IPL Final | दिल्लीला मोठा धक्का! 4 ओव्हरमध्येच दाणादाण
आयपीएलच्या फायनलची रंगतदार लढत

सिध्देश सावंत | प्रतिनिधी
ब्युरो : आयपीएलची फायनल सुरु आहे. सामना पहिल्याच बॉलपासून रंगतदार झालाय. अवघ्या चार ओव्हरमध्ये दिल्लीची दाणादाण उडाली आहे.
ओपनर्स माघारी
दिल्लीचा जबरदस्त फलंदाज मार्कस स्टॉयनीस पहिल्याच चेंडूवर माघारी परतलाय. तर दुसरीकडे अजिंक्य रहाणे आणि धवनचीही विकेट पडली आहे. त्यामुळे दिल्लीला मोठा धक्का बसलाय. आजच्या फायनलकडे सगळ्यांची नजर लागली आहे. गतविजेते मुंबई इंडियन्स यंदाही बाजी मारतात का, याकडे चाहत्यांचं लक्ष लागलंय.
मुंबईच किंग?
ट्रेन्ट बोल्ट आणि जयंत यादव यांच्या भेदर माऱ्यासमोर दिल्ली बॅकफूटवर गेल्याचं चित्र पाहायला मिळतंय. प्ले ऑफमध्ये मुंबईने दिल्लीचा धुव्वा उडवला होता. आजही त्यांचीच पुनरावृत्ती होते का, हे पाहणं महत्त्वाचंय.
पाहा व्हिडीओ
Pumped up and how!#MumbaiIndians #Dream11IPL #Final pic.twitter.com/kNQG2FaeUs
— IndianPremierLeague (@IPL) November 10, 2020
ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.