पाकिस्तानच्या संघातील 6 खेळाडू करोना पॉझिटीव्ह

न्यूझीलंडमध्ये पोहचल्यावर आले रिपोर्ट

Goan Varta Live | प्रतिनिधी


न्यूझीलंड: न्यूझीलंडदौऱ्यावर गेलेल्या पाकिस्तान संघातील सहा खेळाडूंचा रिपोर्ट करोना पॉझिटिव्ह आला आहे. न्यूझीलंड क्रिकेट मंडळानं ही माहिती दिली आहे. या सर्व खेळाडूंना सध्या क्वारंटाइन करण्यात आलं आहे. आयसोलेशनदरम्यान होणाऱ्या सराव सत्रावरही निर्बंध लावण्यात आले आहेत. करोनाबाधित झालेल्या सहा खेळाडूंची नावं अद्याप समोर आलेली नाहीत. याआधी न्यूझीलंड दौऱ्यासाठी रवाना होण्यापूर्वी पाकिस्तान फलंदाज फखर जमानमध्ये करोनाची लक्षणं आढळली होती. त्यामुळे फखर जमानला न्यूझीलंड दौऱ्यातून वगळण्यात आलेले.

पाकिस्तान आणि न्यूझीलंड यांच्यादरम्यान १८ डिसेंबरपासून दौऱ्याला सुरुवात होणारे. यामध्ये तीन टी-२० सामने, दोन कसोटी सामन्याची मालिका होणार आहे. न्यूझीलंड दौऱ्यासाठी पाकिस्तानचा संघ अतिरिक्त खेळाडूसोबत गेलाय. पाकिस्तान अ संघही चार दिवसीय दोन सामने खेळणारे.

न्यूजीलंड क्रिकेट बोर्डानं सांगितलं की, पॉझिटिव्ह आलेल्या सहा खेळाडूंपैकी दोन खेळाडूंचे रिपोर्ट याआधीही पॉझिटिव्ह आलेत. यामध्ये आता चार खेळाडूंची भर पडलीये. करोनाबाधित झालेल्या सहा खेळाडूंशिवाय पाकिस्तानचा संघ नियमांनुसार सराव करु शकतोय. न्यूझीलंडला रवाना होण्यापूर्वी झालेल्या करोना चाचणीमध्ये चारही खेळाडू निगेटिव्ह आले होते.

करोना महामारीमध्ये पाकिस्तान संघाचा हा दुसरा विदेशी दौराये. याआधी पाकिस्तान संघ इंग्लंड दौऱ्यावर गेला होता. इंग्लंडमध्ये पाकिस्तान संघाला कसोटी 0-1नं पराभवचा सामना करावा लागला होता. तर टी-20 मालिका 1-1 नं बरोबरीत राखण्यात यश आलं होतं.

हेही वाचा

एफसी गोवावर १-० ने मात

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.
error: Content is protected !!