#IPL 2020 : विजेत्या संघाला मिळणार 10 कोटी

बक्षिसाची रक्कम केली अर्धी

Goan Varta Live | प्रतिनिधी

यूएई : UAE मध्ये सुरु असलेला आयपीएलचा 13वा हंगाम अंतिम टप्प्यात आलाय. आयपीएल विजेत्या आणि इतर तीन संघाना यंदा बक्षीस म्हणून भरभक्कम रक्कम मिळणार आहे. पण करोनाच्या पार्श्वभूमीवर बक्षिसाची रक्कम बीसीसीआयनं अर्धी केली आहे.

विजेत्यांना यंदा 20 कोटींऐवजी 10 कोटी आणि चषक मिळणार असून उप-विजेत्यांना यंदा 12.5 कोटींऐवजी 6.25 कोटी रक्कम मिळणार आहे. बीसीसीआयने मार्च महिन्यातच याबाबतची माहिती संघमालकांना दिली आहे. तिसऱ्या व चौथ्या क्रमांकावरील संघाला यंदाच्या हंगामात 4.3 कोटी रुपये मिळणार आहेत.

आयपीएलसारख्या मोठ्या स्पर्धेतील विजेत्यांना मिळणारी ही रक्कम कमी वाटतेय कारण, लिलावप्रक्रियेत खेळाडूंनाच 15 ते 17 कोटी रुपयांना विकत घेतलं जात किंवा रिटेन केलं जातं. पण बोर्ड आणि फ्रेंचायजी यांची कमा बक्षीसाची रक्कम नव्हे तर स्पॉन्सर आहेत.

दरम्यान, मुंबईच्या संघानं आयपीएलच्या अंतिम फेरीत धडक मारली आहे. तर आरसीबीचा संघ एलिमेनटरमधून बाहेर पडला आहे. या स्पर्धेअखेर विराट कोहलीचा बेंगळुरु संघ चौथ्या स्थानावर फेकला जाणार आहे. हैदराबाद आणि दिल्ली यांच्यात उद्या दुसरा क्वालिफाय सामना होणार आहे. यामधील विजेता संघ अंतिम फेरीत रोहित शर्माच्या मुंबई इंडियन्स संघासोबत भिडणार आहे.

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.
error: Content is protected !!