सावंतवाडीच्या सुपुत्राचा आयपीएलमध्ये डंका

यावर्षी आयपीएलच्या (IPL) हंगामात कोलकाता नाइट रायडर्स संघाकडून संधी

सचिन खुटवळकर | प्रतिनिधी

सावंतवाडी : सावंतवाडीचा सुपुत्र असलेला महाराष्ट्र संघाकडून खेळणारा निखिल नाईक (Nikhil Naik) यावर्षी आयपीएलच्या (IPL) हंगामात कोलकाता नाइट रायडर्स संघाकडून खेळत आहे. निखिल तडाखेबंद बॅटिंगसाठी प्रसिद्ध आहे. निखिलला ”इंडियन रसेल” असंही म्हटलं जातं. मूळचा सावंतवाडीचा असणारा निखिल महाराष्ट्र संघाकडून खेळतो. ताकदीच्या बळावर आकर्षक फटके लगावणं त्याची खासियत आहे. किंग्ज इलेव्हनकडून खेळणारा निखिल आता कोलकाता नाईट रायडर्सच्या ताफ्यात आहे.

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.
error: Content is protected !!