लांब उडी : श्रीशंकर अंतिम फेरीत…

श्रीशंकरने ८.०५ मीटर उडी मारून अ गटात अंतिम फेरी गाठली

Goan Varta Live | प्रतिनिधी

बर्मिंगहॅम : भारताचा राष्ट्रीय विक्रमवीर मुरली श्रीशंकर मंगळवारी राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत पात्रता फेरीत अव्वल स्थानी राहून पुरुषांच्या लांब उडी स्पर्धेच्या अंतिम फेरीसाठी पात्र ठरला. तर मोहम्मद अनीस याहियाने आठव्या स्थानावर राहून पुरुषांच्या लांब उडी स्पर्धेच्या अंतिम फेरीसाठी पात्र ठरला. श्रीशंकरने पहिल्याच प्रयत्नात ८.०५ मीटर उडी मारून अ गटात अंतिम फेरी गाठली.
हेही वाचा:उच्च माध्यमिक शाळांनी दत्तक घ्यावी अंगणवाडी…

आठ मीटरचे पात्रता गुण मिळवणारा एकमेव धावपटू

केरळ येथील २३ वर्षीय अँथलीट श्रीशंकर भारतासाठी पदकाच्या प्रमुख दावेदारांपैकी एक आहे. आठ मीटरचे पात्रता गुण मिळवणारा तो एकमेव धावपटू होता. त्याने मारलेल्या उडीला वाऱ्याचीही मदत झाली. या दरम्यान वाऱ्याचा वेग अधिक २.७ मीटर प्रति सेकंद होता. युजीन, यूएसए येथे नुकत्याच संपलेल्या जागतिक चॅम्पियनशिपमध्ये सातव्या स्थानावर राहिलेल्या श्रीशंकरने ८.३६ मी. अशी सर्वश्रेष्ठ कामगिरी केली होती. या भारतीय खेळाडूने आपल्या शानदार प्रयत्नानंतर आपल्या प्रशिक्षकासह सर्व भारतीय चाहत्यांच्या मनामनामध्ये पोहोचला.
हेही वाचा:सर्वोच्च न्यायालयाने फेटाळला छोटूचा जामीन…

मोहम्मद याहिया ठरला अंतिम फेरीसाठी पात्र

लांब उडीत भारताचा मोहम्मद अनीस याहियाने तीन प्रयत्नांत ७.४९ मीटर, ७.६८ मीटर आणि ७.४९ मीटर उडी मारून अंतिम फेरीसाठी पात्र ठरला. याहियाने दुसऱ्या प्रयत्नात आपली कामगिरी सुधारली आणि ब गटात तिसरे स्थान पटकावले. त्याची सर्वोत्तम कामगिरी ८.१५ मीटर आहे. ज्या खेळाडूंनी अंतिम फेरी गाठली त्यांनी आठ मीटरचे स्वयंचलित पात्रता गुण प्राप्त करत १२ जणांमध्ये सर्वोत्तम कामगिरी केली.
हेही वाचा:मावळींगे कुडचिरे पंचायतीतून ८२ वर्षीय उमेदवार रिंगणात…

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.
error: Content is protected !!