बुद्धिबळ स्पर्धेत भारताचे दोन्ही संघ उपांत्य फेरीत

भारताच्या महिलांसमोर आज उपांत्य फेरीत मंगोलिया, तर पुरुषांसमोर इराणचे आव्हान असेल

Goan Varta Live | प्रतिनिधी

भारताच्या महिला आणि पुरुष संघाने आशियाई नेशन्स चषक ऑनलाइन सांघिक बुद्धिबळ स्पर्धेत उपांत्य फेरीत मजल मारलीये. भारताच्या महिलांसमोर आज उपांत्य फेरीत मंगोलिया, तर पुरुषांसमोर इराणचे आव्हान असेल.

भारताच्या महिला संघाने दोन डावांच्या या लढतीत किर्गिझिस्तानवर 4-0 आणि नंतर 3.5-0.5 असा विजय मिळवलाय. आर. वैशालीने दमदार कामगिरी उपांत्यपूर्व फेरीतही कायम ठेवत दोन्ही लढतीत विजय मिळवलाय. तिने अलेक्झांड्रा समागानोवा नमवलेय. पद्मिनी राऊत आणि पी. व्ही. नंदिधा यांनीही दोन विजयांची नोंद केलीय. भक्ती कुलकर्णीला मात्र दुसऱ्या लढतीत बरोबरी स्वीकारावी लागल्याने भारताला दोन्ही लढती 4-0 या निर्भेळ यशाने जिंकता आलाय.

भारताच्या पुरुष संघाला मात्र मंगोलियाविरुद्धच्या लढतीत विजयासाठी चुरस द्यावी लागलीय. निहाल सरिनला उपांत्यपूर्व फेरीतील पहिल्या डावात पराभव स्वीकारावा लागलाय. मात्र दुसऱ्या डावात सरिनने सुमिया बिल्गुनविरुद्ध विजयाची नोंद केलीये. पहिल्या डावात भारताकडून एस. पी. सेतूरामन आणि शशीकिरण यांनी विजय मिळवलेय. कर्णधार सूर्यशेखर गांगुलीला मात्र पहिल्या डावात बिल्गुनविरुद्ध बरोबरी स्वीकारावी लागलेली. दुसऱ्या डावात बी. अधिबानने विजयाचे योगदान दिलेय. पहिल्या डावात विजय मिळवलेल्या शशीकिरणला मात्र दुसऱ्या डावात बरोबरीवर समाधान मानावं लागलय. गांगुलीला दुसऱ्या डावात हार स्वीकारावी लागलीये.

हेही वाचा

बाद फेरी गाठण्यासाठी दिल्ली कॅपिटल्स उत्सुक

https://www.goanvartalive.com/sports/today-match-dd-kkr/

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.
error: Content is protected !!