वेटलिफ्टिंगमध्ये लवप्रीतला कांस्यपदक…

लवप्रीतने एकूण ३५५ किलो वजन उचलून केला कांस्यपदकावर कब्जा

Goan Varta Live | प्रतिनिधी

बर्मिंगहॅम : राष्ट्रकुल स्पर्धेच्या सहाव्या दिवशीही भारतीय खेळाडूंनी दमदार प्रदर्शन केले. वेटलिफ्टिंगच्या पुरुष १०९ किलो ग्राम वजनी गटात भारताच्या लवप्रीत सिंहने देशासाठी कांस्यपदक जिंकले. लवप्रीत सिंहने स्नॅचमध्ये १६३ किलो आणि क्लीन अँड जर्कमध्ये १९२ किलो असे एकूण ३५५ किलो वजन उचलून कांस्यपदकावर कब्जा केला. लवप्रीतच्या यशस्वी कामगिरीनंतर भारताची राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेतील पदकसंख्या सहा सुवर्णासह चौदावर पोहचली आहे.
हेही वाचा:रेल्वे दुपदरीकरणाला विरोध करणारी याचिका खंडपीठाने फेटाळली…

भारताच्या खात्यात आणखी एका कांस्यपदकाची भर

वेटलिफ्टिंगच्या पुरुष १०९ किलो ग्राम वजनी गटात लवप्रीत सिंहने चांगली कामगिरी केली. दरम्यान, स्नेच प्रकारातील पहिल्या प्रयत्नात त्याने १५७ किलो ग्राम वजन उचलले. त्यानंतर दुसऱ्या प्रयत्नात १६१ आणि तिसऱ्या प्रयत्नात १६३ किलो वजन उचलले. तसेच क्लीन अँड जर्कमधील पहिल्या प्रयत्नात १८५ किलो ग्राम वजन उचलले. त्यानंतर दुसऱ्या प्रयत्नात १८९ आणि तिसऱ्या प्रयत्नात १९२ किलोग्राम वजन उचलले. लवप्रीत सिंहच्या उत्कृष्ट कामगिरीच्या जोरावर भारताच्या खात्यात आणखी एका कांस्यपदकाची भर पडली.
हेही वाचा:काजू फेणी, खोला, हरमल मिरची, खाज्यांना हवी गोमंतकीयांची ‘मते’, वाचा सविस्तर…

वेटलिफ्टिंगमध्ये भारताचा दबदबा

राष्ट्रकुल स्पर्धेत भारताने आतापर्यंत १४ पदक जिंकली आहेत. ज्यात पाच सुवर्ण, पाच रौप्य आणि चार कांस्य पदकांचा समावेश आहे. विशेष म्हणजे, भारताने सर्वाधिक पदक वेटलिफ्टिंगमध्येच जिंकली आहेत.
लवप्रीतचे मोदींकडून अभिनंदन !
लवप्रीत सिंहने वेटलिफ्टिंगच्या पुरुषांच्या १०९ किलोग्राम वजनी गटात कांस्यपदक जिंकल्याने पंतप्रधान नरेंद्र मोदींनी त्याचे अभिनंदन केले. युवा आणि गतिमान लवप्रीत सिंहने त्यांच्या शांत स्वभावाने आणि खेळातील समर्पणाने सर्वांना प्रभावित केले आहे, भविष्यातील पुढील वाटचालीसाठी त्यांनी लवप्रीतला शुभेच्छा दिल्या.
हेही वाचा:स्टेशनरी दुकानाआड व्हायची गुटखा व सिगारेटची विक्री, मात्र…

भारतासाठी पदक जिंकलेल्या खेळाडूंची यादी

सुवर्णपदक : ५ (मीराबाई चानू, जेरेमी लालरिनुंगा, अंचिता शेउली, महिला लॉन बॉल संघ, टेबल टेनिस पुरुष संघ.)
रौप्यपदक : ५ (संकेत सरगरी, बिंदियाराणी देवी, सुशीला देवी, विकास ठाकूर, भारतीय बॅडमिंटन संघ.)
कांस्यपदक : ४ (गुरुराजा पुजारी, विजय कुमार यादव, हरजिंदर कौर, लवप्रीत सिंह.) 
हेही वाचा:शाळा विलिनीकरणास पालकांचा विरोध…

 

 

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.
error: Content is protected !!