एफसी गोवावर १-० ने मात

मु्ंबई सिटीचा गोव्याला धक्का

Goan Varta Live | प्रतिनिधी

फातोर्डा :सातव्या हिरो इंडियन सुपर लिग फुटबॉल स्पर्धेत (आयएसएल) बुधवारी मुंबई सिटी एफसीने एफसी गोवा संघावर १-० असा विजय मिळविलाय. इंग्लंडचा स्ट्रायकर अॅडम ली फाँड्रे याने पेनल्टी सत्कारणी लावत केलेला गोल निर्णायक ठरलाय.पाच मिनिटांच्या अतिरिक्त वेळेतील तिसऱ्या मिनिटास मुंबईच्या सी गोडार्ड यानं उजवीकडून गोलक्षेत्रात मुसंडी मारत गोव्याच्या दोन बचावपटूंना चकविलेय. त्याच्या क्रॉस शॉटवर बदली खेळाडू बिपीन सिंगनं हेडिंग केली. त्यावेळी चेंडू गोव्याचा मध्यरक्षक लेनी रॉड्रीग्ज याच्या हाताला लागला. गोलक्षेत्रात हे घडल्यामुळे पंच राहुलकुमार गुप्ता यांनी मुंबईला पेनल्टी बहाल केली. त्यावर अॅडमनं गोल केलाय.

पहिल्या सत्रात पाच मिनिटांचा खेळ बाकी असताना गोव्याचा एक खेळाडू कमी झाला. गोव्याचा मध्यरक्षक रेडीम ट्लांग यानं मुंबईचा मध्यरक्षक हर्नान सँटाना याला रोखलं. चेंडूवर ताबा मिळवून हर्नान आगेकूच करीत असतानाच रेडीमनं त्याला नियमबाह्य पद्धतीनं रोखलं. त्यामळे रेडीमला पंच राहुलकुमार गुप्ता यांनी लाल कार्डदाखवून बाहेर काढला. त्याआधीच्याच म्हणजे ३९व्या मिनिटाला हर्नान याला गोव्याचा मध्यरक्षक अल्बर्टो नोग्युराने पाडलेले. तिसऱ्या मिनिटाला रेडीमनं मुंबईचा बचावपटू अमेय रानवडेला चकवून चेंडूवर ताबा मिळवित आगेकूच केली होती, पण प्रतिस्पर्धी मध्यरक्षक गोडार्ड यानं त्याला रोखले. पाचव्या मिनिटाला गोव्याचा बचावपटू इव्हान झालेझ याने मारलेला चेंडू मुंबईचा मध्यरक्षक फारुख चौधरीने थोपविला. मग चेंडू गोलक्षेत्रात गेला, पण गव्याच्या सुदैवानं गोलरक्षक महंमद नवाझ यानमं परिस्थितीवर नियंत्रण मिळविले. आठव्या मिनिटाला सामन्यातील पहिला कॉर्नर गोव्याला मिळाला. स्ट्रायकर इगोर अँग्युलो यानं घेतलेल्या कॉर्नरवर चेंडू गोलक्षेत्रात गेला. त्यावर मध्य फळीतील अल्बर्टो नोग्युरानं मारलेला फटका मात्र अकारण जास्त ताकदवान होता. त्यामुळे चेंडू त्याच्या पासून दूर गेला, जो मुंबईचा बचावपटू सार्थक गोलुईने बाहेर घालविला. त्यातून पुन्हा मिळालेल्या कॉर्नरवर विशेष काही घडले नाही.

दुसऱ्या सत्रात प्रारंभी मुंबईचा गोलरक्षक अमरींदर सिंग याने दमदार बचावाचे प्रदर्शन केले. ५६व्या मिनिटाला गोव्याचा मध्यरक्षक लेनी रॉड्रीग्ज यानं उजवीकडून आगेकूच केली आणि चेंडू गोलक्षेत्रात मारला. मुंबईचा बचावपटू मुर्तडा फॉल यानं तो थोपविला, पण चेंडू सहा यार्ड बॉक्समध्येच होता. गोव्याचा बचावपटू इव्हान गोंझालेझ याने प्रयत्न केला, पण अमरींदरनं क्षणार्धात उजवीकडं जात ही चाल रोखली. तीन मिनिटांनी म्हणजे ५९व्या मिनिटाला मुंबईनं नेटच्या दिशेने पहिला फटका मारला. बुमूस याला गोलक्षेत्रात चेंडू मिळाला. उजवीकडे हालचाल करीत त्याने प्रयत्न केला, पण नवाझनं अचानक उसळलेला चेंडू नीट अडविला.

हेही वाचा

दिएगो माराडोना यांचं ह्रदयविकाराच्या झटक्यानं निधन

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.
error: Content is protected !!