इलाव्हेनिलला सुवर्ण, शाहू मनाला रौप्य

Goan Varta Live | प्रतिनिधी
नवी दिल्ली : जागतिक क्रमवारीत अग्रस्थानी भारतीय नेमबाज इलाव्हेनिल वालारिवान असून तिने आभासी पद्धतीने झालेल्या शेख रसेल आंतरराष्ट्रीय एअर रायफल नेमबाजी स्पर्धेत सुवर्णपदक फडकावलंय . तर शाहू तुषार मानेने रौप्यपदकाची कमाई केलीय .
बांगलादेश नेमबाजी महासंघातर्फे झालेल्या या स्पर्धेत सहा देशांच्या नेमबाजांनी भाग घेतलेला. 60 वेळा वेध घेणाऱ्या या स्पर्धेत इलाव्हेनिल हिने 627.5 गुण मिळवून सुवर्णपदक प्राप्त केलंय. शिओरी हिरायाने 622.6 गुणांसह रौप्यपदक, तर इंडोनेशियाच्या विद्या तोय्यिबाने 621.1 गुणांसह कांस्यपदक मिळवलंय.
पुरुषांच्या प्रकारात जपानच्या नाओया ओकाडा यानं 630.9 गुणांनी सुवर्णपदकावर नाव कोरलं . शाहूने 623.8 गुणांसह रौप्य पदक पटकावलंय तर बांगलादेश- च्या बाकी अब्दुल्ला यानं 617.3 गुणांसह कांस्यपदक प्राप्त केलंय. इलाव्हेनिल परीक्षेच्या कारणास्तव राष्ट्रीय सराव शिबिरात सहभागी न झाल्यानं या स्पर्धेत खेळू शकलीय. शाहूला राष्ट्रीय क्रमवारीनुसार या स्पर्धेत खेळण्याची संधी मिळालीय.