल्याने त्यांना तिसरं स्थान मिळालं आणि बंगळुरूला चौथ्या स्थानी समाधान मानावं लागलंय.

अशी असेल प्ले-ऑफ्सची लढाई

  • प्ले-ऑफ्सचे सर्व सामने भारतीय प्रमाणे वेळेनुसार सायंकाळी ७.३० वाजता सुरू होतील.
  • ५ नोव्हेंबर, गुरूवार – पहिली पात्रता फेरी १ – मुंबई इंडियन्स vs दिल्ली कॅपिटल्स (दुबई)
  • ६ नोव्हेंबर, शुक्रवार – बाद फेरी – सनरायझर्स हैदराबाद vs रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू (अबु धाबी)
  • ८ नोव्हेंबर, रविवार – दुसरी पात्रता फेरी – मुंबई-दिल्ली सामन्यातील पराभूत संघ vs हैदराबाद-बंगळुरू सामन्याचा विजेता (अबु धाबी)
  • १० नोव्हेंबर – अंतिम सामना – मुंबई दिल्ली सामन्याचा विजेता vs दुसऱ्या पात्रता फेरीतील विजेता (दुबई)

हेही वाचा

मुलांनी दिव्यांग विनिताचा आदर्श घ्यावा

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.
error: Content is protected !!