IPLAuction2021 | आपल्या युवीचा रेकॉर्ड ख्रिस मॉरिसने तोडला! तब्बल इतक्या कोटींची बोली

IPL 2021 साठी ख्रिस मॉरिस सगळ्यात महागडा खेळाडू

Goan Varta Live | प्रतिनिधी

ब्युरो : दक्षिण आफ्रिकेचा ऑलराऊंडर ख्रिस मॉरिसने आयपीएल लिलावात इतिहास रचलाय. रेकॉर्डब्रेक किंमत ख्रिस मॉरिसवर लावण्यात आली आहे. तब्बल 16 कोटी 25 लाख रुपये इतक्या किंमतीत ख्रिस मॉरिसला विकत घेतलंय ते राजस्था रॉयल्सने. आतापर्यंतच्या आयपीएलच्या इतिहासातली ही सगळ्यात मोठी बोली आहे.

ख्रिस मॉरिस हा दक्षिण अफ्रिकेचा ऑल राऊंडर प्लेअर आहे. 33 वर्षांचा ख्रिस मॉरिसने युवराज सिंगचा रेकॉर्ड तोडलाय. युवराज सिंगला 2015मध्ये 16 कोटींमध्ये दिल्लीनं खरेदी केलं होतं. ख्रिस मॉरिसहा कोहलीनंतर आयपीएलमध्ये सर्वात जास्त सॅलरी घेणारा खेळाडू बनलाय.

आरसीबीच्या विराट कोहलीची सॅलरी आहे 17 कोटी रुपये. मॉरिसने आपली बेस प्राईज 75 लाख ठेवली होती. ख्रिस मॉरिसला खरेदी करण्यासाठी मुंबई इंडियन्स, किंग्स इलेव्हन पंजाब आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुनेही बोली लावली होती. पण या सगळ्यात बाजी मारली ती राजस्थान रॉयल्सने.

आयपीएलचे सगळ्यात महागडे खेळाडू

1 ख्रिस मॉरिस – 2021मध्ये 16 कोटी 25 लाख (राजस्थानने खरेदी केलं)

2 युवराज सिंह – 2015मध्ये 16 कोटी रुपये (दिल्लीने खरेदी केलं)

3 पैंट कमिंग – 2020मध्ये 15 कोटी 50 लाख (कोलकाताने खरेदी केलं)

  1. बेन स्टोक्स – 2017मध्ये 14 कोटी 50 लाख (आरपीएसने खरेदी केलं)

5 ग्लॅन मॅक्सवैल – 2021मध्ये 14 कोटी 25 लाख (आरसीबीने खरेदी केलं)

ख्रिस मॉरिसला रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुने रिलीज केलं होतं. मॉरिनं मागच्या सीझनमध्ये तगडा परफॉर्मन्स दिला होता. अखेरच्या षटकांत आक्रमक फलंदाजी करत त्यानं आपलं टॅलेंट दाखवून दिलं होतं.

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.
error: Content is protected !!