सुवर्णपदक हुकलं! पण तरिही रचला इतिहास, भाविना पटेलकडून रौप्य पदकाची कमाई

भाविनाने भारताला पहिलं पदक जिंकून दिलं

Goan Varta Live | प्रतिनिधी

ब्युरो : टोकियो पॅरालिम्पिकमधून भारतासाठी पहिली आनंदाची बातमी रविवारी सकाळी आली. भाविना पटेलनं भारतासाठी पहिलं पदक जिंकलंय. रौप्य पदकाची कमाई करत भाविनानं इतिहास रचलाय. पॅरालिम्पिकमधील भारताचं हे पहिलं पदक ठरलंय. तिच्या या कामगिरीबद्दल तिचं सर्वत्र कौतुक होतंय.

टेबल टेनिसमध्ये कमाल

टेबल टेनिसमधील क्ला फोर एकेरी गटात भाविनानं अंतिम फेरी गाठली होती. अंतिम फेरीतील अंतिम सामन्यात भाविनाचा सामना हा चीनच्या झोउ यींगशी झाला. ७-११, ५-११, ६-११ असा भाविनाचा पराभव झाला. त्यामुळे भाविना पटेलला रौप्य पदकावर समाधान मानवं लागलं. भाविनाबेनने पहिल्या सेटमध्ये झोउ यींगला चांगली लढत दिली होती. पण चीनच्या माजी सुवर्णपदक विजेत्याने यींगने भारतीय खेळाडूला नंतर संधी मिळवून दिली नाही.

हेही वाचा – Video | नीरजच्या आयुष्यातील ते ७ सेकंद!

शुभेच्छांचा वर्षाव

भाविना ही पॅरालिम्पिक स्पर्धेत अंतिम सामन्यात पोहोचणारी पहिली भारतीय महिला ठरली. शानदार कामगिरीनंतर भाविनावर शुभेच्छांचा वर्षाव होतोय. पंतप्रधान नरेंद्र मोदींपासून ते क्रीडा जगतातील अनेक दिग्गजांनी त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव केला. भाविनाच्या या कामगिरीमुळे क्रीडा क्षेत्रात करीयर घडवू पाहणाऱ्यांना नवी ऊर्जा मिळेल, हे नक्की.

हेही वाचा – जगाला थक्क करणारी ‘मेडल मशिन्स’

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.
error: Content is protected !!