मुंबईकर रोहितची पोरं हुश्शार! IPL 2020ची ट्रॉफीसुद्धा मुंबई इंडियन्सच्या नावावर

सलग दुसऱ्यांदा मुंबईचा दणदणीत विजय

सिध्देश सावंत | प्रतिनिधी

ब्युरो : आयपीएलची फायनल झाली. मुंबईने दिल्ली अगदी सहज धूळ चारली. सामन्यात कोणत्याच क्षणी दिल्ली जिंकेल असं दिसलं नाही. हिटमॅन रोहित शर्माने दणदणीत खेळी करत पुन्हा एकदा मुंबई इंडियन्सच किंग असल्याचं दाखवून दिलं. पाचव्यांदा मुंबईनं आयपीएलच्या ट्रॉफीवर आपलं नाव कोरलं.

एकतर्फी फायनल

मुंबई इंडियन्सनं विजेतेपद कायम राखत पुन्हा एकदा धमाकेदार विजय साजरा केला. प्लेऑफच्या सामन्यात दिल्लीला पराभूत केल्यानंतर पुन्हा एकदा दिल्लीसोबत फायनल रंगली. या सामन्यात सुरुवातीपासून मुंबई इंडियन्सचं वर्चस्व पाहायला मिळालं. सुरुवातील भेदक गोलंदाजी आणि त्यानंतर संयमी बॅटिंग करत मुंबई इंडियन्सही सहजपणे दिल्लीवर विजय मिळवला.

पाचव्यांदा जेतेपद

याआधी मुंबई इंडियन्सने 2013, 2015, 2017 आणि 2019मध्येही विजेतेपद पटकावलं होतं. पाचव्यांदा आयपीएल जिंकत मुंबई इंडियन्सने रेकॉर्ड केलाय.

रोहित शर्मासोबत या सामन्यात तरुण फलंदाज ईशान किशननेही आपल्या फलंदाजीने सगळ्यांना चकीत केलं. या संपूर्ण आयपीएलमध्ये जबरदस्त फलंदाजी करणाऱ्या सूर्यकुमार यादवची बॅट फायनलमध्ये तळपली नाही. मात्र मुंबईला फायनल पर्यंत घेऊन जाण्यात त्यानंही मोलाची भूमिका बजावली होती.

मुंबईने पाच विकेट्सने दिल्लीवर फायनलमध्ये विजय मिळवला. दिल्लीने प्रथम फलंदाजी करत १५७ धावा केल्या होत्या. विजयासाठी मुंबईला १५७ धाव्या होत्या. एक ओव्हर आणि दोन चेंडू शिल्लक ठेवून मुंबईने दिल्लीवर शानदार विजय मिळवलाय.

LIVE Updates – आयपीएलचा निकाल झाला! बिहारच्या निकालाचं काय? वाचा

मुंबईकर चमकले

फायलनमध्ये दिल्लीचा कर्णधार मुंबईकर श्रेयस अय्यरही चमकला. श्रेयसने अर्धशतकी खेळी करत दिल्लीला सन्मानजनक धावसंख्या उभारुन दिली होती. ऋषभ पंतनेही महत्त्वाचं योगदान दिलं होतं. मात्र ही खेळी दिल्लीला विजय मिळवून देऊ शकली नाही. मुंबईच्या जबरदस्त फलंदाजीने दिल्लीच्या नाकी नऊ आणले. तुफान फॉर्मात असणाऱ्या फलंदाजांनी मुंबईला पुन्हा एकदा आयपीएलचं विजेतेपद मिळवून दिलं.

हेही वाचा – नितीश कुमार यांना तेजस्वी यादवांची कडवी झुंज

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.
error: Content is protected !!