तिसऱ्या सामन्यात टीम इंडियाचा सलामीवीर सूर्यकुमार तळपला…

भारताचा विंडीजवर ७ गड्यांनी विजय : मालिकेत २-१ अशी आघाडी

Goan Varta Live | प्रतिनिधी

सेंट किटस् : सूर्यकुमार यादवने केलेल्या झुंजार ७६ धावांच्या जोरावर भारताने वेस्ट इंडिजवर तिसऱ्या टी-२० सामन्यात ७ गड्यांनी विजय मिळवला. वेस्ट इंडीजने भारतासमोर ठेवलेल्या १६५ धावांचे आव्हान भारताने १९ षटकांत ३ गड्यांच्या मोबदल्यात पार केले. भारताकडून सलामीवीर सूर्यकुमार यादवने धडाकेबाज फलंदाजी करत ४४ चेंडूत ७८ धावा केल्या. त्याला श्रेयस अय्यरने २४ तर रिषभ पंतने नाबाद ३३ धावा करून चांगली साथ दिली. या विजयाबरोबरच भारताने मालिकेत २-१ अशी आघाडी घेतली आहे.
हेही वाचा:रेल्वे दुपदरीकरणाला विरोध करणारी याचिका खंडपीठाने फेटाळली…

फलंदाजाकडून २०-२५ धावांची छोटेखानी खेळी करत साथ देण्याचा प्रयत्न

तत्पूर्वी, भारताने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला. कायले मेयर्स व ब्रेंडन किंग्स या सलामीवीरांनी भारतीय गोलंदाजांवर सुरुवातीपासून प्रहार केला. किंग्सने २० चेंडूंत २० धावा करताना तीन चौकार खेचले आणि हार्दिक पंड्याने त्याची विकेट मिळवून दिली. वेस्ट इंडिजला ५७ धावांवर पहिला धक्का बसला. वेस्ट इंडीजकडून सलामीवीर कायल मेयर्सने ५० चेंडूत दमदार ७३ धावा केल्या. त्याला इतर फलंदाजांनी २०-२५ धावांची छोटेखानी खेळी करत साथ देण्याचा प्रयत्न केला. दरम्यान, वेस्ट इंडीजने २० षटकांत ५ बाद १६४ धावा केल्या. दरम्यान, वेस्ट इंडीजचे १६५ धावांचे आव्हान घेऊन मैदानात उतरलेल्या भारताने धडाकेबाज सुरुवात करण्याचा प्रयत्न केला. कर्णधार रोहित शर्माने एक षटकार, एक चौकार मारत ५ चेंडूत ११ धावा केल्या. मात्र, एक फटका मारताना त्याचा पाठीचा स्नायू दुखावला. त्यामुळे त्याला रिटायर्ड हर्ट होऊन मैदान सोडावे लागले.
हेही वाचा:काजू फेणी, खोला, हरमल मिरची, खाज्यांना हवी गोमंतकीयांची ‘मते’, वाचा सविस्तर…

भारताने विंडीजला मात देत मालिकेत २-१ अशी अघाडी

यानंतर सूर्यकुमार यादवने डावाची सूत्रे आपल्या हातात घेत आक्रमक फलंदाजी करण्यास सुरुवात केली. त्याला दुसऱ्या बाजूने श्रेयस अय्यर सावध फलंदाजी करत साथ देत होता. या दोघांनी भारताला १२व्या षटकात शतक पार करून दिले. मात्र, अकील हुसैनने श्रेयस अय्यरला २४ धावांवर बाद करत भारताला दुसरा धक्का दिला. त्यानंतर रिषभ पंत आणि सूर्यकुमार यादवने भारताला १३५ धावांपर्यंत पोहचवले. मात्र, सामना विजयी उंबरठ्यावर आला असताना सूर्यकुमार यादव ४४ चेंडूत ७८ धावा करून बाद झाला. सूर्यकुमार बाद झाल्यानंतर पंतने हार्दिक पंड्यासोबत सामना संपवण्यासाठी भागीदारी रचण्याचा प्रयत्न केला. मात्र, हार्दिक ४ धावांची भर घालून माघारी गेला. पंड्या बाद झाल्यानंतर आलेल्या दीपक हुड्डाने पंतला चांगली साथ देत नाबाद १० धावा केल्या. रिषभ पंतने अखेर चौकार मारत सामना संपवला. भारताने सात विकेट राखून विंडीजला मात देत मालिकेत २-१ अशी अघाडी घेतली.
हेही वाचा:स्टेशनरी दुकानाआड व्हायची गुटखा व सिगारेटची विक्री, मात्र…

हार्दिक पंड्याचा विक्रम

आंतरराष्ट्रीय टी-२०त ५००+ धावा अन् ५० गडी बाद करणारा हार्दिक पंड्या हा भारताचा पहिलाच, तर जगातला दहावा अष्टपैलू खेळाडू ठरला आहे. यापूर्वी शाकिब अल हुसैन, शाहीद आफ्रिदी, ड्वेन ब्राव्हो, जॉर्ज डॉक्रेल, मोहम्मद नबी, मोहम्मद हाफिज, केव्हिन ओ ब्रायन, थिसारा परेरा यांनी हा पराक्रम केला आहे.
हेही वाचा:शाळा विलिनीकरणास पालकांचा विरोध…

टी-२० क्रमवारीत सूर्याची मोठी झेप

भारताचा स्टार फलंदाज सूर्यकुमार यादव सध्या वेस्ट इंडिजविरुद्ध सुरू असलेल्या टी-२० मालिकेत उत्कृष्ट फॉर्ममध्ये आहे. त्याने ताज्या आयसीसी टी-२० फलंदाजी क्रमवारीत दोन स्थानांनी झेप घेतली आहे. सूर्याने विंडिजविरुद्ध खेळल्या गेलेल्या दुसऱ्या सामन्यात ७६ धावांची तडाखेबाज खेळी केली. त्याचा त्याला रँकिंगमध्येही फायदा झाला आहे. सूर्यकुमार यादव (८१६) आणि पाकिस्तानचा कर्णधार बाबर आझम (८१८) यांच्यातील अंतर आता फक्त दोन रेटिंग गुणांचे आहे. सूर्यकुमारने ताज्या क्रमवारीत पाकिस्तानच्या मोहम्मद रिझवान आणि दक्षिण आफ्रिकेच्या एडन मार्करामला मागे टाकले आहे.
संक्षिप्त धावफलक :
वेस्ट इंडिज : २० षटकांत ५ बाद १६४ धावा
भारत : १९ षटकांत ३ बाद १६५ धावा
सामनावीर : सूर्यकुमार यादव
हेही वाचा:३१ मद्यपी चालकांना खाकीचा दणका, परवाने जप्त…

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.
error: Content is protected !!