बापरे! ओपनिंग बॅट्समनचा अपघातात दुर्देवी मृत्यू

या क्रिकेटपटूनं अफगाणीस्तानसाठी तेरा आंतरराष्ट्रीय सामने खेळले. आक्रमक सलामीवीर म्हणून त्यानं आपली छाप सोडली होती.

सचिन खुटवळकर | प्रतिनिधी

काबूल : कारनं ठोकरल्यानं गंभीर जखमी झालेला अफगाणीस्तानचा फलंदाज नजीब तारकाई (Najeeb Tarakai) याचं अखेर निधन झालं. 2 ऑक्टोबर रोजी जलालाबाद इथं रस्ता ओलांडताना त्याला भरधाव कारनं धडक दिली होती.

नजीब अवघा 29 वर्षांचा होता. त्याच्या निधनाबद्दल अफगाणीस्तान क्रिकेट बोर्डानं दु:ख व्यक्त केलं आहे. नजीब तारकाई आक्रमक फलंदाज म्हणून परिचित होता. अफगाणीस्तानकडून त्यानं बारा टी-ट्वेंटी सामने, तर एक वनडे सामन्यात योगदान दिलं. आयर्लंडविरुद्ध झळकावलेल्या 90 धावा ही त्याची टी-ट्वेंटी सामन्यातली सर्वोच्च धावसंख्या होती.

जलालाबाद इथं रस्ता ओलांडत असताना एका भरधाव कारनं नजीबला धडक दिली. त्याला तत्काळ नंगरहर इथं इस्पितळात भरती करण्यात आलं. तिथं त्याच्यावर शस्त्रक्रिया करण्यात आली. मात्र गंभीर जखमी झाल्यानं त्याचा अखेर मृत्यू झाला.

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.
error: Content is protected !!