गोमंतकीय कन्या भक्तीच्या कामगिरीकडे लक्ष

बुद्धिबळ वर्ल्ड चॅम्पियनशिपमध्ये आज पहिली लढत

Goan Varta Live | प्रतिनिधी

ब्युरो : रशियात सुरु असलेल्या बुद्धिबळ वर्ल्ड चॅम्पियनमध्ये गोव्याची कन्या आज पहिल्या सामन्याला सामोरी जाणार आहे. या स्पर्धेसाठी ओमंतकीय कन्या आयएम भक्ती कुलकर्णी ही पात्र ठरलीये. तिचा सामना आज रशियाची ग्रँडमास्टर परमझिना अनास्तसिया हीच्या विरुद्ध रंगणार आहे.

हेही वाचा : अभिमानास्पद! बुद्धिबळातील ‘युवा ग्रँडमास्टर’

१०३ खेळाडूंचा समावेश

आंतरराष्ट्रीय बुद्धिबळ फेडरेशन आणि बुद्धिबळ फेडरेशन रशिया यांच्या तर्फे फिडे मानांकित महिलांच्या ही विशेष वर्ल्डचॅम्पियन स्पर्धा आयोजिक करण्यात आली आहे. या स्पर्धेमध्ये देशभरातील सुमारे १०३ खेळाडूंचा समावेश असणार आहे. दरम्यान, भक्तीसोबत वैशाली आर, हरिका द्रोनावल्ली, पद्मिनी राऊत याही भारताचं प्रतिनिधित्व करणार आहेत.

हेही वाचा : मोठी बातमी | भारत-श्रीलंका सामन्यांच्या वेळापत्रकात बदल

भक्तीच्या कामगिरीकडे लक्ष

रशियातील सोची इथं ही स्पर्धा आयोजित करण्यात आली असून या स्पर्धे गोमंतकीय कन्या आयएम भक्ती कुलकर्णी कशी कामगिरी करते, याकडे राज्यातील जनतेचं लक्ष लागलंय. विशेष म्हणजे काही दिवसांपूर्वीच मुख्यमंत्र्यांनीही भक्तीचं अभिनंदन करत तिला या स्पर्धेसाठी शुभेच्छाही दिल्या होत्या.

हेही वाचा : Video | अप्रतिम कॅच पाहून आनंद महिंद्राही म्हणाले, ही तर सुपरवुमन

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.
error: Content is protected !!