तब्बल 43 वर्षानंतर भारताने रचला इतिहास…

Goan Varta Live | प्रतिनिधी
मुंबई: तब्बल 43 वर्षानंतर थॉमस कप स्पर्धेत भारतीय पुरुष बॅडमिंटन संघाने भारताला पदक सुनिश्चित करत स्पर्धेत इतिहास रचला आहे. मलेशियाला संघाला भारतीय पुरुष संघाने 3-2 ने उपांत्यपूर्व फेरीत पराभूत केलं. त्यामुळे आता भारतीय पुरुष संघाचं ब्राँझ मेडल निश्चित झालं आहे.
हेही वाचाःपरप्रांतिय महिलेचा गोव्यात खून ; मात्र पती…
𝐒.𝐄.𝐌.𝐈.𝐅.𝐈.𝐍.𝐀.𝐋.𝐒 ⚔️
Let’s do it, boys! 🤜🤛 🇮🇳 #TUC2022#ThomasCup #IndiaontheRise#Badminton pic.twitter.com/Yi2fN15CsG
— BAI Media (@BAI_Media) May 13, 2022
भारताची सुरुवात चांगली झाली नाही
भारतीय महिला बॅडमिंटन संघाला उबेर कप स्पर्धेत मध्ये यश मिळू शकलं नाही. महिला संघाला थायलंड ओपनमध्ये 0-3 ने पराभव स्वीकारावा लागला. ते आता स्पर्धेतून बाहेर गेले आहेत. भारताची सुरुवात चांगली झाली नाही. पण नंतर त्यांनी कमबॅक केलं. या मॅचआधी भारताने मागच्या दोन सामन्यात क्लीन स्वीप विजय मिळवला होता. मलेशिया विरोधात भारताची सुरुवात चांगली झाली नव्हती. 46 मिनिटं चाललेल्या लढतीत लक्ष्यला वर्ल्ड चॅम्पियन ली जी जियाने 21-23, 9-21 असं पराभूत केलं होतं. पण भारताने त्यानंतर कामगिरीत सुधारण केली व विजय मिळवला.
हेही वाचाःगोवा : नोकऱ्यांसाठी अर्ज केलेल्या हजारो युवकांसाठी खूशखबर!…