वेटलिफ्टिंगमध्ये हरजिंदरने मिळवले कांस्यपदक…

हरजिंदरने एकूण २१२ किलो वजन उचलले

Goan Varta Live | प्रतिनिधी

बर्मिंगहॅम : भारताची वेटलिफ्टर हरजिंदर कौरने ७१ किलो वजनीगटात भारताला कांस्यपदक पटकावून दिले. तिने एकूण २१२ किलो वजन उचलले. यात स्नॅच प्रकारात ९३ किलो, तर क्लीन अँड जर्क प्रकारात ११९ किलो वजन उचलले. भारताचे हे दिवसातले तिसरे पदक ठरले. वेटलिफ्टिंगमधून हे भारतासाठीचे सातवे पदक ठरले. विशेष म्हणजे हरजिंदर कौर चौथ्या स्थानावर राहील, असे वाटत होते. मात्र शेवटच्या क्षणी नायजेरियन वेटलिफ्टरला क्लीन अँड जर्कचा शेवटचा प्रयत्न फसला आणि कौरच्या गळ्यात कांस्यपदक पडले. ज्यामुळे देशभरातून तिचे अभिनंदन केले जात आहे.
हेही वाचा:८२ वर्षांचे आजोबा पंचायत निवडणूकीच्या रिंगणात…

हरजिंदर कौरने केले कठोर परिश्रम

कॉमनवेल्थ स्पर्धेच्या २२ व्या हंगामात तिने इंग्लंडच्या सारा डेव्हिस आणि कॅनडाच्या अँलेक्सिस अँशवर्थ यांना मागे टाकत कांस्यपदकावर कब्जा केला आणि अखेर इंग्लंडमध्ये भारताचा तिरंगा फडकावला. विशेष म्हणजे, हरजिंदर कौरने इथर्यंत पोहचण्यासाठी कठोर परिश्रम केले. भारताचे प्रतिनिधित्व करण्यापूर्वी हरजिंदर कौर गवत कापण्याच‍े काम करायची. परंतु, तिने आपली जिद्द सोडली नाही.
हेही वाचा:पैकुळमध्ये मतदान केंद्राची व्यवस्था करा…

प्रशिक्षक परमजीत शर्माने हरजिंदरची प्रतिभा ओळखल

हरजिंदर कौर ही साहिब सिंह आणि कुलदीप कौर यांची सर्वात लहान मुलगी. ज्यावेळी हरजिंदरने कॉलेजमध्ये प्रवेश घेतला, तेव्हा तिच्या प्रशिक्षकाने तिला कबड्डी खेळण्यासाठी प्रभावित केले. एक वर्षानंतर हरजिंदर कौरचा पंजाब युनिव्हर्सिटी, पटियालामध्ये स्पोर्ट्स विंगमध्ये समावेश करण्यात आला. जिथे परमजीत शर्माने तिची प्रतिभा ओळखली. 
हेही वाचा:उच्च माध्यमिक शाळांनी दत्तक घ्यावी अंगणवाडी…

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.
error: Content is protected !!