परभव! पण अजूनही कांस्यपदकाची आशा कायम

भारतीय पुरुष संघ आता कांस्य पदकासाठी खेळणार

Goan Varta Live | प्रतिनिधी

टोकियो : बेल्जियमविरोधात मैदानात उतरलेल्या भारतीय हॉकी संघाचा ५-२ च्या फरकाने पराभव झाला. आठ सुवर्णपदकांसह ११ ऑलिम्पिक पदके खात्यावर असणाऱ्या भारताने एके काळी हॉकीमध्ये निर्विवाद वर्चस्व गाजवलेलं. मनप्रीत सिंगच्या नेतृत्वाखालील सध्याच्या भारतीय संघाला त्या यशाची पुनरावृत्ती साद घालत होती. पण बेल्जियमकडून झालेल्या पराभवामुळे भारतीय संघाची टोक्यो ऑलिम्पिकमधील ही स्वप्न धुळीला मिळालंय. उपांत्य फेरीत भारताच्या कामगिरीकडे सगळ्यांचं लक्ष लागलेलं. पहिल्या हाफमध्ये सामना बरोबरीत राखण्यात यश भारताला यश आलं खरं. पण तिसऱ्या आणि चौथ्या क्वार्टरमध्ये एकही गोल भारताला करता आला नाही. या पराभवामुळे आता भारत कांस्यपदकासाठी खेळणार आहे.

कसा झाला सामना?

पहिल्या पाच मिनिटांमध्ये बेल्जियमने सामन्यावर वर्चस्व गाजवलं. मॅच सुरु झाल्यानंतर काही मिनिटांतच बेल्जियमने गोल केला आणि आघाडी घेतली. मात्र त्यानंतर भारताने दोन मिनिटांच्या अंतरात एकामागोमाग एक २ गोल केले. पहिल्या क्वार्टरमध्ये भारताने २-१ ची आघाडी कायम ठेवली होती. पण दुसऱ्या क्वार्टरमध्ये केवळ एक गोल झाला. बेल्जियमने केलेल्या या एकमेव गोलमुळे हाफ टाइमनंतर सामना २-२ च्या बरोबरीत राहिला. मात्र तिसऱ्या आणि चौथ्या क्वार्टरमध्ये भारतीय संघाला एकही गोल करता आला नाही. दुसरीकडे बेल्जियमने शेवटच्या क्वार्टरमध्ये तीन गोल करत सामना खिशात घातला.

बेल्जियमकडून अ‍ॅलेक्झॅण्डर हेनरीक्सने हॅटट्रीक केली. भारताला पहिल्या दोन क्वार्टरमध्ये बेल्जियमला बरोबरीत रोखण्यात यश आलं होतं. पण तिसऱ्या क्वार्टरमध्ये एकाही संघाला गोल करता आला नाही. नंतर मात्र बेल्जियमला एकापाठोपाठ एक अनेक पेनल्टी कॉर्नर मिळाले आणि त्यांनी संधीचं सोनं करत भारतावर विजयी आघाडी मिळवली. नंतर ही आघाडी कायम ठेवत बेल्जियमने ५-२ ने सामना जिंकला. बेल्जियमने आपल्या पाच पैकी चार गोल पेनल्टी कॉर्नरवर केले. या विजयासह बेल्जियम आता फायनलमध्ये खेळणार आहे. रियो ऑलिम्पिकमध्ये बेल्जियमला रौप्यपदक मिळालं होतं.

पंतप्रधानांकडून हॉकी संघाचं कौतुक

सेमी फायनलमधील पराभवानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी हॉकी संघाचं कौतुक केलंय. हार-जीत हा आयुष्याचा एक भाग आहे. या संघानं जबरदस्त कामगिरी केली असून खचून जाण्याचं कोणतंही कारण नाहीये, असं म्हणत मोदींनी या संघाचं मनोबल वाढवलंय.

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.
error: Content is protected !!