नदाल गोल्फच्या मैदानावर

Goan Varta Live | प्रतिनिधी
ब्युरो: अव्वल टेनिसपटू राफेल नदालने टेनिस रॅकेटऐवजी गोल्फचे साहित्य हातात घेत पुन्हा एकदा संपूर्ण जगाचे लक्ष वेधून घेतलय. नदाल हा एक चांगला गोल्फपटूदेखील आहे हे अनेकांना ठाऊकये. मात्र यावेळेस नदाल चक्क व्यावसायिक गोल्फ स्पर्धेत सहभागी झालाय.
फ्रेंच खुली टेनिस स्पर्धा विक्रमी 13 वेळा जिंकल्यावर स्पेनच्या राफेल नदालने स्पेनमधील मॅर्लोका येथील व्यावसायिकांच्या गोल्फ स्पर्धेत नुकताच सहभाग घेतलाय. नदाल त्याच्या गोल्फचे साहित्य (क्लब) देखील टेनिस रॅकेटप्रमाणेच हाताळतो हे पाहायला मिळालय. पहिल्याच दिवशी नदालने 60 जणांचा समावेश असलेल्या स्पर्धेत संयुक्तपणे 10 वे स्थान मिळवलेले. नदालचा गोल्फ मैदानावरील वावर हा एखाद्या व्यावसायिक गोल्फपटूप्रमाणेच होता.
नदाल गोल्फ खेळत असल्याने साहजिकच मॅर्लोका येथील गोल्फ स्पर्धेला अचानक महत्व प्राप्त झालंय. गोल्फमध्ये जवळच्या अंतराप्रमाणेच दूरवर चेंडूचा फटका बसणे आवश्यक असते. नदालने त्यातही त्याची गुणवत्ता दाखवलीये.
हेही वाचा
मराठी,हिंदी,कोकणी भाषेचा वाद सोडा आणि या शिक्षकांकडून काहीतरी शिका
https://www.goanvartalive.com/viral/trending-news/a-goan-teachers-pratikshalande-supriyasalgaonkar/