विकेटकिपर बॅट्समन पार्थिव पटेलनं जाहीर केली निवृत्ती

सिध्देश सावंत | प्रतिनिधी
ब्युरो : विकेटकिपर बॅट्समन पार्थिव पटेलने क्रिकेटच्या सर्व फॉरमॅटमधून संन्यास घेतलाय. बुधवारी त्यानं आपल्या निवृत्तीची घोषणा केली. ट्वीट करत पार्थिव पटेलनं आपली निवृत्ती जाहीर केली.
३५ वर्षीय पार्थिव पटेलने आपल्या १८ वर्षांच्या करिअरमध्ये २५ टेस्ट, ३८ वनडे आणि दोन टी-२० आंतरराष्ट्रीय सामने खेळले होते. डोमेस्टिक क्रिकेटबाबत बोलायचं झालं तर गुजरातसाठी पार्थिव १९४ सामने खेळा होता. जानेवाली २०१८मध्ये खेळल्या गेलेल्या दक्षिण अफ्रिकेतील ऐतिहासिक सामन्याचाही पार्थिव भाग होता. त्यानंतर एका वर्षानं ऑस्ट्रेलियात जिंकलेल्या कसोटी मालिकेतही पार्थिव पटेल खेळला होता.

पार्थिवने २००२मध्ये भारताकडून इंग्लंडविरुद्धच्या सामन्यात आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पाऊल ठेवलं होतं. भारताकडून खेळलेल्या सर्वात तरुण विकेटकिपरपैकी पार्थिव एक आहे. त्यावेळी पार्थिवचं वय अवघ १७ वर्षांचं होतं. दरम्यान दिनेश कार्तिक आणि महेंद्रसिंह धोनीच्या एन्ट्रीनंतर पार्थिव टीम इंडियात आपली जागा स्थिर करु शकण्यात यशस्वी होऊ शकला नाही.
— parthiv patel (@parthiv9) December 9, 2020