‌IPL फायनलपूर्वीचं दिल्लीच्या चिंतेत वाढ

रोहित शर्मानं दिली आनंदाची बातमी

Goan Varta Live | प्रतिनिधी

दुबई: दुबईतील क्रिकेटच्या रणांगणावर आज इंडियन प्रीमियर लीगच्या निकालाची उत्कंठाही शिगेला पोहोचलीये. पाचव्यांदा जेतेपदासाठी दावेदारी करणाऱ्या मुंबई इंडियन्सपुढे प्रथमच जेतेपद जिंकू इच्छिणाऱ्या दिल्ली कॅपिटल्सचे कडवे आव्हान असणारे. या हायहोल्टेज सामन्यापूर्वी मुंबईच्या चाहत्यांसाठी दिलासादायक बातमी समोर आलीये. सामन्यापूर्वी पत्रकार परिषदेत बोलताना कर्णधार रोहित शर्मानं वेगवान गोलंदाज ट्रेंट बोल्ट तंदुरुस्त असल्याचं सांगितलंय.

वेगवान गोलंदाजीचा धुरा सांभाळणारा आघाडीचा गोलंदाज ट्रेंड बोल्ट दिल्लीविरुद्ध खेळण्यास तयारे. क्वालिफाय सामन्यात दिल्लीबरोबरच बोल्टला जखम झालेली.आयपीएलच्या १३ व्या हंगामात मुंबईसाठी बोल्टने महत्त्वाची भूमिका बजावली होती. पहिल्या सहा षटकांत बोल्टनं आतापर्यंत सात विकेट घेत प्रतिस्पर्धी संघाला सळो की पळो करुन सोडलंय. बुमराहबरोबर आता दिल्लीला बोल्टच्या वेगवान माऱ्यालाही सामोरं जावं लागणारे.

जेव्हा एखाद्या संघात एकापेक्षा एक विजयवीर असतात, तेव्हा कर्णधाराला फारसे काही सांगण्याची गरज लागत नाही. त्यामुळे अंतिम फेरीतही आम्ही आतापर्यंत ज्याप्रमाणे खेळ केला, तसाच अंतिम फेरीतही करू, असा विश्वास रोहितनं व्यक्त केलाय.

बुमराह आणि बोल्ट या जोडीनं आयपीएलच्या १३ व्या हंगामात ५० पेक्षा जास्त विकेट घेतल्या. बोल्टनं १४ सामन्यात २२ विकेट घेतल्या. पहिल्या क्वालिफाय सामन्यातील पहिल्याच षटकांत बोल्टनं दिल्लीच्या दोन फलंदाजांना माघारी पाठवलेल. बोल्टनं पहिल्याच षटकांत दिल्लीचं कंबरडं मोडलं होतं. त्याने पहिल्याच षटकात पृथ्वी शॉ व अजिंक्य रहाणेला शून्य धावेवर बाद केले.फिल्डींग करत असताना १४ व्या षटकांत groin injury मुळे बोल्टला मैदानाबाहेर जाव लागल होतं.

हेही वाचा

बिहार विधानसभा निवडणूक 2020

मुलांनी दिव्यांग विनिताचा आदर्श घ्यावा

#IPL 2020 : विजेत्या संघाला मिळणार 10 कोटी

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.
error: Content is protected !!