हैदराबाद 1-0 फरकानं विजयी

अरीडेन सँटानाचा निर्णायक गोल

Goan Varta Live | प्रतिनिधी

पणजी : सातव्या हिरो इंडियन सुपर लीग फुटबॉल स्पर्धेत (आयएसएल) हैदराबादने ओडिशावर 1-0 असा विजय मिळवलाय. स्पेनचा स्ट्रायकर अरीडेन सँटाना यानं पहिल्या सत्रात पेनल्टीवर केलेला गोल निर्णायक ठरलाय.

सामन्याच्या ३४व्या मिनिटाला हैदाराबादचा मध्यरक्षक हालीचरण नारी याने मध्य क्षेत्रात चेंडूवर ताबा मिळवून आगेकूच केलीये. तो नेटच्या दिशेने फटका मारत असतानाच ओडिशाचा बचावपटू स्टीव्हन टेलर याने मैदानावर घसरत त्याला रोखण्याचा प्रयत्न केलाय. त्याचवेळी त्याच्या दंडाला चेंडू लागला. त्यामुळे पंच तेजस नागवेकर यांनी टेलरला यलो कार्ड दाखवितानाच हैदराबादला पेनल्टी बहाल केलीये.ही पेनल्टी घेण्यासाठी सँटाना पुढे सरसावला. त्याने सफाईदार फटका मारला. ओडिशाचा गोलरक्षक अर्शदीप सिंग याने उजवीकडे झेप टाकली, पण तो गोल रोखू शकला नाही.

पाचव्या मिनिटाला हैदराबादने प्रयत्न केलाय. मध्य फळीतील लुईस सॅस्त्रेने कॉर्नरवर फटका मारलाय. गोलक्षेत्रात सँटानाला संधी मिळालीये. त्याने उंच उडी घेत हेडिंग केले, पण त्यात अचूकता नव्हती. दोन मिनिटांनी हैदराबादनं पुन्हा मुसंडी मारली. मध्य फळीतील आकाश मिश्राने आगेकूच करीत ताकदीने फटका मारलाय, पण चेंडू अर्शदीपच्या फार जवळ होता. त्यामुळे अर्शदीप तो सहज थोपवू शकला. मग चेंडू हैदराबादचा मध्यरक्षक महंमद यासीर याच्या दिशेने गेला, पण तो ऑफसाईडच्या स्थितीत होता.१२व्या मिनिटाला हैदराबादने ओडिशाच्या बचाव फळीवर पुन्हा दडपण आणले. त्यावेळी उजवीकडे मध्य फळीतील निखील पुजारीने पास मिळताच आगेकूच केली, पण स्वैर फटक्यामुळे तो फिनिशिंग करू शकला नाही.

दुसऱ्या सत्रात ५८व्या मिनिटाला ओडिशाचा स्ट्रायकर दिएगो मॉरीसिओ याच्या अपयशी प्रयत्नानंतर आघाडी फळीतील सहकारी मॅन्युएल ओन्वू याने फटका मारलाय, पण तो हैदाराबादचा गोलरक्षक सुब्रत पॉल याने आरामात अडवीला. 78व्या मिनिटाला लुइसच्या चालीवर सॅंटानाने हेडिंग केले पण बॉल नेटवरून बाहेर गेला.अखेरच्या काही मिनिटांत ओडिशाचा मॉरीसिओ आणि हैदराबादचा लिस्टन कोलॅको यांना फिनीशिंग करता आले.

हेही वाचा

FC गोवा ‘इगो’ बंगळूरूवर भारी

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.
error: Content is protected !!