आशियाई टेबल टेनिस स्पर्धेसाठी मनिका संघाबाहेर

राष्ट्रीय शिबिरात उपस्थित न राहिल्यामुळे संघ निवडीत विचार नाही; २८ सप्टेंबरपासून दोहा येथे आशियाई स्पर्धा

Goan Varta Live | प्रतिनिधी

नवी दिल्ली: आशियाई अजिंक्यपद स्पर्धेसाठी आघाडीची टेबल टेनिसपटू मनिका बात्रा हिला भारतीय संघात स्थान मिळालेले नाही. राष्ट्रीय शिबिरात उपस्थित न राहिल्यामुळे तिचा संघ निवडीत विचार झालेला नाही. तिच्या गैरहजेरीत सुतिर्था मुखर्जी महिलाकडे संघाचे नेतृत्व सोपविण्यात आलेलं आहे.

२८ सप्टेंबरपासून दोहा येथे आशियाई स्पर्धा

आशियाई स्पर्धा २८ सप्टेंबरपासून दोहा येथे सुरू होणार आहे. राष्ट्रीय शिबिरातील उपस्थिती अनिवार्य असताना तीने त्याकडे दुर्लक्ष केले. आशियाई स्पर्धेत यावेळी बलाढ्य चीन सहभाग घेणार नाही. त्यामुळे पुरुष विभागात भारताच्या पदकाच्या आशा उंचावल्या आहेत.
भारतीय टेबल टेनिस संघटनेने आपल्या संकेतस्थळावरून हा संघ जाहीर केला आहे. याव्यतिरिक्त मनिकाने आपण पुण्यात वैयक्तिक मार्गदर्शकाबरोबर सराव करणार असल्याचे महासंघाला कळवले होते. मात्र, महासंघाने त्याला परवानगी दिली नाही.

जाहीर करण्यात आलेला संघ

पुरुष : मानव ठक्कर, शरथ कमाल, जी. साथीयन, हरमीत देसाई, सनिल शेट्टी
दुहेरी : शरथ कमाल-जी. साथीयन, मानव ठक्कर-हरमीत देसाई
महिला : सुतिर्था मुखर्जी, श्रीजा अकुला, अहिक्या मुखर्जी, अर्चना कामत
दुहेरी : अर्चना कामत-श्रीजा अकुला, सुतिर्थ मुखर्जी-अहिक्या मुखर्जी
मिश्र दुहेरी : मानव ठक्कर-अर्चना कामत, हरमीत देसाई-श्रीजा अकुला     

हा व्हिडिओ पहाः CM Pramod Sawant on SoP | चतुर्थीच्या SoP मागे घेण्याचं कारण मुख्यमंत्र्यांनी सांगितलंय

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.
error: Content is protected !!