वालोर! आपल्या गोव्याचा लिटल लियॉन ठरला ग्रँडमास्टर

१४ वर्षांच्या मुलानं केली कम्माल

Goan Varta Live | प्रतिनिधी

पणजीः गोव्याचा सुपुत्र लियॉन मेंडोसा याने ग्रॅडमास्टर बनण्याचा मान प्राप्त केलाय. हा किताब मिळवणारा तो गोव्याचा दुसरा तर भारताचा 67 वा ग्रॅडमास्टर ठरलाय. अनुराग म्हामल याने गोव्याचा पहिला ग्रॅडमास्टर बनण्याचा मान प्राप्त केलाय.

लियॉन मेंडोसा याने ग्रॅण्डमास्टर पदासाठी तिसरा आणि महत्वाचा टप्पा इटलीत झालेल्या स्पर्धेत पार पाडला. 14 वर्षे 9 महिने आणि 17 दिवसांचे वय असलेला लियॉन ग्रॅण्डमास्टर पदावर पोहचलाय. ऑक्टोबरात झालेल्या रिगो बुद्धीबळ ग्रॅण्डमास्टर राऊंड रॉबीन स्पर्धेत त्याने पहिला टप्पा पार केला होता. दुसरा टप्पा त्याने नोव्हेंबरात बुडापेस्ट इथे झालेल्या स्पर्धेत पटकावला. तिसरा टप्पा इटलीत झालेल्या वर्गेनी करंड स्पर्धेत पार करून त्याने ग्रँडमास्टर पदाला गवसणी घातली.
वर्गेनी स्पर्धेत त्याने 6.5 गुणांसह दुसरे स्थान पटकावले. पहिले स्थान युक्रेनचा विताली बर्नाडस्कीक (7 गूण) याला मिळाले.

लियॉन आपल्या वडिलांसोबत यंदा मार्च महिन्यात एका स्पर्धेत भाग घेण्यासाठी युरोपात गेला होता. ह्या काळात करोना महामारीमुळे युरोपमध्ये लॉकडाउन जाहीर झाले. या लॉकडाउनमुळे मेंडोसा पिता- पुत्र युरोपात अडकून पडले. पण या परिस्थितीत निराश न होता त्यातून नवी संधी शोधण्याचे काम त्यांनी केले. या संधीचा उपयोग करून त्याने यंदा ग्रॅडमास्टर किताबाला गवसणी घालण्याचा चंग बांधला आणि युरोपातील सर्व स्पर्धांत तो वाटेकरी झाला.

मार्च ते डिसेंबर या नऊ महिन्यांत लियॉन याने तब्बल 16 स्पर्धांत सहभाग घेतला. यामुळे त्याला आपल्या 2452 गुणांत सुधारणा करून ते 2544 पर्यंत नेणे शक्य झाले.

आय एम व्हेरी हॅप्पी- मॅंडोसा

ग्रॅण्डमास्टर पदाला गवसणी घातलेला लियॉन मेंडोसा याने या यशाबद्दल आपल्याला खूप आनंद झाल्याची प्रतिक्रिया दिली. विशेष म्हणजे प्रशिक्षक विष्णू प्रसन्न, प्रायोजक ज्यांनी आपल्याला सहाय्य आणि पाठींबा दिला त्यांचे त्याने विशेष आभार व्यक्त केलेत.

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.
error: Content is protected !!