आजच्या सामन्यात”करा किंवा मरा”

राजस्थान, हैदराबादसाठी विजय अत्यावश्यक

Goan Varta Live | प्रतिनिधी

IPL क्रिकेटमध्ये आज होणाऱ्या राजस्थान रॉयल्स आणि सनरायजर्स यांच्यातील लढतीत दोन्ही संघांसाठी विजय अत्यावश्यक असणारे. अनुभवी खेळाडू अपयशी ठरल्यास हैदराबादकडून प्रियम गर्ग आणि अब्दुल समद तर राजस्थानकडून कार्तिक त्यागी आणि रियान पराग या युवा खेळाडूंवर कामगिरी उंचावण्याची जबाबदारी असणारे.

‘आयपीएल’ स्कोअर बोर्डवर हैदराबादचा संघ सातव्या स्थानावर आहे, तर राजस्थानचा संघ सहाव्या स्थानावर आहे. पाच सामने बाकी असलेल्या हैदराबादला आणखी एकसुद्धा पराभव परवडणारा नाहीये. मात्र राजस्थानची स्थिती त्या तुलनेत बरीये.

जोफ्रा आर्चर, श्रेयस गोपाळ आणि राहुल तेवतिया आपली भूमिका चोख बजावतायेत. फलंदाजीत जोस बटलर आणी स्टीव्ह स्मिथने त्याला उत्तम साथ दिलीये. राजस्थानला चांगल्या भागीदारी करून देणाऱ्या फलंदाजांची आवश्यकता असणारे. अष्टपैलू बेन स्टोक्स अद्याप दर्जाला साजेशी खेळी साकारू शकला नाहीये. रॉबिन उथप्पा आणि संजू सॅमसन सातत्याने अपयशी ठरतायेत. त्यामुळे पंजाबचा फलंदाज मनन व्होराला संधी मिळू शकते.

दुसरीकडे, हैदराबादला कोलकाता नाइट रायडर्सकडून सुपर ओव्हरमध्ये पत्करलेल्या पराभवातून सावरण्याचे आव्हान असेल. दुखापतीमुळे वेगवान गोलंदाज भुवनेश्वर कुमार आणि अष्टपैलू मिचेल मार्श नसल्याची तीव्र उणीव हैदराबादला जाणवते. हैदराबादची फलंदाजीची फळी कर्णधार डेव्हिड वॉर्नर, जॉनी बेअरस्टो, मनीष पांडे आणि केन विल्यम्सन यांच्यावर अवलंबून असणारे .

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.
error: Content is protected !!