ऑस्ट्रेलियाच्या मातीत स्मृती मनधनाने इतिहास रचला; शतकी खेळी

स्मृती मंधाना हिने सर्वोत्कृष्ट खेळी करत नाबाद ८० ठाेकल्या

Goan Varta Live | प्रतिनिधी

ब्युरो रिपोर्ट: भारतीय संघाच्या धडाकेबाज फलंदाज स्मृती मनधना हिने ऑस्ट्रेलियाच्या मातीत त्यांच्या विराेधातच शतक ठोकून हम किसेसे कमी नहीं हे दाखवून दिले आहे. प्रकाश झोतातील कसोटीत शतक ठाेकणारी स्मृती ही पहिली भारतीय महिला खेळाडू ठरली आहे.

स्मृती मंधाना हिने सर्वोत्कृष्ट खेळी करत नाबाद ८० ठाेकल्या

एकदिवसीय सामन्यांची मालिका २-१ ने हरल्यानंतर भारतीय महिला क्रिकेट संघाने ऑस्ट्रेलिया विरुद्ध कसाेटीच्या पहिल्या सामन्यात उत्तम कामगिरी करु लागला आहे. गुरुवारी 30 सप्टेंबर भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात कसाेटी सामन्यास प्रारंभ झाला. भारतीय संघाने प्रथम फलंदाजी करीत उत्तम खेळ केला. सलामीवीर फलंदाज स्मृती मंधाना हिने तिच्या कसोटी कारकिर्दीतील सर्वोत्कृष्ट खेळी करत नाबाद ८० ठाेकल्या. पावसामुळे गुरुवाचा सामना थांबवण्यात आला. त्यावेळी भारतीय संघाने एक गड्याच्या माेबदल्यात १३२ धावा केल्या हाेत्या.

कसाेटी सामन्यात शतक ठाेकणारी स्मृती ही पहिली भारतीय महिला

आज दुसऱ्या दिवशी स्मृती मनधनाने पुन्हा फटकेबाजी करीत ऑस्ट्रेलियाविरुद्ध १७१ चेंडूंत शतकापर्यंत मजल मारली. कसाेटी सामन्यात शतक ठाेकणारी स्मृती ही पहिली भारतीय महिला खेळाडू ठरली आहे. समाज माध्यमातून तिच्यावर काैतुकाच वर्षाव हाेऊ लागला आहे.

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.
error: Content is protected !!