भारताचा टी-२० संघ जाहीर, कोणकोण आहे टीममध्ये?

कर्णधारपद केएल राहुलकडे तर ऋषभ पंतला उपकर्णधारपद

Goan Varta Live | प्रतिनिधी

मुंबई : भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात टी-२० मालिका होणार आहे. यासाठी बीसीसीआयने संघ जाहीर केला आहे. संघाचे कर्णधारपद केएल राहुलकडे सोपवण्यात आले आहे. तर ऋषभ पंतला उपकर्णधारपद देण्यात आले आहे.
हेही वाचाः’या’ प्रस्तावावर राज्य सरकारकडून प्रतिसाद नाही…

नवीन खेळाडूंना संधी

दिनेश कार्तिकची अलीकडची कामगिरी पाहता त्याला टी-२० संघातही स्थान देण्यात आले आहे. कार्तिकसोबतच इतर नवीन खेळाडूंना संधी मिळाली आहे. आयपीएलमध्ये चांगली कामगिरी करणाऱ्या खेळाडूंचीही काळजी घेण्यात आली आहे.
हेही वाचाःगोव्यातील खाणी पुन्हा सुरू होणार?

निवड समितीने युवा खेळाडूंची विशेष काळजी घेतली

बीसीसीआयच्या निवड समितीने टी-२० मालिकेसाठी युवा खेळाडूंची विशेष काळजी घेतली आहे. लखनौ सुपर जायंट्सचा उत्कृष्ट गोलंदाज आवेश खान, सनरायझर्स हैदराबादचा वेगवान गोलंदाज उमरान मलिक, अर्शदीप सिंग, रवी बिश्नोई आणि हर्षल पटेल यांनाही स्थान मिळाले आहे. कार्तिकच्या पुनरागमनासाठी ही मालिका खास असेल. कार्तिकने आयपीएलमध्ये आरसीबीसाठी चमकदार कामगिरी केली आहे. याच कारणामुळे तो टीम इंडियात परतला आहे.
हेही वाचाःवर्षानंतर ग्रामसभा मात्र, सरपंच अनुपस्थितीत, काय आहे प्रकरण…

पहिला सामना दिल्लीत

विशेष म्हणजे भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील टी-२० मालिका ९ जूनपासून खेळवली जाणार आहे. त्याचा पहिला सामना दिल्लीत होणार आहे. या मालिकेतील दुसरा सामना १२ जून रोजी कटक येथे होणार आहे. तिसरा सामना १४ जूनला तर चौथा सामना १७ जूनला होणार आहे. या मालिकेतील शेवटचा सामना १९ जून रोजी बंगळुरू येथे होणार आहे. या मालिकेनंतर भारतीय संघ इंग्लंडविरुद्ध मालिका खेळणार आहे.
हेही वाचाःअभियंते लाच मागत असतील, तर कंत्राटदारांनी मला सांगावं…

भारताचा टी-२० संघ : 

 1. केएल राहुल (कर्णधार)
 2. ऋतुराज गायकवाड
 3. इशान किशन
 4. दीपक हुडा
 5. श्रेयस अय्यर
 6. ऋषभ पंत (उपकर्णधार/विकेटकीपर)
 7. दिनेश कार्तिक (विकेटकीपर)
 8. हार्दिक पांड्या
 9. व्यंकटेश अय्यर
 10. युझवेंद्र चहल
 11. कुलदीप यादव
 12. ए. पटेल
 13. रवी बिश्नोई
 14. भुवनेश्वर
 15. हर्षल पटेल
 16. आवेश खान
 17. अर्शदीप सिंग
 18. उमरान मलिक.
ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.
error: Content is protected !!