मुंबई इंडियन्स प्ले ऑफचा प्रथम दावेदार

Goan Varta Live | प्रतिनिधी
अबुधाबी: जसप्रीत बुमराहाच्या भेदक गोलंदाजीला सुर्यकुमार यादवच्या दमदार खेळीची साथ लाभल्यामुळे मुंबई इंडियन्सने आरसीबीचा पाच गड्यांनी पराभव केला. या विजयासह मुंबईच्या संघाचं प्ले ऑफमधील स्थान जवळपास पक्क झालंय. बुमराहने 14 धावांच्या मोबदल्यात 3 गडी बाद केले तर सुर्यकुमार यादवने 79 धावांची नाबाद खेळी केली.
बुमराह आणि यादवच्या नेत्रदिपक कामगिरीच्या बळावर मुंबईनं आरसीबीचा पराभव केलाय. या विजयासह मुंबईनं जवळपास प्लेऑपच तिकिट पक्कं केलंय. यंदाच्या हंगमात प्ले ऑफमध्ये प्रवेश मिळवणारा मुंबईचा संघ पहिला ठरलाय. एखादा चमत्कारचं मुंबईला प्ले ऑफमधून बाहेर काढू शकतो. जर पुढील दोन्ही सामन्यात मुंबईचा 200 किंवा त्यापेक्षा जास्त धावांनी पराभव झाला आणि कोलकाता नाइट राइडर्सने उर्वरीत दोन सामने 185 धावांच्या अंतरानं जिंकले तेव्हाच कोलकाताचा नेट रनरेट मुंबईपेक्षा चांगला होईल. सध्या केकेआरचा नेट रन रेट (-0.479) खूप खराब दिसतोय.

मुंबई इंडियन्स संघानं 12 सामन्यात 8 विजय मिळवत 16 गुणांची कमाई केलीये. 16 गुणांसह मुंबई स्कोअर बोर्डवर अव्वल स्थानावरये. आरसीबीचे 12 सामन्यात 14 गुण असून दुसऱ्या क्रमांकावर आहे.नेट रनरेट कमी असल्यामुळे दिल्ली तिसऱ्या स्थानावरये. किंग्स इलेवन पंजाब आणि कोलकाता नाइट राइडर्स यांचे प्रत्येकी 12 सामन्यात 12 – 12 गुण आहेत. आरसीबीला प्ले-ऑफमध्ये प्रवेश करण्यासाठी एका विजयाची आवशकताये. किंग्ज इलेव्हन पंजाबने अनपेक्षित भरारी घेत सलग पाच सामने जिंकल्याने चौथ्या स्थानाची शर्यत अधिक चुरशीची झालीये. पंजाब व्यतिरिक्त राजस्थान रॉयल्स, कोलकाता नाइट रायडर्स, सनरायजर्स हैदराबाद हे संघ मोक्याच्या क्षणी कामगिरी उंचावत असल्याने स्कोअर बोर्ड वरच्या क्रमांकावरील संघांच्या चिंतेत भर पडलीये.
हेही वाचा
- नदाल गोल्फच्या मैदानावर
- https://www.goanvartalive.com/sports/nadal-on-golf-ground/